1500+ सुविचार मराठी | छोटे सुविचार | Suvichar Marathi

मराठी भाषेत अनेक सुविचार मराठी आहेत. काळाच्या ओघात त्यांचा वापर कमी झाला. प्रत्येक सुविचार हा व्यक्तिमत्त्व विकास आणि संस्कृती जपण्यासाठी अनमोल आहेत. किंबहुना सुविचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकार आहेत.

हा लेख सुविचार मराठी छोटे सर्व मराठी भाषा अभ्यासक, विद्यार्थी आणि मराठीप्रती विशेष रुची असणाऱ्या लोकांसाठी उपयुक्त ठरेल यात शंका नाही. आम्ही खाली १५००+ पेक्षा जास्त Suvichar Marathi त्याच बरोबर या यादीमध्ये अनेक छोटे सुविचार आहेत.

आज आम्ही येथे मराठी सुविचार संग्रह घेऊन आलो आहोत. सुविचार मराठी तुमच्या जीवनात नवीन ऊर्जा आणतात. ज्याद्वारे तुम्ही तुमच्या आयुष्यात नवीन उंची गाठू शकता. येथे आम्ही मराठी सुविचार लिहिले आहेत, जे तुम्ही दररोज वाचू शकता आणि सकारात्मक विचाराने तुमचा दिवस सुरू करू शकता. चला तर मग चांगले Marathi Suvichar वाचूया.

सुविचार मराठी | छोटे सुविचार | Suvichar Marathi

मराठी सुविचार संग्रह – सुविचार मराठी – छोटे सुविचार – Suvichar Marathi

क्र.सुविचार मराठी
1हृदयात दोनच शब्द असतात ते म्हणजे आई.
2तारुण्याचा काळ हा पुढील जीवनाचा मार्गदर्शक असतो.
3संस्कार आणि विकास जो साधतो तो मनुष्य व जो साधत नाही तो पशु होय!
4अपयशाने डगमगू नका व यशाने फुशारून जाऊ नका.
5आपली स्तुती आपण करू नये. ना ती इतरांना करू द्यावी.
6जीवन हे सुख व दुःख यांचा संगम होय.
7सुखात वाटेकरी खूपच असतात. दुःखात जो वाटेकरी असतो तोच आपला खरा मित्र असतो.
8भीड ही भिकेची बहिण आहे.
9स्त्री ही अशी व्यक्ती आहे, तिला नवऱ्याची बायकोच होऊन चालत नाही तर वेळप्रसंगी त्याची मैत्रिण व त्याची आई सुद्धा व्हावे लागते.
10श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी.
11शिक्षणाने माणसातील अज्ञान संपते.
12सुख दुःखात आपल्या बरोबर असलेला मित्र, हाच खरा मित्र.
13ग्रंथ हेच आपले गुरु.
14पुस्तकांनी मनाचा विकास साधतो.
15खरा मित्र आपली पुस्तके होय.
16पशुंना धनाची इच्छा नसते पण तीच इच्छा माणसाला पशु बनवते.
17सत्य हेच अंतिम समाधान असते.
18कुणीही जन्मतः दुर्जन नसतो. पण त्याला दुर्जन बनवतो तो समाज.
19पापी मनुष्याला सत्य हे सापासारखे दंश करत असते.
20तुम्हाला कोणाचा मान करायचा नसेल तर करू नका. पण त्याचा अपमानही करू नका.
21दानापेक्षाही त्यागाने माणूस मोठा होतो.
22दान देताना बघावे आपले दान योग्य वक्तिला देतो की नाही.
23तुमच्या अंगी शौर्य नाही तर सांगण्यास घाबरू नका. इतरांना तेवढे ही धारीष्ट नसते.
24अपयश ही यशाची पहिली पायरी आहे.
25अंधारातच आहे उद्याचा उषःकाल.
26आशा व निराशा या दोन्ही सख्या बहिणी आहेत. प्रत्येकाने ठरवायचे की आपण कोणाशी मैत्री करावी.
27गर्वाने मित्र शत्रू बनतात.
28रोपाला खतपाणी दिल्याने त्याचा वृक्ष बनतो. तसेच मुलावर संस्कार केले तर त्याचा विकास होतो.
29आई, वडील, गुरुजन व देश यांच्यावर निष्ठा ठेवावलाच हवी.
30एखाद्याचे तुम्ही भले करू शकत नसल्यास निदान त्याचे वाईट तरी चिंतू नका.
31निसर्गाच्या पुढे प्रगतशिल माणूस खुजाच असतो.
32खोटी ऐट व खोटा मान सोडा. आयुष्यात काही कमी पडणार नाही.
33सुख हे पैशात नसून ते संतुष्टात असते.
34पैशाने सर्वकाही घेता येते पण प्रेम पैशाने घेता येत नाही.
35पैशाने माणूस पशू बनतो.
36अंगात घातलेला कपडा किती उंची आहे याच्यापेक्षा किती स्वच्छ आहे हे महत्त्वाचे आहे.
37कपडा मळला तरी धुता येतो पण अब्रूवर पडलेला दाग आपल्या मरणाबरोबर सुद्धा मिटत नाही.
38आई, वडील ही परमेश्वराची देणगी आहे आणि ती फक्त एकदाच मिळते.
39प्रेमाची तुलना सोन्याशी होत नाही.
40प्रत्येकजण सर्वधर्मसमभाव वृत्तीने वागले तरच समाजाचे चित्र बदलता येईल.
41रूप हे आज आहे, उद्या नाही पण गुण मात्र अविनाशी असतात.
42धनाच्या लालसाने माणसात पशुत्व येते.
43धनाचा लोभ हा माणुसकीला लागलेला कलंक आहे.
44कष्टार्जित धनाला कधी मरण नाही.
45सुख-समाधान हेच आयुष्याचे खरे धन.
46वडीलोपार्जित इस्टेटीपेक्षा स्वकष्टाची इस्टेट सर्वांत श्रेष्ठ.
47बापकमाईच्या हजार रुपयांपेक्षा आपकमाईचा रुपायाच जास्त किंमतीचा आहे.
48संपत्तीच्या लोभाने भुजंग होऊ नका.
49अडचणीच्या वेळी सखे-सवंगडी नातेवाईक दूर होतात, पण शेवटी मिळवलेली विद्याच कामी येते.
50पैसा कितीही प्रिय असला, तरी तो मिळवताना माणुसकी गहाण टाकू नका.
51पैशावर विश्वास देऊ नये. विश्वासावर पैसा द्यावा.
52मानवता हाच खरा श्रेष्ठ धर्म होय. देव हा दगडात नसून माणूसकीत आहे.
53जसे काठीने पाणी तोडता येत नाही त्याप्रमाणे रक्ताची नाती तोडून तोडता येत नाहीत.
54पैशाने मिळविलेल्या प्रेमापेक्षा रक्ताच्या नात्याचे रेशमी प्रेमपाश हे अधिक लवचिक असतात.
55विजेच्या लखलखाटापेक्षा समईची शितलता मनाला आल्हाद देते.
56प्रेम हे चंद्रासारखे शितल असते.
57मुलांवर प्रेम करा पण दुर्गुण पाठीमागे घालू नका.
58मन हे प्रेमाने जिंकायचे असते पैशाने नाही.
59स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी.
60‘आई’ हेच दोन शब्द आयुष्य तरण्यास समर्थ आहेत.
61आईचे प्रेम हेच सर्वश्रेष्ठ दान आहे.
62हाताची बोटे ज्याप्रमाणे सारखी नसतात, त्याचप्रमाणे आपल्याला मिळालेल्या प्रेमात कमी अधिकपणा असतो.
63समुद्रातील असंख्य रत्नांपैकी मोत्यांचे रक्षण शिंपले करीत असतात. त्याच प्रमाणे जगातील कोट्यवधी माणसापासून आईचे प्रेम रक्षण करीत असते.
64पैसा झाला उतू नका व नसला तर प्रेम सोडू नका.
65मान सांगावा जनात अपमान ठेवावा मनात.
66वाईट सवयीपासून लांब रहाता येते पण सवय लागल्यावर लांब रहाता येत नाही.
67सूर्य किरणांनी फुले उमलतात तसेच आईच्या प्रेमाने जिवनकळ्या उमलतात…
68माणूस हा प्रेमाचा भुकेला आहे.
69आशा ही तेजश्री आहे.
70धनाच्या श्रीमंतीपेक्षा मनाची श्रीमंती श्रेष्ठ.
71सर्व फुलात कापसाचे फुल श्रेष्ठ.
72स्तुतीला भाळू नका निंदेला डरू नका.
73विद्यारूपी अंगठी मध्ये विनयरुपी रत्न चमकत असतो.
74परोपकार करणारे संतपुरूष फळाची अपेक्षा कधीच ठेवत नाही.
75नशिबात जे लिहिलेले आहे ,ते विधिलिखित कोणीच बदलू शकत नाही.
76दया हा मानवाचा धर्म आहे.
77तरुण स्त्रीला तिच्या सौदर्यापासूनच भय असते.
78चंद्र व चंदनापेक्षाही सज्जनांचा सहवास अधिक शीतल असतो.
79प्रेम म्हणजे मधुर सुवासाने दरवळणारे पुष्प आहे.
80खोटी प्रशंसा अत्यंत दु:ख देणारी असते.
81फुले म्हणजे हृदयाची मूक वाणी होय.
82साधू असावेत पण सावधान करणारे.
83धन मिळवणे हे जीवनाचे ध्येय नवे, ईश्वरसेवा हेच जीवनाचे ध्येय आहे.
84चांगल्यातून चांगले निर्माण होते; वाईटातून वाईट.
85आतिथ्य हे घराचे वैभव आहे.
86समाधान हे घराचे सुख आहे.
87प्रेम हि घराची प्रतीष्ठा आहे.
88परिश्रम म्हणजे जीवनाच्या साफल्याचे रहस्य.
89आपण केलेल्या कर्माचे फळ आपल्यालाच भोगावे लागते.
90क्षमा वृत्ती ठेवून क्रोध जिंकावा.
91माणूस प्रयन्तवादाने सर्व काही करू शकतो.
92संपत्तीचा अमर्याद संचय करू नका.
93परिवर्तन हे काळाचे लक्षण आहे.
94जे स्वत:बलवान असूनही दुर्बलांचे अपराध सहन करतात त्यांनाच क्षमाशील म्हणतात.
95आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे.
96पशूंना बळी देणे हि अंधश्रध्दा आहे.
97वैर प्रेमाने जिंकावे.
98माणुसकीचे दुसरे नाव प्रेम आहे प्राणीमात्रांवर हृद्यपुर्वक प्रेम करणे हीच खरी मानवता आहे.
99आईबापाची सेवा करा.
100हुंडा देऊन किंवा घेऊन लग्ने करू नका.
101दान घेण्यासाठी हात पसरू नका दान देण्यासाठी हात वर करा.
102सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो.
103आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते.
104प्रार्थना म्हणजे मनाचं स्थान.
105जग प्रेमाने जिंकता येतं; शत्रुत्वाने नाही.
106यश मिळवायचं असेल तर स्वत:च स्वत:वर काही बंधन घाला.
107प्रत्येकाच्या मनात एक आदर्श व्यक्ती असलीच पाहिजे.
108ज्याने स्वत:चं मन जिंकलं त्याने जग जिंकलं.
109यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती – आत्मविश्वास.
110प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो तोच खरा माणूस !
111चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देवमाणूस !
112मित्र परिसासारखे असावेत म्हणजे आयुष्याचं सोनं होतं.
113छंद आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात.
114आपण जे पेरतो तेच उगवतं.
115फ़ळाची अपेक्षा करुन सत्कर्म कधीच करु नये.
116उशीरा दिलेला न्याय हा न दिलेल्या न्यायासारखा असतो.
117शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम.
118प्रेम सर्वांवर करा पण श्रध्दा फ़क्त परमेश्वरावरच ठेवा.
119आधी विचार करा; मग कृती करा.
120आयुष्यात आई आणि वडील यांना कधीच विसरु नका.
121फ़क्त स्वत:साठी जगलास तर मेलास आणि स्वत:साठी जगून दुसऱ्यांसाठी जगलास तर जगलास !
122एकमेकांची प्रगती साधते ती खरी मैत्री.
123अतिथी देवो भव ॥
124अपयशाने खचू नका; अधिक जिद्दी व्हा.
125दु:ख कवटाळत बसू नका; ते विसरा आणि सदैव हसत रहा.
126आपल्यामुळे दुसऱ्याला दु:ख होईल असे कधीही वागू नका.
127निघून गेलेला क्षण कधीच परत आणता येत नाही.
128खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते. सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते.
129उद्याचं काम आज करा आणि आजचं काम आत्ताच करा.
130चुकीचा व्यवहार माणसं तोडतो म्हणून तो सत्याने आणि सन्मानाने करा.
131नवं काहीतरी शिकण्यासाठी मिळालेला वेळ म्हणजे सुट्टी.
132माणसाची चौथी मूलभूत गरज म्हणजे पुस्तक.
133सत्याने मिळतं तेच टिकतं.
134जो दुसऱ्यांना देतो त्याला देव देतो.
135परमेश्वराच्या आशीर्वादाशिवाय कुठलेही कार्य सिध्दीस जात नाही.
136हिंसा हे जगातलं सगळ्यात मोठं पाप आहे; मग ती एखाद्या माणसाची असो वा पशुची !
137स्वप्न आणि सत्य यात साक्षात परमेश्वर उभा असतो.
138प्राप्तीपेक्षा प्रयत्नांचा आनंद अधिक असतो.
139खरी श्रीमंती शरीराची, बुध्दीची आणि मनाची.
140तडजोड हे आयुष्याचं दुसरं नाव आहे.
141वाहतो तो झरा आणि थांबते ते डबकं ! डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस !!
142जो गुरुला वंदन करतो; त्याला आभाळाची उंची लाभते.
143गर्वाचं घर नेहमीच खाली असतं.
144झाडावर प्रेम करणारा माणूस सदैव प्रसन्नच असतो.
145माणसाचा सगळ्यात मोठा सद्गुण म्हणजे त्याची माणुसकी.
146क्रांती हळूहळू घडते; एका क्षणात नाही.
147सहल म्हणजे माणसिक आनंदाची सामुहिक क्रिडा.
148मुक्या प्राण्यांवर सदैव प्रेम करा.
149आयुष्याच्या प्रवासात प्रवास अत्यावश्यक आहे.
150बाह्यसौंदर्यापेक्षा अंतर्गत सौंदर्य जास्त मोलाचं असतं.
151मनाची श्रीमंती ही कुठल्याही श्रीमंतीपेक्षा मोठी असते.
152तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली यावरुन तुमची श्रीमंती कळते.
153शिक्षक म्हणजे विद्यार्थ्याचा दुसरा पालकच.
154मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा; ज्ञानाचा प्रकाश कुठुन कधी येईल सांगता येत नाही.
155आपल्याला मदत करणाऱ्या माणसांशी नेहमी कृतज्ञ रहा.
156एखाद्याला गुन्हेगार ठरविताना त्याच्या जागी स्वत:ला ठेवून बघा.
157परीक्षा म्हणजे स्वत:च्या आत डोकावून पाहण्याची संधी !
158खिडकी म्हणजे आकाश नसतं.
159जगण्यात मौज आहेच पण त्याहून अधिक मौज फुलण्यात आहे.
160वाचन, मनन आणि लेखन म्हणजे अध्ययन.
161भाकरी आपल्याला जगवते आणि गुलाबाचं फुल कशासाठी जगायचं हे शिकवते.
162कविता म्हणजे भावनांचं चित्र!
163संभ्रमाच्या वेळी नेहमी आपल्या कर्तव्याला प्राधान्य द्या.
164तुम्ही जेवढं इतरांना द्याल तेवढंच, किंबहुना त्याच्या कित्येक पटीने देव तुम्हाला देईल.
165ज्याच्यामधे मानवता आहे तोच खरा मानव !
166स्वत:च्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा वापर कधी करु नका; आणि स्वत:चा वापर कुणाला करु देऊ नका.
167अनुभवासारखा दुसरा गुरू नाही.
168तुलना करावी पण अवहेलना करू नये.
169समाधानी राहण्यातच आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख आहे.
170आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी क्रोधाचे गुलाम बनू नका.
171मनात आणलं तर या जगात अश्यक्य असं काहीच नाही.
172चेहरा हा आपल्या व्यक्तीमत्त्वाचा आरसा असतो.
173व्यर्थ गोष्टींची कारणे शोधू नका; आहे तो परिणाम स्वीकारा.
174आवडतं तेच करू नका; जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा.
175तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.
176अश्रु येणं हे माणसाला हृदय असल्याचं द्योतक आहे.
177विचारवंत होण्यापेक्षा आचारवंत व्हा.
178मरण हे अपरिहार्य आहे त्याला भिऊ नका.
179आयुष्यात प्रेम कारा; पण प्रेमाचं प्रदर्शन करू नका.
180आयुष्यात कुठलीच नाती ठरवून जोडता येत नाही.
181प्रायश्चित्तासारखी दूसरी शिक्षा नाही.
182सगळेच निर्णय मनाने घेऊ नका; काही निर्णय बुध्दीलाही घेऊ द्या.
183तुम्ही जिथे जाल तिथे तुमची गरज निर्माण करा.
184काळ्याकुट्ट रात्रीनंतर सुर्य उगवतोचं.
185लखलखते तारे पाहण्यासाठी आपल्याला अंधारातच राहवं लागतं.
186चांगली कविता माणसाला संवेदनाक्षम बनवते.
187तुमची उक्ती आणि कृती यात भेद ठेवू नका.
188बोलणे चांगलेच पण त्यानुसार कृती करणे सर्वांत चांगले.
189रिकामे डोके सैतानाचे घर.
190उद्योगाचे घरी लक्ष्मी पाणी भरी.
191बालपण ही जीवनाची पहाट तर तारुण्य आणि वार्धक्य हे अनुक्रमे उषःकाल आणि सायंकाल आहे.
192उषा आणि निशा जशा दिवसाच्या साथीदार आहेत तसे सुख दुःख माणसाचे सोबती आहेत.
193आयुष्यातील सुखाची एक तार दुःखाचा डोंगर पचवून जाते.
194माणसाच्या कर्माने जेव्हा एक सुखाचा दरवाजा बंद होतो तेव्हा दैव आणखी दोन दरवाजे उघडत असते, पण समजण्याची माणसाची कुवत नसते.
195अवघड क्षणीही न डगमगता जो अचूक निर्णय घेतो तोच जीवनाच्या लढाईत जिंकतो.
196जीवनरूपी पटावर माणसाची प्यादी हलवणारा सूत्रधार परमेश्वर बसला आहे.
197माणूस दुसऱ्याला कितीही फसविणारा असला तरी आपल्या मनाला तो कधीच फसवू शकत नाही.
198मनाच्याही अंतर्मनात चाललेली उलाढाल माणूस निद्रावस्थेत पहात असतो.
199माणसाच्या पापपुण्याचा हिशोब त्याला परमेश्वराच्या दरबारात चुकता करावाच लागतो.
200सत्य हे कटू असते पण शेवटी ते पचवावेच लागते.
201दुर्जन कितीही मातला तरी अखेर त्याला पापाचे शंभर अपराध घडल्यावर केलेल्या कृत्याचा भोग भोगावाच लागतो.
202केल्या कर्माची फळे माणूस याच जन्मी भोगत असतो पण ते बघायला सोसणारा असतोच असे नाही.
203पोट हे माणसाला काहीही करायला भाग पाडते.
204गरीबांच्या जीवावर श्रीमंतांची पोळी भाजत असते.
205स्त्री पुरुषाची दासी किंवा बटीक नाही तर ती गृहदेवता आहे.
206संतुट स्त्री हेच घराचे सौभाग्य. स्वच्छता हीच खरी दौलत. समाधान हेच घराचे वैभव.
207पाठीमागून वार करणाऱ्या शत्रूपेक्षा पुढून वार करणारा शत्रू परवडला.
208कळीचे फुल उमलले की मध चाखायला भुंगे जमतात.
209दुधापेक्षा दुधावरच्या साईला जास्त जपावे लागते.
210बिंदूचा जन्म जसा विरण्यासाठी असतो तसे त्यागी माणसाचे जीवन विरक्तीत असते.
211हिंदुधर्म संस्कृती ही एक सर्वश्रेष्ठ संस्कृती आहे, तिच्यावरच सर्व जगाची पाळेमुळे पोसली आहेत. .
212घटका गेली पळे गेली तास वाजे ठणाणा, आयुष्याचा नाश होतो राम कारे म्हणाना!
213क्षणैक राग हा आयुष्यभर पश्चाताप करावयास लावतो.
214क्षणैक मोह हा आयुष्यभर पश्चाताप करावयास लावतो.
215एक खोटे बोललेले लपविण्यासाठी अनेकवेळा खोटे बोलावे लागते.
216आपणच आपल्या भाग्याचे शिल्पकार असतो.
217एकवेळ विष पचविणे सोपे पण यश पचविणे अवघड आहे.
218मित्राच्या मृत्युपेक्षा मैत्रिच्या मृत्यूचे दुःख जास्त असते.
219आपल्या पडीक काळात जो उभा राहतो तो खरा मित्र.
220आयुष्य हे यश अपयश याचा खेळ आहे.
221तुमच्या महत्त्वाकांक्षेला किल्ली द्या, पराक्रम आपोआप होतो.
222महत्त्वाकांक्षा नेहमी चांगली ठेवा.
223आपल्या महत्त्वाकांक्षेने जर एखाद्याचे नुकसान होत असले तर ती महत्त्वाकांक्षा नव्हे, राक्षसी लालसा होय.
224मरणाचा मार्ग मोक्षाच्या मैदानातून जातो.
225फुल फुलले की त्याला स्पर्श व हुंगण्याचा मोह हा होतोच.
226पहाडाशी टक्कर देताना पहाड फुटला पाहिजे, डोके नव्हे.
227मनात किंतू आला की तो विंचू म्हणून ठेचावा.
228बकरी होऊन शंभर वर्ष जगण्यापेक्षा वाघ होऊन एक वर्ष जगा.
229कला ही नैसर्गिक देणगी असते तिचा विकास करणे आपल्या हातात असते.
230विद्या विनयेन शोभते.
231दुसऱ्याच्या सुखदुःखात भागीदार होण्यास शिकणे हेच खरे शिक्षण होय.
232ईश्वराच्या दरबारात श्रेष्ठ व कनिष्ठ, श्रीमंत व गरीब हा भेदभाव नसतो. म्हणून तो आपल्या मनातही ठेवू नये.
233तुमच्या रस्त्यात काटे पसरले तर तुम्ही त्याच्या रस्त्यात फुले पसरा.
234तुमच्या रस्त्यात काटे पसरले तर तुम्ही त्याच्या रस्त्यात फुले पसरा.
235परमेश्वर हा इकडे तिकडे नसून तो आपल्या हृदयात असतो.
236शब्द हे शस्त्र आहे ते जपूनच वापरा.
237तोंडातून गेलेला शब्द व धनुष्यातून सुटलेला बाण हा कधीही परत येत नाही.
238जखम भरून येते पण व्रण मात्र तसाच रहातो.
239घेतलेले काम मग ते लहान असो वा मोठे ते जिद्दीने तडीस न्या.
240शहाणा माणूस चूक विसरतो पण तिची कारणे विसरत नाही.
241जो चोच देतो तोच चारा देतो.
242आयुष्याच्या वाटेवर भोग व त्याग हेच दोन रस्ते आहेत.
243तहानलेल्याला विहीरीवर नेले तर तो पाणी पितो. पण ज्याला तहानच लागली नाही त्याला जर विहीरीवर नेले तर तो कोरडाच परत येतो.
244स्वप्न ही रंगविण्यासाठी असतात कारण स्वप्न सत्यात साकारणे फार कठीण असते.
245यशाचा डोंगर गाठायचा असेल तर जिद्द आणि चिकाटी सोडू नका.
246स्वप्नरंजन करणे म्हणजे मृगजळ बघणे.
247जो दुसऱ्यावर विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला.
248माणसाच्या जिवनाच्या पतंगाची दोरी नियतीच्या हातात असते.
249घरात अपशब्द बोलू नका वास्तू तथास्तू म्हणत असते.
250घरात वाढणारी मुलगी व दारात येणारी चिमणी या दोघीही सारख्या असतात. चिमणी दाणे टिपून जाते तर मुलगी सासरी जाते.
251प्रत्येकजण आपापले नशिब घेऊन येत असतो.
252प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे.
253मुळावर घाव घातल्यावर फांद्या आपोआप तुटतात.
254सरस्वती विद्येची भोक्ती, लक्ष्मी उद्योगाची भोक्ती, अक्काबाई आळसाची भोक्ती. या तीन देवींतून आपण कोणाची उपासना करायची हे आपणच ठरवायचे.
255आळस हा माणसाचा शत्रू आहे.
256उद्योग हा माणसाचा मित्र आहे.
257पैशाने श्रम विकत घेता येतात, पण मन नाही.
258माणसाने माणूसकी सोडली की त्याचे रूपांतर पशूत होते.
259दुबळी माणसे नेहमी रडगाणे ऐकविण्यासाठी उभी असतात.
260साध्या गवताची दोरी वळली तर मदमस्त हत्तीही बांधला जातो.
261गरीबांचा अपमान करू नका व श्रीमंतांची स्तुती करू नका.
262फिनिक्स पक्षी हा राखेतून जन्माला येत असतो.
263मरावे परी कीर्ती रूपे उरावे.
264सत्य हे अजरामर असते.
265परिस्थितीशी जुळवून घ्या पण लाचारी पत्करू नका.
266अनेक गोष्टीवर प्रेम करा मग तुम्हाला परमेश्वर समजेल. 
267मित्र परीसारासारखे असावेत म्हणजे आयुष्याचं सोनं होत.
268आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते.
269रागाला जिंक्ण्याचा एकमेव उपाय – मौन
270देणाऱ्याने देत जावे ,घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस, देणाऱ्याचे हात घ्यावे.
271नियमितपणा हा माणसाचा मित्र, तर आळस हा माणसाचा शत्रू.
272तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली यावरून तुमची श्रीमंती कळते.
273परीक्षा म्हणजे स्वतःच्या आत डोकावून पाहण्याची संधी.
274भाकरी आपल्याला जगवते आणि गुलाबाचं फुल कशासाठी जगायचं हे शिकवते.
275प्रत्येक यशस्वी असनाऱ्या पुरुषामागे एक स्त्री असतेच.
276अचल प्रीतीची किमत चंचल संपत्तिने कधी होत नाही.
277किर्तीरूपी दवबिंदूनी हृदयरूपी पण जास्त चमकत राहते.
278संस्कृती म्हणजे आपल्या मनावर ताबा व दुसऱ्याचा दुःखाची जाणीव होय.
279गणिताच्या अरण्यातून जातांना सूत्रांची  बंदूक हाती घ्यावीच लागते.
280कर्तुत्वाची भरारी माणसाला अमरत्व मिळवून देते.
281जीवाचे रान केल्याशिवाय विद्याचे उद्यान  फुलत नाही.
282अनुभव हाच जीवनाचा खरा शिक्षक आहे.
283आवड असली तरच सवड मिळू शकते.
284इच्छा असेल तर मार्ग दिसेल.
285प्रेम हि नेसर्गाची खरी प्रेरणा आहे.
286गरिबी जगातल्या प्रत्येक वाईट गोष्टीना जन्म देते.
287कृती चटका लावणारी असावी, देणारी नको.
288जीवन म्हणजे सुख दुःखाच्या उनपावसाचा खेळ आहे.
289जीवन फुलासारखे असू द्यावे, पण ध्येय मात्र मधमाशी प्रमाणेच असावे.
290जो मूळचाच सद्गुणी आहे, त्यावर दुर्गुणांचा काहीही परिणाम होत नाही.
291जो ओरडतो त्याला अंतकरण असते.
292जीभ जरी तोंडात असते तरी ती कधी कधी डोके फिरवते.
293प्रेम सर्वांवर करा; विश्वास थोड्यांवर ठेवा; पण व्देष मात्र कोणाचाच करू नका.
294जो समंजसपणे दु:खे सहन करतो तो खरा शूर.
295तिरस्कारामुळे झालेली जखम स्मितामुळे भरून निघते.
296आनंदी मनुष्य दीर्घायुषी असतो.
297ज्याची आपल्याला भीती वाटते त्याचीच आपण निंदा करतो.
298आयुष्यात सर्वात जास्त विश्वास परमेश्वरावर ठेवा.
299उलटा केलेला पिरॅमिड कधीच उभा राहू शकत नाही.
300पोहरा झुकल्याशिवाय विहिरीतलं पाणी पोहऱ्यात जात नाही.
301अत्तर सुगंधी व्हायला फुले सुगंधी असावी लागतात.
302मित्राच्या मृत्यूपेक्षा मैत्रीचा मृत्यू अधिक दुःखदायक असतो.
303रागाला जिकंण्याचा एकमेव उपाय – मौन !
304अती अशा हे दुःखाचं मूळ कारण आहे.
305अंथरूण बघून पाय पसरा.
306कधी कधी हक्क मागून मिळत नाहीत; ते मिळवावे लागतात.
307तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे त्याविषयी कमी बोला, आणि ज्या विषयाची माहिती नाही त्या विषयी मौन पाळा.
308अतिशहाणा त्याचा बैल रिकामा.
309संकटं तुमच्यातली शक्ती, जिद्द पाहण्यासाठीच येत आसताच.
310सन्मित्र शिंपल्यातल्या मोत्यासारखे असतात.
311सौंदर्य हे वस्तूत नसते; पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते.
312शरीरमाध्यम खलुं सर्वसाधनम ॥
313सर्वच प्रश्न सोडवून सूटत नाहीत; काही सोडून दिले की आपोआप सुटतात.
314शीलाशिवाय विद्या फुकाची आहे.
315जगाशी प्रामाणिक राहण्यापेक्षा आधी स्वतःशी प्रामाणिक रहा.
316एकदा तुटलेलं पान झाडाला परत कधीच जोडता येत नाही.
317कामात आनंद निर्माण केला की त्याचं ओझं वाटत नाही.
318आयुष्यात खरं प्रेम, खरी माया फार दूर्मिळ असते.
319ज्या चांगल्या बाबी आपण निर्माण केल्या नाहीत त्या नष्ट करण्याचा आधिकार आपल्याला नाही.
320कुणीही चोरू शकत नाही अशी संपत्ती कमावण्याचा प्रयत्न करा.
321देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस, देणाऱ्याचे हात घ्यावे !
322आयुष्यात सगळ्याच गोष्टी आपल्याला जमतील असं नाही.
323मूर्खांना विवेक सागंणे हाही मूर्खपणाच !
324ज्या गोष्टींशी आपला काहीही संबंध नाही त्यात नाक खुपसले की तोटाच होतो.
325जे झालं त्याचा विचार करू नका; जे होणार आहे त्याचा विचार करा.
326आपल्याला जे आवडतात त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा ज्यानां आपण आवडतो त्यांच्यावर प्रेम करा.
327रामप्रहरी जागा होतो त्यालाच प्रहरातला राम भेटतो.
328जे आपले आहेत त्यांच्यावर कुणीही प्रेम करतं; पण जे आपले नाहीत त्यांच्यावर प्रेम करणं हेच खरं प्रेम !
329लक्षात ठेवा-आयुष्यात कुठलीच गोष्ट कायमची आपली नसते.
330कधी कधी आपण ज्यांच्यावर खूप प्रेम करतो तीच माणसं आपल्यापासून फार दूर जातात.
331जे आपले नाही त्याच्यावर कधीच हक्क सांगू नका.
332पुढचा आपल्याशी चांगला वागेल या अपेक्षेने त्याच्याशी चांगलं वागू नका.
333आयुष्यात भेटणारी सगळीच माणसे सारखी नसतात.
334गुणांचं कौतुक उशीरा होतं; पण होतं !
335कुठल्याही कामाला अंतःकरणाचा उमाळा लागतो.
336स्वतःचा अवगुण शोधणं हीच गुणांची पूर्तता !
337ज्यादिवशी आपली थोडीही प्रगती झाली नाही तो दिवस फुकट गेला असं समजा.
338जो स्वतःवर प्रेम करू शकत नाही तो जगावर काय प्रेम करणार !
339सृजनातला आनंद कल्पनेच्या पलीकडचा असतो.
340श्रध्दा असली की सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीत देव दिसतो.
341आनंदी मन, सुदृढ शरीर आणि अध्यात्मिक श्रध्दा ह्या तिनही गोष्टी लाभणं म्हणजे अमृत मिळणं.
342एकांतात मिळणाऱ्या क्षणांचं आपण काय करतो यावर आयुष्याकडे पाहाण्याचा आपला दृष्टीकोन व्यक़्त होतो.
343प्रेमाला आणि द्वेषालाही प्रेमानेच जिंका.
344आपण चुकतो तिथे सावरतो तोच खरा मित्र !
345आपला जन्म होतो तेव्हा आपण रडत असतो आणि लोक हसत असतात. मरताना आपण असं मरावं की आपण हसत असू आणि लोक रडत असतील !
346स्वतःची चूक स्वतःला कळली की बरेच अनर्थ टळतात.
347अश्रुंनीच हृदये कळतात आणि जुळतात.
348हक्क आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.
349आयुष्यात असं काहीतरी मिळवा जे तुमच्या पासून कुणीही चोरून घेऊ शकत नाही.
350बदलण्याची संधी नेहमी असते पण बदलण्यासाठी तूम्ही वेळ काढला का ?
351कलेशिवाय जीवन म्हणजे सुगंधाशिवाय फूल आणि प्राणाशिवाय शरीर !
352टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला देवपण येत नाही.
353नेहमी तत्पर रहा; बेसावध आयुष्य जगू नका.
354यश न मिळणे याचा अर्थ अपयशी होणे असा नाही.
355आयुष्यात खूपदा बुध्दी जिंकते; ह्रदय हरतं पण बुध्दी जिंकूनही हरलेली असते आणि हृदय हरूनदेखील जिंकलेलं असतं.
356खरं आणि खोटं यात केवळ चार बोटांचं अंतर आहे. आपण कानांनी ऐकतो ते खोटं आणि डोळ्यांनी पाहतो ते खरं.
357जगी सर्व सुखी असा कोन आहे; विचारी मना तुच शोधूनी पाहे.
358प्रत्येक बाबतीत दुसऱ्याच अनुकरण करु नका; स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा.
359स्वातंत्र्य म्हणजे संयम; स्वैराचार नव्हे.
360आयुष्यातला खरा आंनद भावनेच्या ओलाव्यात असतो.
361माणसाने आपल्या आयुष्यात सुख-दुःख मानापमान, स्फूर्ती-निंदा, लाभ हानी, प्रिय-अप्रिय ह्या गोष्टी समान समजाव्यात.
362जीवनातील प्रत्येक क्षणी शिकणं म्हणजे शिक्षण.
363तन्मयता नसेल तर; विद्वत्ता व्यर्थ आहे.
364शिक्षण हे साधन आहे; साध्य नव्हे.
365हसा, खेळा पण शिस्त पाळा.
366आयुष्यात काय गमावलंत ह्यापेक्षा काय कमावलंत ह्याचा विचार करा.
367स्वतः जगा आणि दुसऱ्यालाही जगू द्या.
368तूच आहेस तूझ्या जीवनाचा शिल्पकार !
369काळ्याकुट्ट रात्रीनंतर उद्याची लख्ख पहाट असतेच.
370काळजाची प्रत्येक जखम भरून येते कारण काळ दुःखावर मायेची फुंकर घालत असतो.
371एक साधा विचारसुध्दा तुमचं आयुष्य उजळवू शकतो म्हणून नेहमी नवे विचार मिळवत रहा.
372हे देवा, मला खूप खूप आव्हानं दे व ती पेलण्यासाठी प्रचंड शक्ती दे!
373उगवणारा प्रत्येक दिवस उमलणारा हवा.
374या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे.
375तुम्हाला मोठेपणी कोणं व्हायचंय ते आजच ठरवा….आत्ताच !
376केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहीजे.
377दुसऱ्यांच्या गुणाचं कौतुक करायलाही मन मोठं लागतं.
378माणूस म्हणजे गुण व दोष यांचे मिश्रण आहे.
379प्रत्येक क्षण अपल्याला काही ना काही शिकवत असतो.
380व्यायामामुळे बुध्दी आणि मन दोहोंचे सामर्थ्य प्रभावी होते.
381काट्याविना गुलाबाचा कोमलपणा व्यर्थ असतो.
382दुःख हे कधीच दागिन्यासारखं मिरवू नका; वाटू शकलात तर आपला आनंद वाटा.
383शक्तीचा उपयोग नेहमी शहाणपणाने करा. क्रोधाच्या मार्गाने ती वाया घालवू नका.
384जग भित्र्याला घाबरवते आणि घाबरवणाऱ्याला घाबरते.
385दुःख हे बैलालासुध्दा कोकिळेसारखं गायला लावतं.
386शिकणाऱ्याला शिकवावं लागत नाही; तो स्वतःहून शिकतो.
387जग हे कायद्याच्या भीतीने चालत नाही ते सद्विचाराने चालते.
388परिस्थितिला शरण न जाता परिस्थितीवर मात करा.
389ऐकावे जनाचे करावे मनाचे.
390एका वेळी एकच काम आणि तेही एकाग्रतेने करा.
391केवळ ज्ञान असून उपयोग नाही, ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं.
392बाह्यशत्रूपेक्षा बऱ्याच वेळी अंतःशत्रूचीच अधीक भीती असते.
393चिंता ही कुठल्याच दुःखावरचा उपाय होऊ शकत नाही.
394तलवारीच्या जोरावर मिळवलेलं राज्य तलवार असेतोवरच टिकतं.
395दुःखातील दुःखिताला सुख म्हणजे त्याच्या दुःखातला सहभाग होय.
396स्वातंत्र्य हा आपला जन्मसिध्द हक्क आहे पण त्याचा स्वैराचार होऊ न देणं हे आपलं आद्यकर्तव्य आहे.
397स्वतःला पुर्ण ज्ञानी समजणाऱ्याचा विकास खुंटला.
398त्रासाशिवाय विद्या मिळणे अशक्य आहे. नव्हे, त्रास कसा सहन करायचा हे शिकणे हीच विद्या !
399जगू शकलात तर चंदनासारखे जगा; स्वत: झीजा आणि इतरांना गंध द्या.
400दुबळी माणसे रडगाणी सांगण्यासाठीच जन्माला आलेली असतात.
401पाप ही अशी गोष्ट आहे जी लपवली की वाढत जाते.
402उद्याचा भविष्यकाळ वर्तमानाच्या त्यागातून निर्माण होत असतो.
403जो चांगल्या वॄक्षाचा आधार घेतो त्याला चांगलीच सावली लाभते.
404मरावे परी कीर्तीरूपे उरावे.
405आयुष्य जगून समजते; केवळ ऐकून, वाचून, बघून समजत नाही.
406मूर्ख माणसे आपापसात संभाषण करू लागली की शहाण्या माणसाने मौन धारण करणे योग्य.
407बचत म्हणजे काय आणि ती कशी करावी हे मधमाश्यांकडून शिकावं.
408तारूण्य म्हणजे जीवनाचा रचनाकाळ आहे.
409गरिबी असूनही दान करतो तो खरा दानशूर.
410स्वार्थरहीत आणि खरीखुरी सेवा हीच खरी प्रार्थना.
411प्रार्थना म्हणजे ईश्वराच्या जवळ जाण्याची शक्ती.
412आपले सौख्य हे आपल्या विचारांवर अवलंबून असते.
413जे घाईघाईने वर चढू पाहतात ते कोसळतात.
414सदगुणांना कधीच वार्धक्य येत नाही.
415उषःकाल कितीही चांगला असला तरी सूर्याला तिथे फार काळ थांबता येत नसतं.
416लज्जा हा सौंदर्याचा अलंकार आहे.
417मोहाचा पहिला क्षण, ही पापाची पहिली पायरी असते.
418जीवन नेहमीच अपूर्ण असते आणि ते अपूर्ण असण्यातच त्याची गोडी साठवलेली असते.
419सत्याला शपथांच्या टेकूची गरज नसते.
420जगात सारी सोंगे करता येतात, पण पैशाच सोंग करता येत नाही.
421संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं पण संकटाचा सामना करणं त्याच्या हातात असतं.
422जूनी खपली काढून बुजलेल्या जखमा ताज्या करण्यात शहाणपणा नसतो.
423क्रांती तलवारीने घडत नाही; तत्वाने घडते.
424जो गुरू असेल, तो शिष्य असेलच. जो शिष्य नसेल, तो गुरू नसेल.
425जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे, समुद्र गाठायचा असेल, तर खाचखळगे पार करावेच लागतील.
426जीवन ही एक जबाबदारी आहे. क्षणाक्षणाला दुसऱ्याला सांभाळत न्यावं लागतं.
427वैभव त्यागात असते, संचयात नाही.
428तुम्हाला सज्जन व्हावेसे वाटत असेल तर आधी तुम्ही वाईट आहात यावर विश्वास ठेवा.
429खोटी टीका करू नका, नाहीतर प्रतिटीका ऐकावी लागेल.
430मनाविरूध्द गोष्ट, म्हणजे ह्रदयस्थ परमेश्वराविरूध्द.
431पुस्तकांसारखा दुसरा मित्र नाही. आपले अंतरंग खुले करते. कधी चुकवत नाही की फसवत नाही.
432ह्रदयात अपार प्रेम असले की सर्वत्र मित्र.
433टीका करणाऱ्या शत्रुंपेक्षा दिखाऊ स्तुती करणाऱ्या मित्रांपासून सावध रहा.
434प्रसंगी थोडे नुकसान झाले तरी चालेल, पण शत्रू निर्माण करू नका.
435मनाला आंनद देण्याचा कोणत्याही पदार्थाचा गुण म्हणजेच सौंदर्य.
436भव्य विचार हा सुगंधासारखा असतो; तो पसरावावा लागत नाही; आपोआप पसरतो.
437वाईट गोष्टींशी असहकार दाखवणे हे मानवाचे आद्य कर्तव्य आहे.
438त्याज्य वस्तू फूकट मिळाली तरी स्वीकारू नये.
439शत्रूशीही प्रेमाने वागून त्याला जिंकता येते; पण त्यासाठी संयम असावा लागतो.
440कृतघ्नतेसारखे दुसरे पाप नाही.
441बनू शकलात तर कृतज्ञ बना, कृतघ्न नको.
442दुसऱ्याचे अनूभव जाणून घेणे हाही एक अनुभवच आसतो.
443ओरडण्याने ओरडणे बंद होत नाही; स्वस्थ राहण्याने मात्र होते.
444दुःख गरूडाच्या पावलाने येतं आणि मुगींच्या पावलांनी जातं.
445जीवन जगण्याची कला हीच सर्व कलांमध्ये श्रेष्ठ कला आहे.
446एकमेका साहय्य करू । अवघे धरू सुपंथ ॥
447सुख हे दुःखाचे मोल देऊनच मिळते.
448श्रीमंताचे बंगले चांगले असतात पण म्हणून कोणी आपल्या झोपड्या पाडत नाही.
449राष्ट्र निर्माण करायचे असेल तर आधी राष्ट्रनिष्ठा निर्माण करायला हवी.
450संयम राखणे हा आयुष्यातला फार मोठा गुण आहे.
451असंभवनीय गोष्टी कधीच खऱ्या मानू नयेत.
452उषःकालाकडे जाण्याचा एकमेव मार्ग आहे, तो म्हणजे रात्र.
453ज्या गोष्टी कधीच बदलू शकत नाहीत त्यांच्याविषयी कधीही दुःखी होऊ नये.
454जे दुसऱ्याचे स्वातंत्र्य हिरावून घेतात, त्यांना स्वातंत्र्यात राहण्याचा हक्क नाही.
455पुस्तकाइतका प्रांजळ आणि निष्कपटी मित्र दुसरा मिळणार नाही.
456मनाला आंनद, संस्कार देणारी प्रत्येक वस्तू व कृती कलापूर्ण आहे.
457दोष लपवला की तो मोठा होतो आणि कबूल केला की नाहीसा होतो.
458जखम करणारा विसरतो पण जखम ज्याला झाली तो विसरत नाही.
459आकाशाखाली झोपणाऱ्याला कोण लुटणार?
460पिंजऱ्यात कोंडून पाखरं कधीच आपली होत नाहीत.
461आपण परिस्थितीला शरण जाता कामा नये; परिस्थिती आपल्याला शरण गेली पाहिजे.
462अंहकार हा तपःसाधनेचा महान शत्रू आहे.
463मोती होण्यासाठी जलबिंदूला आकाशातून आपला अधःपात करून घ्यावा लागतो.
464नैतिक पाया ढासळला की धार्मीकता संपलीच म्हणून समजा.
465अंतर्बाह्य प्रांजळपणा हाच प्रीतीचा प्राण होय.
466सामर्थ्याच्या पाठीमागे शील हवे.
467शहाणपणाचे प्रदर्शन करणारा पोपट कायमचा बंदिवान होतो.
468गवताची दोरी वळली म्हणजे तिने मत्त हत्तीसुध्दा बांधला जातो.
469दुर्जन मंडळीत बसण्यापेक्षा एकटे बसणे बरे आणि एकटे बसण्यापेक्षा सज्जन मंडळीत बसणे हे त्याहून बरे.
470पाप इतका सुंदर पोशाख घालून येते की ते पाप आहे असे माहीत असूनही आपण त्याला कवटाळतो.
471पुढे मिळणाऱ्या आनंदाच्या कल्पनेने जे सुख मिळते; त्या सुखाचे नाव उत्साह !
472स्वातंत्र्याचे मंदिर बलिदान करणाऱ्यांच्या रक्ताशिवाय उभे राहत नाही.
473अन्याय आणि अत्याचार ह्याला सक्त विरोध हाच सत्याचा स्वभाव.
474चारित्र्याचा विकास सुसंगतीत होतो तर बुध्दीचा विकास एकांतात होतो.
475स्वधर्माविषयी प्रेम, परधर्माविषयी आदर आणि अधर्माविषयी उपेक्षा याचाच अर्थ धर्म.
476अन्याय करणे हे पाप आणि होणारा अन्याय सहन करणे किंवा उघड्या डोळ्यांनी पाहणे हे महापाप !
477क्रोध माणसाला पशू बनवतो.
478आपल्या दोषांवरचे उपाय नेहमी आपल्याकडेच असतात; फक्त ते शोधण्याची तसदी घ्यावी लागते.
479आयुष्यात पैसा हवा पण पैशात आयुष्य नको.
480जे नंतर चांगले वाटते, तेच कृत्य नैतिक व जे नंतर दुःखकारक ठरते, ते अनैतिक !
481कडू घोट प्रेमळ माणसाच्या हातून दिल्यास तो कमी कडू लागतो.
482परमेश्वर खऱ्या भावनेलाच साहाय्य करतो.
483भरणाऱ्या जखमा भरू द्याव्यात; त्याची खपली काढू नये.
484माणसाने माणसाशी माणसासारखं वागणं हाच खरा धर्म.
485बोलावे की बोलू नये, असा संभ्रम निर्माण झाला असता मौनाने बोलण्याची जागा घ्यावी.
486शत्रूने केलेले कौतुक हीच आपली सर्वोत्तम कीर्ती होय.
487तिरस्कार पापाचा करा; पापी माणसाचा नको.
488आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असुन चालत नाही; सुविचार असावे लागतात. आणि नुसते सुविचार असुन चालत नाही; ते आचरणात आणावे लागतात.
489जरूरीपेक्षा अधिक गरजांचा हव्यास ठेवू नका.
490आपलं जे असतं ते आपलं असतं आणि आपलं जे नसतं ते आपलं नसतं.
491जो धोका पत्करण्यास कचरतो, तो लढाई काय जिंकणार !
492लीनता आणि विनयशिलता या धार्मिकतेच्या दोन शाखा आहेत.
493हृदये परस्परांना द्यावीत, ती परस्परांच्या अधीन करू नयेत.
494कर्तव्य पार न पाडता हक्कांच्या मागे धावलात तर हक्क दुर पळतात.
495हाव सोडली की मोह संपतो आणि मोह संपाला की दुःख संपते.
496आपण कसे दिसतो यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्त्व आहे.
497गरूडाइतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही.
498आदर्श गृहिणी ही शेकडो गुरूंहून श्रेष्ठ आहे.
499जो त्याग मनापासून केलेला नसतो, तो टिकत नसतो.
500अहंकार विरहीत लहान सेवाही मोठीच असते.
501तुम्हाला जर मित्र हवे असतील तर आधी तुम्ही दुसऱ्याचे मित्र बना.
502न मागता देतो तोच खरा दानी.
503चांगले काम करायचे मनात आले की ते लगेच करून टाका.
504केवड्याला फळ येत नाही पण त्याच्या सुगंधाने तो अवघ्या जगाला मोहवून टाकतो.
505समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी समुद्र आपली शांतता कधीही सोडत नाही.
506भितीयुक्त श्रीमंत जीवन जगण्यापेक्षा शांततामय, मानाचे गरीब जीवन चांगले.
507थोडे दुःख सहन करुन दुसऱ्याला सुख मिळत असेल तर आपण थोडे दुःख सहन करायला काय हरकत आहे.
508निश्चयी भिकारी हा अनिश्चयी सम्राटापेक्षा कितीतरी श्रेष्ठ असतो.
509खरे आहे तेच बोला, उदात्त आहे तेच लिहा, उपयोगाचे आहे तेच शिका आणि देशहिताचे आहे तेच करा.
510क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे.
511जशी दृष्टी तशी सृष्टी.
512श्रवण, भाषण, वाचन, निरीक्षण आणि लेखन एवढे दुर्मीळ अलंकार परमेश्वराने दिले असताना इतर आभूषणांची गरजच काय ?
513प्रेम लाभे प्रेमळांना, त्याग ही त्याची कसोटी.
514सत्तेशिवाय शहाणपन काय कामाचे!
515लक्ष्मी सत्पुरूषाच्या घरी त्याच्या गृहिणीच्या स्वरूपात नांदत असते.
516जे का रंजले गांजले । त्यासी म्हणे जो आपुले । तोची साधू ओळखावा । देव तेथेची जाणावा ॥
517चांगल्या परंपरा निर्माण करणे फार कठीण असते, म्हणून आहेत त्या चंगल्या परंपरा मोडू नका.
518निःस्वार्थी मन हाच सर्वोच्च आदर्श आहे.
519माणसाची खरी ओळख त्याच्या अंतःकरणाच्या नम्रतेने होते.
520कृतीपेक्षा वृती महत्त्वाची असते.
521आपला चेहरा हा आपल्या मनाचा आरसा असतो.
522सत्कृत्यांची वर्णने सुवर्णाक्षरांनी लिहिली जातात.
523बुध्दीला पटल्याशिवाय कोणताही विचार स्वीकारू नका.
524संकटात उडी घेऊन जे कार्य करतात त्यांनाच विजयश्री हार घालते.
525हिंसा हे दुर्बलांचे शस्त्र आहे, अहिंसा हे सबलांचे.
526परीसाच्या स्पर्शाने लोखंडाचंही सोनं होतं.
527शहाणा माणूस चुका विसरतो, पण त्याची कारणे नाही.
528कर्तव्याची दोरी नसली की मनाचा पतंग कुठेही फडफडत राहतो.
529प्रसिध्दी ही अशी बाब आहे जी कितीही मिळाली तरी माणसाची तहान भागत नाही.
530मी माझ्यासाठी आहे त्यापेक्षा मी कुणासाठीतरी आहे ही भावनाच किती श्रेष्ठ !
531ज्ञान हे पैशापेक्षा श्रेष्ठ आहे कारण पैशाचे रक्षण तुम्हाला करावे लागते; ज्ञान तुमचेच रक्षण करते.
532अतिपरिचयाने अवाज्ञा होते.
533विज्ञानाचं तंत्र शिका पण जगण्याचा मंत्र हरवू नका.
534शत्रूंपासून मुक्त होण्याचा उत्तम मार्ग म्हणजे त्यांना आपले मित्र बनविणे होय.
535जो स्वतःला ओळखत नाही, तो नष्ट होतो.
536न्यायाची मागणी करणाऱ्याने स्वतः न्यायी असले पाहिजे.
537भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती, आणि भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती.
538वेळप्रसंगी स्वत: उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे ही संस्कृती !
539कर्तव्याची जाणीव करून देते ती खरी संस्कृती !
540साधेपणात फार मोठे सौंदर्य असते.
541जो मूळ सोडून फाद्यांचा शोध घेतो तो भरकटतो.
542दुर्बल मनाचा मनुष्य कधीच महात्मा होऊ शकत नाही.
543अन्न हे पूर्णब्रह्म आहे; त्याचा अनादर करू नका.
544ज्याच्या डोळ्यात आत्मविश्वासाचे अंजन असते; तो कूठल्याही काळोखातून सहज मार्ग कढतो.
545केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा सुविचार वाढवून विवेकानंद व्हा.
546संकटी जो हाक मारी, हात त्याला दे तुझा रे ! हीच आहे लोकसेवा, हेच आहे पुण्य रे !
547डोक्यावर बर्फ व जीभेवर साखर असली की सारे प्रश्न आपोआप सुटतात.
548काही गोष्टी आपल्याला प्रिय नसतानाही कराव्या लागतात कर्तव्य म्हणून.
549प्रफुल्लता हेच चेहऱ्याचे खरे सौदर्य. औदासिन्य चेहऱ्याला कुरूप बनवते.
550अंतःस्थपणे जीवन संपन्न करते तेच खरे मनोरंजन.
551शारीरिक सौदर्य कालांतराने नष्ट होते पण आत्मिक सौदर्य कधीच नष्ट होत नाही.
552ज्ञानेंद्रियांवर संपूर्ण ताबा हाच खरा विजय होय.
553जीवनात पुढे जायचे असेल तर आपल्या अनावश्यक गरजा वाढणार नाहीत याची काळजी घ्या.
554तुम्हाला हवे होते पण मिळाले नाही म्हणून निराश होऊ नका; कदाचित त्याने तूमचे चांगले होणार नसेल.
555केवळ योगायोग असे काहीही नाही. जीवनातील प्रत्येक घटनेला अर्थ असतो.
556सर्वात सुंदर आश्रयस्थान म्हणजे ईश्वर.
557रागावून तूमची शक्ती वाया घालवू नका. शहाणपणाने काम करा.
558सहित्य ही उपासना आहे, वासना नाही. ती वासना झाल्यास साहित्य अवनत होते.
559समाज म्हणजे लोकांचा जमाव नव्हे, एकी होय.
560कर्म म्हणजे प्रत्यक्ष सेवा; भक्ती म्हणजे सेवाभाव.
561बिनभिंतीची इथली शाळा, लाखो इथले गुरु । झाडे, वेली, पशुपाखरे यांची संगत धरु ॥
562आपल्या आचरणाचा प्रभाव आपल्या भाषणापेक्षा अधिक होतो.
563आरोग्य हाच सर्वोतम लाभ, तृप्ती हेच खरे धन, विश्वसनीय मित्र हेच सर्व सर्वोत्कृष्ट नातेवाईक आणि निर्मिती हाच परमानंद आहे.
564जीवनाचे सोने होईल अशी खटपट करा.
565वैराने वैर वाढेल, परंतु प्रेमाने वैर कमी होईल म्हणून आपल्या शत्रुवरही प्रेम करायला शिका.
566पायदळी चुरगळलेली फ़ुले चुरगळणाऱ्या पायाला आपला सुगंध अर्पण करतात. खऱ्या क्षमेचेही कार्य हेच आहे.
567आवड असली की सवड आपोआप मिळते.
568जो स्वत: कुणाचातरी गुलाम असतो त्यालाच दुसऱ्यावर हुकुमत गाजवाविशी वाटते.
569स्तुतीने चांगली माणसे सुधारतात, तर वाईट माणसे बिघडतात.
570अंथरूण बघून पाय पसरावेत.
571आपली बाग सजवताना दुसऱ्यांची फुले विस्कटणार नाहीत याची काळजी घ्या.
572मदत करण्यासाठी पुढे केलेला एक हात हा प्राथेनेसाठी जोडलेल्या दोन हातांपेक्षा आधिक उपयुक्त असतो.
573चिंतेऐवढे शरीराचे शोषण दुसरे कोणीही करू शकत नाही.
574प्रेमाची मादकता मनुष्याला व्याकुळ बनवते तर प्रेमाची पवित्रता त्याला शांती देते.
575गुलाबाला काटे असतात असे म्हणून रडत बसण्यापेक्षा काट्यांना गुलाब असतो असे म्हणत हसणे उतम !
576तासभराचे ध्यान हे वर्षभर केलेल्या पूजेअर्चेहून श्रेष्ठ आहे.
577उच्चरावरुन विद्वत्ता, आवाजावरुन नम्रता व वर्तनावरुन शील समजते.
578एकदा कर्तव्याच्या वाटेवरुन जायचं ठरवलं की भावनांना विसरायचंच असतं.
579अधर्म, अनीती, अनाचार यांच्या साहाय्याने मिळविलेला जय पराजयापेक्षाही आधिक लांच्छनास्पद आहे.
580शत्रुशी मित्रत्व राखणे ही प्रेमाची खरी कसोटी आहे.
581स्वार्थरहीत सेवा हीच खरी प्रार्थना.
582लबाडी ही तोकड्या चादरीसारखी असते. तोंडावर ओढुन घ्यावी तर लगेच खाली पाय उघडे पडतात.
583सुखापेक्षा दुःखामुळेच दोन ह्र्दये अधिक जवळ येतात: म्हणुनच समदुःख हे समआनंदापेक्षा अधिक बलशाली असते.
584सदगुणांसाठी दुसऱ्याकडे बघा व दुर्गूणांसाठी स्वतःवर नजर ठेवा.
585भित्री माणसे मरण्यापुर्वी अनेकदा मरतात पण शूर माणसे एकदाच जन्मतात आणि एकदाच मरतात.
586परमेश्वाराची कृपा होते पण, श्रध्दा आणि सबुरी हे दोन गुण असतील तेव्हाच.
587माणसाला त्याचे श्रेष्ठत्त्व जातीने नव्हे तर गुणांनी प्राप्त होते.
588स्वावलंबी शिक्षण हेच खऱ्या विद्यार्थ्याचे ब्रीद.
589चारीत्र्यवान मनुष्यच खरा सुशिक्षित.
590काम करणे हे जर अटळ आहे तर ते काम हसत हसत का करू नये?
591अभ्यासाचा कंटाळा म्हणजे भाग्याला टाळा.
592यशाचे मधुर चांदणे हवे असेल तर प्रयत्नांची चंद्रमा अखंड तेवत ठेवली पाहिजे.
593सत्याला शपथांच्या टेकूची गरज नसते.
594सुखापेक्षा दुःखामुळे होणारे ज्ञान श्रेष्ठ दर्जाचे असते.
595अशक्य हा शब्दच आपल्या शब्दकोशातून काढून टाका.
596झाडासारखे जगा… खूप उंच व्हा… पण जीवन देणाऱ्या मातीला विसरू नका.
597स्वर्गापेक्षाही चांगल्या पुस्तकाचे अधिक स्वागत करा. कारण चागंली पुस्तके जिथे असतील तिथे स्वर्ग निर्माण होईल.
598इच्छा दांडगी असली की मदत आपणहून तुमच्याकडे चालत येते.
599अज्ञानाची फळे नश्वर असतात. ती सकाळी जन्माला येतात आणि सायंकाळी नष्ट होतात.
600कोणी कितीही चिडवण्याचा प्रयत्न केला तरी मनावर संयम ठेवणे, शांत राहणे हेच खरे शौर्याचे लक्षण आहे.
601अपयशाची भीती ही सर्वात मोठी भीती होय.
602तलवार ही शौर्याची नव्हे; भीतीची निशाणी आहे.
603जूलूम सहन करणे म्हणजे सोशिकपणा नव्हे, परमार्थही नव्हे, ती केवळ लाचारी आहे.
604आज्ञेला सामर्थ्य यायला आधी सेवा करावी लागते.
605माणूस नेहमी प्रगतीशील असला तरच मोठा होण्यासाठी धडपडतो . अल्पसंतूष्ट माणूस निष्क्रीय बनतो.
606जीभ जिंकणारा जग जिंकतो.
607झाले गेले विसरुनि जावे… पुढे पुढे चालावे… जीवनगाणे गातच राहावे.
608गुलाब पाणी देणाऱ्या हातांना त्याचा सुगंध चिकटल्याशिवाय राहत नाही.
609जीवनाला अखेरची रेषा नसते. ते क्षितिजासारखे रुंदावणारे आहे.
610विचार कराण्यासाठी वेळ द्या. पण एकदा का कृती करण्याची वेळ आली की विचार करणे थाबंवा आणि स्वतःला कार्यात झोकून द्या.
611कर्मण्ये वाधिकारस्ते मां फलेषु कदाचनं ॥
612ज्या घरात स्त्रीची पुजा होते, त्या घरात देवता रमतात.
613प्रेमाशिवाय सेवा व्यर्थ आहे. प्रेम नसताना जर कोणी सेवा केली असेल तर ती सेवा नसते, तो व्यापार असतो.
614शरीर पाण्यामुळे, मन सत्यामुळे आणि आत्मा ज्ञानामुळे पवित्र राहतो.
615शक्यतो कुणाचेही उपकार घेऊ नका आणि जर का घेतले तर त्या व्यक्तीलाही तशीच मदत करा.
616पाहिलेल्या पावसाळ्यापेक्षा अनुभवलेले पावसाळे अधिक महत्त्वाचे असतात.
617अंधारातच प्रकाशाची खरी किंमत कळते.
618देश तुमच्यासाठी काय करील हे विचारण्यापेक्षा देशासाठी तुम्ही काय कराल ते सांगा.
619अपराध्याला पुन्हाःपुन्हा क्षमा करणं हे अपराध करण्याइतकंच धोक्याचं आहे.
620समुद्राचा तळ शोधल्याशिवाय मोती मिळत नाहीत.
621फांदीला फुलांचं ओझं कधीच वाटत नाही.
622पराभवानेच माणसाला स्वतःची खरी ओळख पटते.
623दुसऱ्याला सावली देण्यासाठी झाडाला स्वतः उन्हात उभं राहावं लागतं.
624श्रध्देच्या जोरावर असाध्य गोष्टी साध्य करता येतात.
625महापुरात झाडे वाहून जातात पण लव्हाळे मात्र वाचते.
626क्रोधाच्या एका क्षणी संयम राखला तर पश्चातापाचे शंभर क्षण वाचतात.
627आळसाचा प्रवास इतका सावकाश असतो की दारिद्र्य त्यास ताबडतोब गाठते.
628पुस्तके म्हणजे मन निर्मळ करणारा अविश्रांत झरा आहे.
629जीवन हा हास्य आणि अश्रू यांचा सुरेख संगम आहे.
630अहंकारापेक्षा नम्रतेचे मोल महान आहे.
631जे तलवार चलवतील ते तलवारीनेच मरतील.
632मैत्रीच्या रोपट्याला नेहमी प्रेमरूपी पाण्याचे सिंचन आवश्यक असते.
633दुष्टांच्या संगतीत सदाचार लोप पावतो.
634विचार परीपक्व झाले की शब्दांचे रूप देऊन कागदावर उतरवता येतात.
635नाव ठेवणे सोपे आहे, परंतु नाव कमावणे खूप अवघड.
636राजाला फक्त राज्य मानते, तर बुध्दीवंताला संपूर्ण विश्व.
637निंदकाचे घर असावे शेजारी.
638कावळ्याच्या मरणाचे वाईट वाटत नाही; मात्र मोर मेला तर आपण हळहळतो. कारण सौंदर्य नष्ट होते.
639लोकांचे तुमच्याबद्दल काय मत आहे यापेक्षा तुमचे स्वतःबद्दल काय मत आहे हे महत्त्वाचे.
640बुध्दी आणि भावना यांचा योग्य संयम म्हणजेच विवेक.
641त्याग हा जीवनमंदिराचा कळस आहे.
642आपण पक्षाप्रमाणे आकाशात उडायला शिकलो,माशाप्रमाणे,समुद्रात पोहायला शिकलो पण जमिनीवर माणसासारखे वागायला शिकलो का?
643मानसिक स्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य आहे. ज्याचे मन स्वतंत्र नाही तो मोकळा असूनही गुलाम आहे.
644प्रत्यक्षानुभूती हेच खरे ज्ञान.
645कुणाचेही अंतःकरण न दुखवता बोलणे म्हणजे “खरे भाषण” !
646खरे असेल तेच बोलावे, उदात्त असेल तेच लिहावे, उपयोगी तेच शिकावे आणि देशाचे हीत ज्यात असेल तेच करावे.
647जो आत्मप्रौढी करेल त्याची मानहानी होईल आणि जो नम्रतेने राहील त्याला प्रतिष्ठा प्राप्त होईल.
648खरी प्रीती ही कुसुमापेक्षाही कोमल व वज्रापेक्षाही कठोर असते.
649कुरूप मनापेक्षा कुरूप चेहरा चांगला.
650मनुष्याचे मोठेपण हे त्याच्या वयावर नव्हे, तर कर्तृत्त्वावर अवलंबून असते.
651कीर्ती ही सावलीप्रमाणे सदगुणांबरोबर वावरत असते.
652औदार्य म्हणजे तुमच्या क्षमतेपेक्षा अधिक देणं आणि आत्मसन्मान म्हणजे तुमच्या गरजेपेक्षा कमी घेणं.
653हात उगारण्यासाठी नसतात; उभारण्यासाठी असतात.
654तुमचे सौख्य तुमच्या विचारांवर अवलंबून असते.
655माणसाचे चरित्र्य आरशात दिसत नसते.
656वैयक्तिक तृष्णेला अंत नसतो.
657जेथे बुध्दीचे क्षेत्र संपते तेथे श्रध्देचे क्षेत्र सुरू होते.
658सन्मित्र ही जगातील सर्वश्रेष्ठ संपत्ती आहे.
659गप्प बसायला हवे तेव्हा बडबडणे आणि बोलायला हवे तेव्हा गप्प बसणे या दोन्ही गोष्टी म्हणजे मूर्खपणाच.
660ज्याच्या जवळ सुंदर विचार असतात तो कधीही एकटा नसतो.
661लोखंडाने सोन्याचे कितीही तुकडे केले तरी सोन्याची किंमत कमी होत नाही.
662दुःखाची चव घेण्यापेक्षा ते पचवण्यात अधिक गोडी आहे.
663सूड घेण्यापेक्षा क्षमा करणे अधिक चागंले.
664प्रत्येक काळ्या ढगाला रूपेरी किनार असते.
665नियम अगदी थोडा असावा पण तो प्राणापलिकडे जपावा.
666शरीराला श्रमाकडे, बुध्दीला मनाकडे आणि हृदयाला भावनेकडे वळविणे म्हणजे शिक्षण.
667सदगुणांवर हल्ला केला तरी त्याला इजा होत नाहीत.
668मानापमानाच्या पलिकडे जगणं शिका.
669माझे ते खरे म्हणण्यापेक्षा खरे तेच माझे म्हणा.
670जीवनातील काही पराभव हे विजयाहूनही अधिक श्रेष्ठ असतात.
671सर्वात मोठे पाप म्हणजे अन्यायाशी तडजोड.
672माणंसाकरिता धर्म आहे, धर्माकरिता माणसे नाहीत हे लक्षात घ्या.
673जीवन जगण्याची कला ही सर्व कलांमधे श्रेष्ठ आहे.
674माणसाने माणुसकी सोडली की त्याचे रूपांतर पशूत होते.
675कडू घोट प्रेमळ माणसाच्या हातून घेतला तर तो गोड लागतो.
676प्रसिध्द व्यक्ती होण्यासाठी आयुष्यातला क्षण न क्षण कोणत्यातरी एका क्षेत्रात सतत उगळावा लागतो.
677केल्याविण सांगो नये आपला पराक्रम ॥
678विचार बदला; आयुष्य बदलेल.
679ज्याची मस्करी करणारं कुणी नसतं; त्याच्यावर प्रेम करणारंही कुणी नसतं.
680एकच नियम पाळा – कोणताही नियम तोडू नका.
681ज्याला काय लिहावं यापेक्षा काय लिहू नये हे कळतं तोच खरा लेखक !
682मरण जवळ आलं म्हणून जगायचं कुणी थांबतं का !
683बुडणाऱ्यांना किनाऱ्यावरुन सूचना देतात ते सामान्य आणि स्वत:चा जीव धोक्यात घालून त्यांना वाचवतात ते असामान्य !
684मृत्यू म्हणजे दु:ख नसून तो जन्माहून श्रेष्ठ आहे. ज्या परमेश्वराने इतका सुंदर जन्म दिला तो या जन्माचा शेवट वाईट गोष्टीत कधीच करणार नाही.
685आत्महत्या म्हणजे सर्वात मोठे पाप !
686ज्याला खरोखरच लक्ष्य गाठायचे आहे त्याने प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्यायला हवे.
687आपली बाजू न्याय्य असेल तर दुर्बलही समर्थांचा पराभव करु शकतात.
688आरामात जीवन जगायचे असेल तर ऐकून घ्या, पाहून घ्या. व्यर्थ बडबड करु नका.
689आपत्ती म्हणजे आपला सर्वात मोठा गुरु.
690अपमानाच्या पायऱ्यावरुनच ध्येयाचा डोंगर चढायचा असतो.
691आपले सत्यस्वरुप सिध्द करण्यास सोन्याला अग्नीत शिरुन दिव्य करावे लागते व हिऱ्याला घणाचे घाव सोसावे लागते.
692आचाराच्या उंचीवरच विचारांची भव्यता अवलंबून असते.
693आशा ही उत्साहाची जननी आहे.
694अपयश म्हणजे संकट नव्हे; आपल्याला योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहेत.
695आईच्या डोळ्यातील रागाच्या पाठीमागे वात्सल्याचे सागर उचंबळत असतात.
696आळसात आरंभी सुख वाटते, पण त्याचा शेवट दु:खात होतो.
697आशा हीच जीवनाची सर्वात मोठी शक्ती असते !
698अखंड यशाने आपल्या जीवनाची केवळ एकच बाजू कळते. दुसरी बाजू कळण्यासाठी अपयशाची जरुरी असते.
699अंधारच नसता तर चमकणाऱ्या ताऱ्यांना काही किंमतच उरली नसती.
700आपण ज्या ध्येयासाठी झगडा देत आहोत त्याबद्दल स्पष्ठ आकलन नेहमीच आवश्यक आहे.
701आपण चंदन असल्याची घोषणा चंदनाला कधीच करावी लागत नाही. त्याचा गंध वाऱ्याबरोबर आपोआप पसरत जातो.
702असत्य हे अपंग प्राण्याप्रमाणे असते, दुसऱ्याच्या आधाराशिवाय ते कधीच उभे राहू शकत नाही.
703असत्याचा विजय झाला तरी तो क्षणभंगूर असतो.
704इतिहास घोकण्यापेक्षा इतिहास निर्माण करणे महत्त्वाचे.
705उद्योगी माणूस कधीच निर्धन नसतो.
706कोणतीच वेळ शुभ किंवा अशुभ नसते. माणूस आपल्या पराक्रमाने एखाद्या वेळेला महत्त्व आणून देतो.
707कोणतीही विद्या, ज्ञान कधीच वाया जात नाही.
708कोणी कितीही चिडवण्याचा प्रयत्न केला तरी संयम राखणे हेच शौर्याचे लक्षण आहे.
709कोणत्याही गोष्टीची उणीव भासल्याखेरीज तिची खरी किंमत कळत नाही.
710कोमलता हा हृदयाचा धर्म आणि सबलता हा देहाचा धर्म. देहाला वज्रापेक्षाही अधिक मजबूत बनवा आणि हृदयाला फुलापेक्षाही अधिक कोमल बनवा.
711खरा आनंद हा दुसऱ्यांना देण्यात असतो; घेण्यात किंवा मागण्यात नसतो.
712खर्च करुन आवक शोधण्यापेक्षा आवक पाहून खर्च करावा.
713घडून गेलेल्या गोष्टींकडे ढुंकूनही न पाहता पुढे घडणाऱ्या गोष्टींकडे पाहत रहा.
714गवताच्या पात्यावरुन वाऱ्याची दिशा ओळखायला शिका.
715घोंगड्याने काम भागत असेल तर रेशमी वस्त्राचा हट्ट धरु नये.
716घटनांना विचारांचे स्वरुप देणे हे वाङमयाचे कार्य आहे.
717चारित्र्याचा विकास सुसंगतीत होतो आणि बुध्दीचा विकास एकांतात होतो.
718छोटे लोक नसते तर मोठ्या लोकांचे अस्तित्व शून्य असते.
719चारित्र्यात सूर्याची तेजस्विता अन अंत:करणात चंद्राची शीतलता हवी.
720जे अंत:करणातून येते तेच अंत:करणाला जाऊन भिडते.
721ज्यांना जास्त गोष्टींची हाव असते त्यांना प्रत्येक गोष्टीची कमतरता असते.
722जो स्वत: दु:खातून गेला नाही त्याला दुसऱ्याचे दु:ख कसे कळणार?
723ज्याची कृती सुंदर तो सुंदर !
724जीवनाचा अर्थ विचारायचा असेल तर तो आकाशाला आणि समुद्राला विचारा.
725ज्योतीचं महत्त्व आणि पावित्र्य हे अंधारात चाचपडणाऱ्यांनाच कळंत.
726जीवनातला अंध:कार नाहीसा करणारी ज्योत म्हणजे हास्य !
727जगातील बहुतेक सज्जनांच्या वाट्याला दु:ख का येतं ? कारण दुर्दैवाला जवळ करण्याइतकी शक्ती, क्षमता त्यांच्याजवळ असते म्हणून !
728ज्याच्या गरजा कमी, त्याला सुख आणि स्वास्थ्य अधिक !
729झऱ्याचे रुपांतर नदीत होते आणि नद्या समुद्राकडे वाहत जातात. वाईट सवयींचेही असेच होते.
730जो स्वत: उत्तम वागू शकतो, तोच उपदेश करु शकतो.
731ढीगभर आश्वासनांपेक्षा टीचभर मदत केव्हाही चांगली.
732तुम्ही आपल्या कर्माचा पडदा काचेसारखा स्वच्छ कराल तर त्यातून तुम्हाला परमेश्वर दिसेल.
733थोरांचे सदगुण घेणे हीच त्यांना वाहिलेली खरी श्रध्दांजली !
734थोर काय अगर सामान्य काय ! प्रत्येकाला प्रत्येकाची गरज ही असतेच.
735दुर्बल व्यक्ती एखादे उच्च ध्येय समोर ठेवून समाजात वावरु लागते तेव्हा धाडस व साहस हे गुण तिच्यात आपोआप येतात.
736दु:ख विभागल्याने कमी होते आणि सुख विभागल्याने वाढते.
737दुसऱ्याचे ओझे उतरवण्यासाठी जेव्हा तुम्ही पुढे होता, तेव्हा तुमचे ओझे पूर्वीपेक्षा हलके होते हे लक्षात ठेवा.
738शिक्षणाला जीवनाचे उद्दीष्ट बनवण्यापेक्षा जगण्याचे साधन बनवा.
739दुसऱ्याला सावली देण्यासाठी झाडाला स्वत: उन्हात उभं राहावं लागतं.
740दिव्याची काच स्वच्छ असून भागत नाही, आत ज्योत ही हवीच.
741दुसऱ्याचा विचार करायला शिकला तोच खरा सुशिक्षित.
742ध्येयाचा ध्यास लागला; म्हणजे कामाचा त्रास वाटत नाही.
743नम्रता ही शिक्षणाची पहिली पायरी आहे.
744नशीब रुसलं तर किती रुसेल आणि हसलं तर किती हसेल याचा नेम नाही.
745नियमितपणा हा दुसऱ्याच्या वेळेला किंमत देण्यातून जन्माला येतो.
746प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते.
747पुराचा लोट अडविण्यात अर्थ नसतो, तो आपोआप जिरू द्यावा लागतो.
748कलेची पारंबी माणसाला बळ देते.
749फुलांच्या पाकळ्या तोडणाऱ्याला फुलांचे सौंदर्य कधीच आस्वादता येत नाही.
750बुद्धीमत्तेपेक्षा चारित्र्य श्रेष्ठ आहे.
751काही बदलायचं असेल तर सर्वात आधी स्वत:ला बदला.
752मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.
753मुलांच्यात बदल हाच शिक्षकाचा आनंदाचा ठेवा !
754माणसानं राजहंसासारखं असावं. आपल्याला जे पटेल तेच घ्यावं, नाही ते सोडून द्यावं.
755माणसाचं छोट दु:ख जगाच्या मोठ्या दु:खात मिसळून गेलं की त्याला सुखाची चव येते.
756माणसाचे मोठेपण त्याने किती माणसे मोठी केली, यावरुन मोजता येते.
757मोत्याच्या हारापेक्षा घामाच्या धारांनी मनुष्य अधिक शोभून दिसतो.
758नाही म्हणायचे असते तेव्हा नाही म्हणण्याची हिमंत ठेवा.
759मोठ्या लोकांचा मत्सर करु नका; कारण त्यामुळे तुमचा क्षुद्रपणा प्रकट होतो.
760यश हे प्रयत्नांना चिकटलेले असते.
761रडण्याने भविष्य बदलत नसते.
762लहानांना मोठं करण्यासाठी मोठ्यांना लहान व्हावं लागतं.
763विचार कुठुनही घ्यावेत पण घेताना ते पारखून घ्यावेत.
764वेदनेतूनच महाकाव्य निर्माण होते.
765विचार न करता शिकणे हे निरुपयोगी असते तर न शिकता विचार करणे हे धोकादायक असते.
766शिक्षेपेक्षा क्षमेनेच कार्यभाग साधता येतो.
767शुन्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्याच्या अंगी असते, तोच खरा कर्तृत्ववान होय.
768संघर्षाशिवाय कधीच, काहीच नवे निर्माण झाले नाही.
769संसारातल्या तारा मोठ्या नाजूक असतात. तालाची एक मात्रा चुकली तरी त्या नाराज होतात, सूर बेसूर होतात. म्हणूनच संसाराचं गाणं गाताना फार जपावं लागतं – स्वत:लाही आणि इतरांनाही !
770जन्मभर संपत्तीच्या मागे लागलेला माणूस संसारातलं सुख, शांती हरवून बसतो.
771सोप्यातले सोपे कामही अविचाराने केल्यास अधिक अवघड बनते.
772समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे अधिक भयानक असतात. ती निर्माण होऊ देऊ नका.
773प्रेम म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपलं प्रत्येक कर्तव्य प्रामाणिकपणे पूर्ण करणे होय.
774स्वत:च स्वत:चे न्यायाधीश बनू नका.
775संसारात एकमेकांच्या सुखापेक्षा दु:ख वाटून घेण्यात फार मोठा आनंद असतो.
776संस्कृती म्हणजे आपल्या मनावर ताबा व दुसऱ्याच्या दु:खाची जाणीव !
777हृदयाची झेप बुद्धीच्या पलिकडची असते.
778हातावरील रेषेत दडलेले भविष्य बघू नका; त्याच हाताने कष्ठ करा व स्वत:चे भविष्य घडवा.
779हसण्याचं मोल काय आहे हे रडल्यावरच कळतं.
780आज्ञा करण्यापूर्वी आज्ञा पाळायला शिका.
781श्रद्धेच्या जोरावर असाध्य गोष्टीही साध्य करता येतात
782क्षमा हीच एकमेव गोष्ट या जगात आहे; जी पापाचं रुपांतर पुण्यामध्ये करु शकेल.
783ज्ञानाचे अंतिम लक्ष्य सुंदर चात्रित्र्य निर्माण करणे हेच असले पाहिजे.
784आळसाला तुम्ही आजचा दिवस बहाल केलात की तुमचा उद्याचा दिवस त्याने चोरलाच म्हणून समजा.
785प्रवासावरुन केव्हा परतावे हे ज्याला कळते तोच उत्तम प्रवासी.
786जीवन सुंदर व यशस्वी होण्यासाठी तीन गुणांची जरुरी असते. पहिला गुण म्हणजे मनात सर्वांविषयी प्रेम पाहिजे. दुसरा गुण म्हणजे ज्ञान पाहिजे आणि तिसरा गुण म्हणजे काम करण्यासाठी शक्ती पाहिजे.
787दुसऱ्यांचे अश्रू थांबवावे, त्यांना हसवावे या आनंदासारखा दुसरा आनंद नाही.
788काळ हे दु:खावरील सर्वात मोठे औषध आहे. अश्रुंनी भरलेले डोळेही काळ पुसून टाकतो.
789जो वेळ वाया घालवतो त्याच्याजवळ गमवायलाही काही उरत नाही.
790असामान्य माणसाची तीन लक्षणे असतात. तो चुकीचे काम करत नसल्याने त्याला चिंता नसते, त्याच्याकडे ठाम विचार असल्याने त्याच्या मनात गोंधळ नसतो आणि तो शूर असल्याने त्याला कशाचीही पर्वा, भीती नसते.
791वेळप्रसंगी हळवेपणा बाजुला ठेवून वास्तवाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा.
792स्वत:चे ध्येय हेच स्वत:चे जीवनकार्य समजा. प्रत्येक क्षणी त्या ध्येयाचे चिंतन करा.
793त्याचेच स्वप्न पहा आणि त्याचाच आधारही घ्या.
794‘स्व’ चा शोध घेण्यास ‘स्व’ बद्दलचे सत्य मत लागते.
795तुमची प्रतिष्ठा जेवढी मोठी तेवढीच तुमची बदनामी जास्त.
796पापी माणसाला पाप कधीही शांतपणे झोपू देत नाही.
797सुधारणा ही बाहेरुन लादता येत नाही, तिचा उगम आतूनच पाहिजे. भीती घालून कुणालाही सदगुणी बनवता येत नाही.
798अविजय हाच आयुष्यातला सर्वात मोठा विजय असतो.
799गैरसमज कधीही मनात ठेवू नये. त्याचे निराकरण करावे.
800ज्याच्याजवळ पैशाशिवाय दुसरे काहीच नाही तो सर्वात गरीब!
801जेव्हा मनुष्याकडील धन नष्ट होते, तेव्हा वास्तविक त्याचे काहीच नष्ट होत नाही. जेव्हा मनुष्याचे आरोग्य बिघडते, तेव्हा त्याचे काहीतरी नष्ट होते. परंतु, जेव्हा मनुष्याचे चारित्र्य बदनाम होते तेव्हा त्याचे सर्वस्व नष्ट होते.
802एखाद्या गोष्टीचा आरंभ केव्हा करावा हे समजायला हवे आणि शेवट केव्हा करावा हेही समजायला हवे.
803कधीकधी अपमान सहन केल्याने कमीपणा येत नाही; उलट आपले सामर्थ्य वाढते.
804परिश्रमाशिवाय प्रारब्ध पांगळे असते.
805देशातील प्रत्येक व्यक्तीला जोपर्यंत स्वत:च्या कर्तव्याची जाणीव होत नाही किंवा ती जाणीव होऊनही
806त्यानुसार वागावेसे वाटत नाही, तोपर्यंत त्या देशाचा उध्दार होणे कठीण असते.
807तारुण्यातील बेछूट वर्तन हे वृध्दापकाळाच्या नावावर काढलेले कर्ज असते. वृध्दापकाळात ते सव्याज फेडावे लागते.
808जे अवास्तव अपेक्षा करीत नाहीत ते खरे भाग्यवान ! कारण त्यांच्यावर निराश होण्याची पाळीच येत नाही.
809शहाणा मनुष्य स्वत:च्या उत्पन्नाप्रमाणेच स्वत:चे जीवन जगतो.
810प्रत्येक माणसाचा सर्वात मोठा शत्रू तो स्वत:च असतो.
811विश्वास म्हणजे मनुष्याला जीवंत ठेवणारी शक्ती होय.
812चंद्र व चंदनापेक्षाही सज्जनांचा सहवास अधिक शितल असतो.
813जर तुम्ही परमेश्वराचे प्रिय होऊ इच्छित असाल, तर त्याच्याकडे काही मागू नका.
814त्याने जे दिले आहे त्याबद्दल त्याचे आभार माना.
815विचार हेतूकडे नेतो, हेतू कृतीकडे नेतो, कृतीमुळेच सवय लागते, सवयीमुळे स्वभाव बनतो.
816मृत्यूला सांगाव, ये ! कुठल्याही रुपाने ये. पण जगण्यासारखं काहीतरी जोपर्यंत माझ्याकडे आहे तोपर्यंत तुला या दाराबाहेर थांबावं लागेल.
817जगातील प्रत्येक घर हे शाळा आहे, आणि माता पिता हे शिक्षक !
818स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंतकाळाची माता असते.
819ज्यांना नमस्कार करायला जागा नाही अशी माणसं अभागी आणि जागा असूनही.
820ज्यांना नमस्कार करता येत नाही ती निव्वळ कपाळकरंटी.
821सर्वात चांगले पाहूणे तेच की जे कधीच पाहूणचार घेत नाहीत. येतो म्हणतात पण येत नाहीत.
822नदीचे पाणी आटल्यावर पाय न भिजवता नदी पार करु शकू असं म्हणून मुर्खासारखं थांबण्यापेक्षा नदीच्या पात्रात उडी घेऊन, प्रवाह कापून नदी पार करणे शहाणपणाचे असते.
823धर्माच्या नावाने मुक्या प्राण्यांचा बळी देऊ नका. मुक्या प्राण्यांच्या जीवाशी खेळणे हा अधर्म आहे.
824हुंडा घेऊन लग्न करणे म्हणजे स्वत:ची विक्री केल्यासारखे आहे.
825या जगात एकच जात आहे- माणूस ! आणि धर्मही एकच- माणूसकी!
826परिस्थितीच्या अधीन होऊ नका, परिस्थितीवर मात करा.
827कला म्हणजे सत्य, शिव आणि सुंदर यांचे संमेलन.
828नवीन गोष्ट शिकण्याची ज्याची उमेद गेली तो म्हातारा.
829खरा तो एकचि धर्म । जगाला प्रेम अर्पावे ॥
830ध्येयवादाला स्वत:च्या ह्रदयातील उतावळेपणाचे भय असते. म्हणूनच, कोणत्याही कामात उतावळेपणा करु नका; संयम पाळा.
831ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे. भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे. आणि ज्ञान, भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे.
832आपले अंत:करण जोपर्यंत शुध्द आहे तोपर्यंत कशाचीही भीती बाळगण्याची जरुरी नाही.
833पुस्तकांच्या सहवासात शांत आयुष्य वेचण्यासारखा दुसरा आनंद नाही.
834ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा । काय भुललासी वरलिया रंगा ॥
835स्पर्श न करता विद्यार्थ्याला शिक्षा करता येते तोच खरा शिक्षक !
836जीवन हे यश आणि अपयशाचे परिणाम आहे.
837समाजाचा विकास केवळ सत्तेने होत नाही तो आदर्श शिक्षाकांमुळे होतो.
838ज्याला या ह्रदयीचे त्या ह्रदयी देता येते तोच खरा शिक्षक.
839महापुरुषांची चरित्रे आणि आत्मचरित्रे ज्यांच्याशी बोलतात त्यांना स्वतंत्र चरित्र प्राप्त होते.
840माणसे जन्मतात आणि मरतात, पण विचार जन्मतात आणि कधीच मरत नाही.
841गंजण्यापेक्षा झिजणे केव्हाही चांगले !
842यशाजवळ पोहोचण्यासाठी कधीही शॉर्टकट नसतो.
843आयुष्यात नशीबाचा भाग फक्त एक टक्का आणि परिश्रमाचा भाग नव्याण्णव टक्के असतो.
844आपण वाऱ्याची दिशा बदलू शकत नाही. परंतू. आपला पतंग मात्र निश्चितच नियंत्रित करु शकतो.
845मी करतो या भावनेचे नाव प्रपंच, तर परमेश्वर माझ्याकडून करवून घेतो या भावनेचे नाव परमार्थ !
846विश्वासाशिवाय भक्ती होत नाही, भक्ती शिवाय भगवान प्रसन्न होत नाही व भगवंताच्या कृपेशिवाय जीवनात शांती निर्माण होत नाही.
847मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.
848आयुष्यात तुम्ही किती अनादी आहात ते महत्त्वाचं नाही तर तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत याला महत्त्व आहे.
849शब्दांमुळे माणसे जुळतात आणि तुटतातही म्हणून शब्दांची किमत समजून घ्या. आहात तोपर्यंत चार प्रेमाचे शब्द वापरा तेच कामी येतील.
850तरुण स्त्रीला नुसती नवऱ्याची बायको होऊन चालत नाही तर कधी त्याची प्रेयसी, कधी बहिण फार तर काय कधीकधी आईही व्हावे लागते. कारण स्त्री शक्ती रुपीणी आहे.
851जर आपण आपल्या कामाला आनंदाने स्वीकारले नाही तर काम कधीतरी आपल्याला चांगलाच आनंद देईल.
852जीभ हि दोन माणसात बसवते अन दोन माणसातून उठवते म्हणून शब्दांचा वापर व्यवस्थित करावा.
853जो दुसऱ्यावर विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला.
854क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे.
855उद्यासाठीची सर्वात चांगली तयारी म्हणजे वर्तमानातील तुमचे सर्वोत्तम प्रयत्न होय.
856आपण किती जगलो यापेक्षा आपण कसे जगलो याचा विचार करा. दुर्बल माणूस कायम भीती बाळगतो तर शूर कायम ताठ मानेने जगतो.
857भूतकाळात भटकत राहणे किंवा भविष्याबद्दल चिंता करणे यापेक्षा आजचा आलेला अनमोल क्षण सर्वोत्तम काम करून व्यतीत करा; मग यश तुमचेच.
858अगदी सरळमार्गी असणे हेही एक प्रकारचे पापच आहे. हे पाप कालांतराने मनुष्याच्या दुर्बलतेचे कारण बनते.
859ज्या माणसाकडे चांगल्या विचारांचा भक्कम पाया नाही, त्याची आयुष्याची इमारत उभीच राहू शकत नाही.
860सुखी जीवनाची गुरुकिल्ली म्हणजे: पाप होईल इतके कमाउ नये, आजारी पडू इतके खाऊ नये, कर्ज होईल इतके खर्चू नये, आणि भांडण होईल इतके बोलू नये.
861व्यक्तिमत्त्व सुंदर नसेल तर दिसण्याला काहीच अर्थ नाही. कारण सुंदर दिसण्यात आणि सुंदर असण्यात खूप फरक असतो.
862व्यर्थ गोष्टीची कारणे शोधू नका, आहे तो परिणाम स्वीकारा. अश्रू येणे हे माणसाला हृदय असल्याचे द्योतक आहे.
863खूप कमी लोक आपल्या आयुष्यात सुख आणि आशीर्वाद घेऊन येतात,पण खूप जास्त लोक आपल्याला कटू अनुभव आणि शिकवण देण्यासाठी येतात.
864सर्वात मोठा गुरुमंत्र म्हणजे, आपले गुपित कुणालाही सांगू नका ते तुम्हाला हानिकारक आहे.
865ज्या व्यक्तीने कुठलीही चूक केली नाही त्या व्यक्तीने काहीही नवीन करण्याचा प्रयत्नच केला नाही.
866आनंदी राहायच असेल तर अपेक्षा स्वतः कडून ठेवा, समोरच्यांकडून नव्हे. 
867केस वाढवून देवानंद होण्यापेक्षा ज्ञान वाढवून विवेकानंद व्हा. 
868दिवसात तुम्हाला एकही समस्या आली नसेल तर तुम्ही चुकीच्या रस्त्यावरून जात आहात, असे समजावे. 
869दुःख विभागल्याने कमी होत आणि सुख विभागल्याने वाढते. 
870अज्ञानी असणं तेवढं शर्मेच नाही जेवढं काहीही शिकण्याची इच्छा न ठेवणं. 
871कुठल्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल, तर अपयश पचविण्यास शिका. 
872मित्र परिवारासारखे असावेत म्हणजे आयुष्याचे सोन होत. 
873तुमचं आनंदी राहणंच तुमच्या शत्रुकरिता सर्वात मोठी शिक्षा आहे.
874प्रत्येक पतंगीला माहिती असत कि शेवटी कचऱ्यात जायचंय, पण त्याच्याअगोदर आकाश गाठायचंय. जीवन सुद्धा हेच मागत असत. 
875विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत. ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात.
876विद्वत्त्ता सगळ्यांत असत, त्यानुसार जगण्याच धेर्य मात्र सगळ्यात नसत.
877कष्टामुळे भविष्यकाळ चांगला होतो आणि आळसामुळे वर्तमानकाळ. 
878न हरता, न थकता, न थांबता प्रयत्न कारण्यासमोर कधी कधी नशीब सुद्धा हरतं.
879रोज काहीतरी उपयुक्त वाचून आत्मसात करायला शिका. 
880मनगटातली ताकद सपंली की माणूस हातामध्ये भविष्य शोधतो. 
881सर्वच प्रश्न सोडवून सुटत नसतात , काही प्रश्न सोडून दिले की सुटतात. 
882काम केल्याने माणूस मरत नाही, तो आळसानेच मरतो. 
883आपले नेमके ध्येय निश्चित करा आणि मगच प्रयत्नाला लागा. 
884जे आपण विचार करतो, तेच आपण बनत जातो.  
885विचार करूनही फायदा होत नसेल, तर खरंच विचार करायला हवा. 
886असं काम करा की नाव होऊन जाईल नाही तर असं नाव करा की लगेच काम होवून जाईल.
887तुम्ही ठरवलेल्या ध्येयावर जर लोक हसत नसतील तर तुमची ध्येय खूपच लहान आहेत हे लक्षात घ्या जोवर तुम्ही धावण्याच धाडस करणार नाहीत, तोवर स्पर्धेमध्ये जिंकणे तुमच्यासाठी नेहमीच अशक्य राहील. 
888आपल्याकडे काय आहे किंवा आपण कोण आहोत यावर सुख कधीच अवलंबून नसत. आपल्या मनात कोणते विचार चालू आहेत यावर सुख अवलंबून असत . चालून पाय थकायला नको म्हणून डोकं चालवतो तो खरा माणूस.
889माणुस घरे बदलतो , माणुस मित्र बदलतो , माणुस कपडे बदलतो , तरी तो दु :खी असतो  कारण तो आपला स्वभाव बदलत नाही.
890केवळ ज्ञान असून उपयोग नाही, ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं.चिंता ही कुठल्याच दुःखावरचा उपाय होऊ शकत नाही.
891यश न मिळणे याचा अर्थ अपयशी होणे असा नाही.
892विचारवंत होण्यापेक्षा आचारवंत व्हा.
893वेळेवर घेतलेल्या चांगल्या व सकारात्मक निर्णयाचा कधीच पश्चाताप होत नाही.
894आवड आणि आत्मविश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अवघड नाही.
895सुखी आणि आनंदी रहायचं असेल तर समाजात राहण्याचा प्रयत्न करा. एकटे रहाल तर दुखः पदरी पडेल. 
896पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा , पुत्री व्हावी ऐसी भागीरथी  तिन्ही कुळ उद्धरती.
897स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी.
898अपयश हि यशाची पहिली पायरी आहे.
899जग प्रेमाने जिंकता येतं, शत्रुत्वाने नाही. शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम. फक्त स्वत:साठी जगलास तर मेलास आणि स्वत:साठी जगून दुसऱ्यांसाठी जगलास तर जगलास !
900भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो; भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो पण आयुष्याचा आनंद फक्त वर्तमानकाळच देतो.
901आपण नेहमी आपल्या कमी असलेल्या माणसाकडे बघितले की आपल्याला कळते की आपण किती सुखी आहोत.
902दुसऱ्याच्या तोंडाला काळे फासताना प्रथम स्वतःच्या हाताला काळे लागते हे पाहा.
903कावळ्याने कधी कोकीळेशी बरोबरी करू नये कारण कोकीळा कुहू कुहूच गाणार आणि कावळा काव काव करून अपशकूनच करणार.
904नागाच्या दातात विष असते, माशीच्या सोंडेत विष असते पण माणूस हा इतका भयानक प्राणी आहे की, त्याच्या सर्वांगातच विष भिनलेले असते.
905माणसाला जीवनात पुस्तकी ज्ञानापेक्षा व्यावहारीक ज्ञानच जगायचे कसे ते शिकविते.
906माणूस जन्मल्यापासून मरेपर्यंत विद्यार्थी असतो.
907शाळा कॉलेजात प्रथम श्रेणीने पास झालेला माणूस जेव्हा जबाबदार व्यक्ती म्हणून व्यावहारिक जगात उतरतो तेव्हाच त्याने घेतलेल्या शिक्षणाचा खरा कस लागतो.
908भोपळ्याचा वेल मोडक्या काठ्यांच्या सहाय्यानेच वर चढतो पण वरती गेल्यावर सुद्धा काठ्यांना विसरत नाही. तसेच शिकून कितीही मोठा झाला तरी माणसाने त्याच्यासाठी ज्या ज्या हातांचे सहाय्य झाले आहे त्यांना अंतर देऊ नये.
909सरोवरात अनेक बदके पोहताना दिसतात. पण हंस मात्र एकच असतो.
910कळसाने पायाच्या दगडाला विसरू नये आणि दगडाने वरती कळसापर्यंत पोहचण्याची अपेक्षा करू नये.
911सत्तालालसेपायी माणूस आपल्या स्वतःला अनेक शत्रू निर्माण करतो.
912दुसऱ्याच्या अनुभवाने शहाणे होणे हे पण शहाणपणाचे असते.
913जगात चिरंजीव कोणीच नाही, शिवाय सप्तचिरंजीव मारुती, अश्वत्थामा, बिभिषण, परशुराम, कृपाचार्य, कार्तिकेय.
914आपण उच्चकुळीचा आणि दुसरा नीच कुळीचा अशा दृष्टीने राहू व वागू नये.
915घेतलेल्या विद्येचा योग्य वापर करा. मग तुमची ती विद्या विधायक असो अथवा विघातक.
916ज्ञानाने माणसाची विद्वत्ता वाढते पण सदाचार वाढतोच असे नाही. १६८. सुविद्य माणसाच्या मनात नेहमी सुविचारच असतात.
917मुलांनो सुविचार आचरणात आणा, केवळ वाचनासाठी पुस्तक संग्रह करू नका.
918अविरत परिश्रम करून मिळणाऱ्या यशाचा अमृत कुंभ हातात घेण्यापूर्वी हलाहल पचवावे लागते.
919लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा.
920आपल्या छोट्या घरातसुद्धा सुखामृत भरलेले असताना बाहेरील सुखाच्या मृगजळामागे जो धावतो तो एक मूर्ख होय.
921जो दुसऱ्यावरी विश्वासला त्याचा कार्यभाग बुडाला.
922सोन्याची सुरी मिळाली म्हणून कोणी गळा कापून घेत नाही.
923केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे.
924पुरुषाच्या हातावरच्या रेषा पहावयाच्या नसतात तर हातावरचे घठे बघावयाचे असतात.
925तोंडातून गेलेला शब्द दहा गाड्या पाठविल्या तरी परत येत नाही.
926तलवारीचा वार भरून निघतो. शब्दांचा घाव मात्र सतत मरण देत असतो.
927शरणागताला अभय द्या, वाटेवरच्या वाटसरूला पाणी द्या आणि घरी आलेल्या अतिथीला सुग्रास भोजन द्या हाच खरा गृहस्थधर्म.
928भवसागर तरून न्यायला गुरुवं लागतोच तेव्हा आपला गुरु कराल तो पारखूनच करा.
929प्रत्येकाला जीवनात तीन ऋण फेडायचे असतात. मातृऋण, पितृऋण आणि देशाचे ऋण.
930समाजात मिळून मिसळून रहा कारण ज्या समाजात तुम्ही रहाता त्याचेसुद्धा तुम्ही काही देणे आहात.
931मनी नाही भाव नी देवा मला पाव.
932जीवन जगाल तर पारिजातकाच्या फुलासारखे जगायचा प्रयत्न करा, साधे पण कोमल सौंदर्य तरीपण सुगंधी.
933जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुची शोधून पाहे.
934आपल्या संस्कृती मूल्यांचे जतन करा. तिची कबर खोदू नका.
935मातीशी इमानी रहा कारण शेवटी एक दिवस आपण पण त्याच मातीत जाणार आहोत.
936बाह्य रंगापेक्षा अंतरंग मोकळे ठेवा.
937मनात ठेवून कुढत रहाण्यापेक्षा चार शब्द स्पष्टपणे बोलून मन साफ ठेवा.
938झेप असावी गरुडाची, नजर असावी ससाण्याची, जिद्द असावी फिनीक्स पक्ष्याची राखेतून निर्माण होण्याची.
939वृक्षाचे संगोपन म्हणजे देशाचे व निसर्गाचे रक्षण करणे.
940मोकळा वेळ लष्कराच्या भाकऱ्या भाजण्यापेक्षा विघायक कामात खर्च करा.
941पाणी हे जीवन आहे ते जपून वापरा.
942लहान मुले मातीच्या गोळ्यासारखी असतात, त्यांना योग्य वळण आकार देणे तुमचे काम आहे.
943आजचे बालक उद्याचे नागरीक आहे. त्यादृष्टीने त्याला योग्य शिक्षण द्या.
944मुलांना मारून शिस्त लावण्यापेक्षा त्याच्या कलाने व प्रेमाने घ्या.
945खरे आणि खोटे यात फक्त चार बोटांचे अंतर असते.
946सद्गुण, सदाचार, सत्कार्य आणि सेवाभाव ही माणसाच्या जीवनाची चतुःसुत्री आहे.
947कुठलाही मनुष्य जात्या वाईट नसतो वाईट असते त्याची वृत्ती.
948जीवनात विचाराने वागल्यास पश्चातापाच्या आगीत जळावे लागत नाही.
949मोठ्या झाडाखाली लहान झाडे वाढत नाहीत.
950दाता कर्णासारखा असावा, भ्राता श्रीकृष्णासारखा असावा.
951कुठल्याही गोष्टीचा परामर्श हा बघावाच लागतो.
952फुटलेले मणी आणि तुटलेले मन सांधता येत नाही.
953वादळे झाली तरी सागर कधी आटत नाही.
954झटपट परिचय अंगाशी येण्याचा संभव जास्त.
955काम करायचे नसेल तर मोठ्या अटी घातल्या जातात.
956गवतापेक्षा कापूस हलका, कापसापेक्षाही याचक हलका पण वारा त्याला उडवून नेत नाही कारण वायाला भिती वाटते की याचक आपल्याकडे काही दान मागेल का?
957वेष असावा बावळा परी अंतरी असाव्या नाना कळा.
958भुंकणाऱ्या कुत्र्याला जर पोळीचा तुकडा टाकला तर तो गप्प बसतो तसेच स्वतःच्या स्वार्थासाठी विरोध करणाऱ्याला काही देऊन आपले काम साधावे.
959ज्या ठिकाणी ज्ञानी माणूस नसतो त्या ठिकाणी कमी शिकलेला माणूस ज्ञानी असतो.
960काव्याचा आनंद हा अमृताप्रमाणे असतो.
961पावसाला सुरुवात झाली की कोकीळा गात नाहीत तर बेडूक डराव डराव करतात. त्याचप्रमाणे ज्ञानी माणसांनी अज्ञानी माणसांसमोर गप्प रहाणे हे श्रेयस्कर असते.
962असंतोष हेच वैभवाचे प्रतिक आहे.
963कर्म हे च मनुष्याच्या बरोबर जात असते तेव्हा त्यानी ठरविले पाहिजे आपण चांगले कर्म करावे की कुकर्म करावे.
964ईश्वर हा एकच असून देव ही त्याची अनेक रूपे आहेत.
965प्रेमाचा ओलावा दुःखी हृदयाच्या माणसाला धन संपत्तीपेक्षा जास्त असतो.
966शत्रूबरोबर मैत्री राखणे ही प्रेमाची परीक्षा असते. हा गुण संपत्तीपेक्षा जास्त असतो.
967सुहास्य हा असा अलंकार आहे की तो कोणत्याही व्यक्तिच्या मुखकमलावर शोभा देतो.
968संकटे, दुःख, अडचणी याची माळच तयार असते. ती एका पाठोपाठ येत राहातात.
969सौंदर्याची स्तुती करणे हा आपण त्या व्यक्तिला दिलेला मानच होय.
970पराभवाने खचून न जाता पुन्हा त्याच धैर्याने उभे रहाणारा खरे जीवन जगू शकतो.
971वृक्ष हे तुमच्या माता पित्या समान असतात.
972वृक्षाने निसर्गाचा समतोल राहातो.
973काम, क्रोध, मत्सर, मोह हे माणसाचे शत्रू आहेत.
974सत्याचा मार्ग सुख समाधानाच्या वाटेने जातो.
975कोणचाही आदर्श ठेवताना तो आदर्श आहे की नाही हे पडताळून पाहा.
976सूर्याकडे पाहा ज्याप्रमाणे तो निर्मल व तेजस्वी असतो. त्याचप्रमाणे सज्जन माणूस अंर्तबाह्य असतो.
977तुम्हाला राग आला तर दहा अंक मोजा.
978राक्षसासारखी ताकद कधीही चांगलीच पण राक्षसी लालसा असू नये.
979माणूस हा मरेपर्यंत विद्यार्थीच असतो.
980स्त्रिची अब्रू ही काचेच्या भांड्यासारखे असते.
981मनुष्याला जीवनात जर पुढे यायचे असेल तर आत्मविश्वास, इच्छाशक्ती, दृढ निर्णय या तीन गोष्टी असायलाच हव्यात.
982काही गोष्टी काहीजणांना निसर्गदत्त देणगीने प्राप्त असतात तर याच गोष्टीच्या प्राप्तीसाठी इतरांना परिश्रम करावे लागतात.
983प्रगतीसाठी कुटुंबातून चांगल्या मार्गदर्शनाची गरज असते.
984मानसिक स्वास्थ्य हा मानवी जीवनातील सुखाचा फार मोठा महत्त्वाचा भाग आहे.
985कलात्मक सौंदर्य निर्मितीचा आनंद हा प्रत्येकाने आपल्या आयुष्यात भरभरून घ्यावयास हवा.
986ज्या गोष्टी तुम्ही मुलांना शिकविणार आहात त्याचे प्रथम आचरण तुमच्याकडून व्हावयास हवे.
987माणसाने जीवन म्हणजे एक घड्याळच आहे फक्त त्याची किल्ली परमेश्वराच्या हातात आहे.
988डॉक्टर तुम्हाला एखाद्या रोगातून मुक्त करण्याचा प्रयत्न करतो पण तो आयुष्य वाढविणारा धन्वंतरी नव्हे.
989मंगळसूत्राच्या चार काळ्या मण्यांनी स्त्रिच्या गळ्याला जी शोभा येते ती इतर कोणत्याही गळेसरीने येत नाही.
990राजा हा प्रजेचा पालनकर्ता आहे त्याला स्वतःचे अस्तित्व नसतेच.
991घरच्या गोष्टीचे ज्याला योग्य निर्णय घेता येत नाहीत तो इतरांना काय सल्ला देणार.
992लग्न हा सुख दुःखाचा डोह आहे, केवळ कामपिपासूपणा नाही.
993ज्याला चार भिंतीचा आसरा असतो, तो मनुष्य आपले निर्णय स्वतः घेऊ शकतो.
994जेथे सुख, समाधान, हास्य आणि मनमिळावूपणा असतो त्याला घर म्हणतात नाहीतर चार भिंती आणि वरती छप्पर असलेले घर हे कोंडवाडा होऊ शकते.
995एखाद्या निर्णयाप्रत पोचायचे असेल तर प्रत्येक गोष्टीचा परामर्श घेतला पाहिजे.
996माणसाने नेहमी विरुद्ध बाजूसुद्धा धरून चालावी म्हणजे अपयश आले तरी सहन करण्याची ताकद येते.
997तुम्ही केलेले सुकर्म हे तुमच्या पुढील अन्यायासाठी उपयोगी पडते आणि गेल्या जन्मी केलेल्या पाप-पुण्याची फेड करण्यासाठी मानव जन्म मिळत असतो.
998चौदा लक्ष योनीतून फिरून मानव जन्म येत असतो. तेव्हा हे जिवा सत्कर्म कर, मोहमायेच्या पाठी लागून आयुष्याचे नुकसान करू नको.
999काळ हा नाशिवंत आहे. आपले आयुष्यसुद्धा उगवणाऱ्या दिवसानुसार कमी होत असते. तेव्हा एखाद्या गोष्टीचा निर्णय घेताना सारासार विचार करा नाहीतर नंतर पश्चाताप करण्याची वेळ येते.
1000विद्यार्थी दशेतील काळ विद्यार्जनाच्या दृष्टीने फार महत्त्वाचा असतो.
1001शाळा व कॉलेज ही दोन्ही म्हणजे चैतन्यानी बहरलेली बाग होय.
1002वाढदिवस साजरा करताना आयुष्यातील एक वर्ष सरले म्हणून रडावे व एका वर्षाने अधिकच सुसंस्कृत झालो म्हणून हसावे.
1003वाढदिवस साजरा करणारा प्रत्येक माणूस हा किती अज्ञानी असतो कारण दर वाढदिवसागणिक मृत्युही एकेक पाऊल पुढे सरकत असतो हे त्याला माहीत नसते.
1004उन्मत्त पिसाराप्रमाणे वागणाऱ्या माणसाला माहित नसते की नियती नावाची अज्ञात शक्ती आहे जी बघता बघता एखाद्याला वाघाची शेळी बनवते.
1005औषध जपून आणि काळजीपूर्वक वापरात, कारण औषधाचा वाजवीपेक्षा जास्त डोस झाला की औषधपण विष होते.
1006आजच्या जगात स्त्री आणि पुरुष बरोबरीने सर्व क्षेत्रात वावरत. आहे तरी अजूनही स्त्री ही पूर्वीचाच ‘स्त्री’ राहिली आहे.
1007परिस्थितीचे फासे उलटे पडले की सापाची गोगलगाय व्हायला वेळ लागत नाही.
1008अक्करमाशी सर्पाची जात ही सर्पाच्या जातीतील अतिशय घातकी आहे तशीच लावालावी करून घर, मन उध्वस्त करणारी माणसे समजावीत.
1009तुम्ही साहित्यिक विचारवंत वा लेखक नसणार पण तुमची कला जर चांगली असेल तर तिची जोपासना करायला हवी कारण आजच्या या शिदोरीतून उद्याचा मोठा माणूस घडणार असतो, जसे कळीचे . फुल बनते तसे.
1010कोणतीही कला ही निसर्गदत्त देणगी आहे, पण त्या देणगीचा विकास करणे माणसाचे कर्तव्य आहे.
1011जी गोष्ट तुम्हाला मिळवायची आहे ती मिळविताना झगडावे लागले तरी चालेल पण झगडा वस्तू मिळेपर्यंत चालू ठेवा नाहीतर तुम्ही जीवन जगण्यास नामर्द ठराल.
1012जेव्हा तुम्ही जन्माला येता तेव्हा तुमच्या जीवावर अनेकांचा हक्क असतो आणि त्यामुळे तुमच्या जीवाचं बरं वाईट करण्याचा तुम्हाला अधिकार नसतो.
1013माणूस लिहितो म्हणजे तरी काय? ते एक प्रकारचे त्याचे अनुभवच असतात.
1014माणसाच्या वृत्ती वाईट असतात त्या वृत्तीचा तिरस्कार करा. माणसाचा नको.
1015साहित्य ही जीवनाची नक्कल नव्हे तर ते भावी दर्शन होय. जीवनाच्या हेतूसाठी ते जीवनाला अनुरूप बनवते.
1016कला म्हणजे पूर्णतः कला परिपूर्णतेची अपेक्षा करते. खूप वाचा उत्तमोत्तम वाचा.
1017सुख हा सुगंध आहे. तो दुसऱ्यावर शिंपीत असता स्वतःवरही शिंपला जातो.
1018प्रसंग पुष्कळांना वळण लावतात पण प्रसंगाला वळण लावणारा एखादाच.
1019ढीगभर आश्वासनापेक्षा टीचभर मदत बरी.
1020कलहामुळे घर बुडते, वाईट वर्तणूकीने स्नेह बुडतो, वाईट राजामुळे देश लयास जातो आणि वाईट कर्मानी सुकिर्तीचा नाश होतो.
1021मुलांच्या बाबतीत प्रश्नचिन्ह निर्माण होतात ती मुलांमुळे नव्हे तर पालकांमुळे.
1022अनर्थ होऊ नये म्हणून तुमच्या गुणांवर जी पांघरूण घालते ती माया.
1023जात, कुळ, खानदान, धर्म हे सर्व माणसाने स्वतःच्या स्वार्थासाठी निर्माण केलेत जगात! जगात जाती फक्त दोनच आहेत स्त्री-पुरुष!
1024मुलीला आईचं हृदय-आईची माया त्याच वेळी कळते जेव्हा ती आई होते. आणि त्या अनुभवातून जाते तेव्हा.
1025तुमचे साहित्य तुम्हाला निर्माण करायचे तेव्हा त्याची मांडणी, त्यासाठी लागणारे सर्व साहित्य आणि आपल्या साहित्यांचा मालमसाला यांची जोडणी तुम्हीच करायला हवी आणि ते आर्थिक आकर्षण करण्यासाठी व्यावहारिक जगाकडे चौकस लक्ष ठेवायला हवे.
1026कडुलिंबाचा रस कितीही कडू असला तरी त्याचा परिणाम उत्तमच.
1027हे जग म्हणजे रंगभूमीच. जी नाटकं होतात त्याचा कर्ता करविता परमेश्वरच आहे.
1028जुळलेली मने केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी जो घरचाच माणूस तोडतो त्या घरभेद्याला घरात स्थान म्हणजे सापाला दूध पाजण्यासारखे आहे.
1029ज्याला गुणांची थोरवी माहित नसते त्याने कोणाचीही निंदा करता कामा नये.
1030उच्चत्व हे गुणांमुळे प्राप्त होते ते केवळ उच्चासनावर बसण्यामुळे नाही राजप्रसादाच्या शिखरावर बसणारा कावळा कधीतरी गरुड बनू शकेल काय?
1031बेंबीत कस्तुरी घेऊन फिरणाऱ्या त्या कस्तुरीमृगाला माहित नसते की आपल्याकडे कस्तुरी आहे कारण त्या वासाने धुंद होऊन तो त्या वासाच्या शोधार्थ पळत राहतो. तसं एखाद्या विद्वानाला त्याच्यातील विद्वत्तेच्या कस्तुरीचा पत्ताच नसतो.
1032लक्ष्मी चंचल आहे ती एका जागी कधीच स्थिर रहात नाही. तर सरस्वती (विद्या) मात्र तुमच्याशी इमान राखून मरेपर्यंत सोबत करते.
1033सर्वसामान्यपणे लक्ष्मी आणि सरस्वती या कधीच एकत्र नांदत नाहीत.
1034अधिक मित्र हवे असतील तर दुसऱ्यांच्या गुणांचे मनापासून कौतुक करा.
1035अप्पलपोटे पण हे सर्व पापांचे माहेरघर आहे. मी आणि ‘माझे’ याचाच जप सदोदीत करणारे अंतःकरण अपवित्र होय.
1036चंद्राकडे जसे चांदणीचे आकर्षण असते तसेच विद्याभ्यासाकडेच विद्यार्थ्याचे आकर्षण असते.
1037जिज्ञासा, कौतुकवृत्ती यात साहित्याचा आत्मा आहे.
1038फुलपाखराचे पंख कापू नका, त्यांना बांधू नका असे शिकविणारे आई-बापच आपल्या इच्छेप्रमाणे आपल्या मुलांना वाकवून, वागवून त्यांचे उत्साहाचे प्रगतीचे पंख कापत असतात आणि त्यांच्या कलाने त्यांना शिक्षण न देऊन त्यांची मानसिक कोंडी करतात.त्यांना हे माहित नसते की आपली मुलंसुद्धा फुलपाखराचं प्रतीक आहेत.
1039माणूस आणि प्राणी यांच्यात फरक आहे कारण परमेश्वराने त्यांना वाचा आणि बुद्धी अशा दोन अमोल देणग्या दिल्या आहेत. पण जो माणूस याचा दुरूपयोग करतो तो पशू या कोटीतच गणला जातो.
1040परिक्षा ही विद्यार्थ्याच्या गुणवत्तेची चाचणी असते. तुम्ही जर त्या वेळी कॉपी करून लेखन केलेत तर तुमचा तोटा तुम्हीच करून घेत असता.
1041विद्वानाची सर्वत्र पूजा होते पण मूर्खाची मात्र निंदाच होत असते.
1042एखाद्या गुन्हेगाराच्या मनातसुद्धा माणूस वसलेला असतो पण त्याच्या कपाळावर लावलेल्या गुन्हेगारीच्या पट्टीमुळे समाजाकडून त्याची सतत अवहेलना होत राहाते पण एखादा उच्च गणल्या जाणाऱ्या माणसाच्या मनात जर गुन्हेगार वावरत असेल तर मात्र समाज त्याचे काही करत नाही किंवा त्याच्या विरुद्ध आवाज पण उठवू शकत नाही.
1043टिटवी देखील समुद्र आखते.
1044सुविचार हे केवळ फळ्यावर लिहिण्यासाठी नाहीतर तर ते रोजच्या जीवनात आचारण्यासाठी आहेत,.
1045आईच्या डोळ्यातील रागाच्या पाठीमागे वात्सल्याचे सागर उचंबळत असतात.
1046आई असेपर्यंत तिची किंमत वाटत नाही पण ती गेल्यावर मात्र जगात कशाचीच किंवा स्वतःच्या जगण्याची पण किंमत वाटत नाही.
1047लहान लहान बोबड्या बाळाच्या ओठातून व अंतःकरणातून दिसून . येणारा परमेश्वर जणू आईच.
1048आईला सर्व दोषांसकट मुल गोड वाटते.
1049आई असंख्य काव्य जगते पण ती एकसुद्धा कविता लिहू शकत नाही, मातेच्या हृदयात जे गाणे मूकपणे वावरत असते, तेच मुलाच्या ओठावर नाचत असते.
1050अपत्य संगोपन हा स्वार्थ, त्याग व सेवा याचा अस्सल नमुना.
1051माता मुलासाठी सर्व दिवस अविश्रांत कष्ट करीत राहते. मुले तिचे उपकार मानत नाहीत. उलट तिच्यावर चरफडतात, तिचा अपमान करतात पण त्याचे तिला काही वाटत नाही.
1052स्त्रीला मातृत्वाची पदवी प्रदान करणारे जे बालक किती श्रेष्ठ कारण त्याच्यामुळेच ती जगात आई होते.
1053ज्याला गुलाबाचे फुल हवे त्याने काटे लागले तरी सहन करण्याची तयारी ठेवायला हवी.
1054सूर्यफूल जसं किरणानी उमलते फुलते तसेच ध्येयाच्या दिशेनेच वाटचाल करणाऱ्या माणसाचे जीवन फुलू शकते.
1055ईश्वर हा एकच आहे पण कोणी त्याला अल्ला, येशू, गुरूसाहेब किंवा भगवान म्हणत असतात.
1056दुसऱ्याचं वाईट चिंतणारा माणूस हा स्वतःच द्वेषाच्या जाळ्यात गुरफटत असतो.
1057शत्रूपुत्र शत्रूच होतो. आणि शत्रूला केव्हाही मृत्युदंडच योग्य. पण मित्रताच सुंदर, शांत आणि प्रगतीशील आत्मा होते आणि मृत्युदंड देऊनसुद्धा शत्रूता वाढतच राहते तेव्हा मित्रता राखूनच राजकारण चालवावे.
1058शत्रूला मृत्युपेक्षा मैत्रीचा हात पुढे करा.
1059दुसऱ्यासाठी मेलास तर जगलास, स्वतःसाठी जगलास तर मेलास.
1060काटेरी शब्दांच्या वागण्यानी एखाद्याने मन/हृदय घायाळ करणे हे एक प्रकारचे माणसाचा जिवंतपणी खून करण्यासारखे आहे.
1061अक्कल केव्हाही मेंदूत असावी गुडघ्यात असू नये.
1062खुर्चीलाही मन असते पण ते मन खुर्चीत बसणाऱ्या वेगवेगळ्या माणसाच्या मनोवृत्तीप्रमाणे बदलत असते.
1063कधी कधी साप्ताहिकातील न सुटणाऱ्या शब्दकोड्याप्रमाणे माणसाला स्वतःच्या जीवनाचे कोडे उलगडत नाही.
1064कॉलेज ही प्रत्येक शालेय विद्यार्थ्याच्या जीवनातील लॉटरी आहे ती ज्याला लागते त्यालाच कॉलेजच्या विश्वात प्रवेश मिळतो.
1065काटेरी मनाच्या माणसाच्या हृदयातसुद्धा काटेरी फणसातील रसाळ गऱ्याप्रमाणे गोडवा असतो.
1066जगात माणसाला किंमत नसते, निश्चयाला असते. मन खरे कोणाचे जो आपल्या मनाकरीता मरण्यास तयार होतो.
1067जगात फक्त ज्ञानाची किंमत होते अज्ञानाची नाही.
1068संपादन केलेले ज्ञान ज्याला आचरणात आणता येत नाही तो एक पढत मूर्खच.
1069ज्ञान म्हणजे तरी काय अनुभवाचे परिपक्व झालेले आयुष्याचे सार होय.
1070अज्ञान हेच माणसाच्या संशयाचे सार असते.
1071रिकामपणीचा वेळ लष्कराच्या भाकऱ्या भाजण्यापेक्षा चिंतन, नामस्मरण, जप यात व्यतीत केला तर आयुष्याचे सार्थक होईल.
1072सुदृढ शरीर व निरोगी मन हीच माणसाची खरी दौलत आहे.
1073दुःखी माणसाविषयी नुसती सहानभूती दाखवण्यापेक्षा आपण स्वतः त्याच्यापेक्षा दुःखी होणे बरे.
1074पैशाने अडलेल्या आणि परिस्थितीने गांजलेल्या माणसावर कोरड्या उपदेशाचे बाण सोडण्यापेक्षा तुम्हाला होईल तेवढी मदत केलीत तर ते जास्त श्रेयस्कर.
1075तुमच्या आश्रयार्थी आलेल्या माणसाला आश्रय द्यायचा नसेल तर देऊ नका पण आश्रय देऊन कटू शब्द बोलून व काबाडकष्ट करवून घेऊन त्याच्या शरीराला व मनाला शिणवू नका.
1076माणूस हा उत्तम नट आहे आणि आयुष्यभर तो नाटकच करत असतोच.
1077मुक्या मारापेक्षाही मुके दुःख जास्त असहाय्य असते.
1078‘मी दुःखी आहे, मी दुःखी आहे.’ असा आपल्या दुःखाचा डांगोरा पिटीत जगण्यापेक्षा दुःख मुकपणे सोसायला शिका नाहीतर रोज मरे त्याला कोण रडे असे म्हणून लोक तुमच्याकडे दुर्लक्षच करतील.
1079झोपलेल्याला जागे करता येते पण झोपेचे सोंग घेतलेल्याला कसे उठविणार?
1080आपल्या परिस्थितीत मिळणारी सुखे न उपभोगता अशक्य असलेल्या सुखाचा हव्यास धरून जर त्या मागे धावलात तर मृगजळामागे धावल्यासारखे होईल.
1081आपण जीभेच्या ताब्यात जाण्यापेक्षा जीभेला आपल्या ताब्यात ठेवा नाहीतर चविष्ट खाण्यामागे धावून शेवटी पिंजऱ्यात सापडलेल्या उंदरात आणि तुमच्यात काही फरक नाही.
1082देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवशी, देणायांचे हात घ्यावे, म्हणजे त्या दात्याचा दातृत्व हा जो गुण आहे तो घ्यावा कारण दातृत्वच खरे सुख आहे.
1083सोने हे घणाचे घाव सोसून अधिक चकचकीत होत जाते तसेच दुःखाचे घाव सोसून माणूस अधिक दृढ आणि अधिक निडर होत असतो.
1084अत्तर लावताना ते लावणाऱ्याच्या हाताला लागते, सुखाचेही तसेच आहे दुसऱ्याला सुख देताना ते आपल्याला मिळते.
1085सुख-दुःखात भेद कोणता, सुखाला भागीदार मिळाले तर ते वाढते, दुःखात जर कोणी वाटेकरी झाले तर ते कमी होते.
1086मतभेदामुळे कलावंताचा नाश कलावंतच करतात.
1087पराक्रम करता येईल असे दिसले तर त्याचा शोक न करता प्रतिकार करावा. दुःखावर औषध हेच की त्याचे एकसारखे चिंतन करीत बसू नये.
1088आयुष्यात दुःखे दोन प्रकारात आहेत, एक जे हवे ते मिळणे आणि दुसरे हवे ते न मिळणे.
1089आशावादी विसरण्याकरता हसतो आणि निराशावादी हसण्याचे विसरून जातो.
1090सुख-दुःख हे प्रत्येकाच्या कर्माचे फळ असते. आणि आपल्या चांगल्या वाईट कर्मानुसार तो सुख-दुःख उपभोगत असतो.
1091आपल्या सुख-दुःखात जो आपल्या इतकाच समरस, सहभागी तोच खरा मित्र व या उलट वर्तणूक म्हणजे शत्रूचे लक्षण.
1092ज्ञानाचा गर्व झाला की सुख न होता दुःखच होते.
1093श्रीमंत जर पैशाप्रमाणे मनानेही श्रीमंत झाला तरच खरा श्रीमंत नाहीतर पैशाच्या बळावर उद्दाम झालेला तो पशूच.
1094माणसाचे शरीर रोगी असेल तर ते बरे करता येते पण आत्मा कधीही रोगी होता कामा नये आणि आत्मा निरोगी राहण्यासाठी माणसाचे मन स्वच्छ आणि संस्कारक्षम असणे आवश्यक आहे.
1095साहित्य हे जीवनाची नक्कल नव्हे तर ते भावी दर्शन होय. जीवनाच्या हेतूसाठी ते जीवनाला अनुरूप आहे.
1096पाणी माणसाचे जीवन आहे.
1097आयुष्य हे जगण्यासाठी आहे जीवनातील अडीअडचणी, दुःख, निराशा यांनी गांजून भ्याडासारखी आत्महत्या करून संपविण्यासाठी नव्हे.
1098माणसाने आपले जीवन सतत कसे फुलेल याकडे लक्ष दिले पाहिजे. झाडावर उमलणाऱ्या कळ्यांना कोठे माहित असते की आपले जीवन देवाच्या चरणावर आहे की पायदळी तुडवले जाणार आहे कि निर्माल्य होऊन कुस्करले जाणार पण संकटाच्या भितीने कळ्या कधी फुलण्याचे सोडत नाहीत.
1099कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी ते वाकडेच सरळ होत नाही तसेच दुष्ट माणसाचे अंतःकरण उपदेश करूनसुद्धा कोमल होत नाही.
1100ज्याला बागेत वाढणारा मोगरा आणि कुंपणावर वाढणारी कोरांटी यातील फरक कळत नाही त्याला जीवनातील बऱ्या-वाईटची जडण घडण काय कळणार.
1101मानवी सृष्टीचा नियम काही अजबच आहे तो नवजात अर्भक काय हसत असतो पण जन्माला आलेला तो जीव रडत असतो आणि दिवंगताच्या आपल्या माणसाच्या सांत्वनासाठी माणूस जातो तेव्हा जीव गेलेला असतो आणि त्याची सारी माणसे रडत असतात.
1102माणसाला वरचे बोलावणे आले की त्याची इच्छा असो वा नसो त्याला जावेच लागते.
1103कला रंजनाचा हेतू रंजना पलिकडे जाता येत नाही.
1104तुमच्या मुलाचे बौद्धिक इतपतच की ते त्याच्या बुद्धीला पचले पाहिजे आणि मेंदूला रुचले पाहिजे.
1105कविता हे ज्ञानपुण्याचे अत्तर आहे.
1106अनिवार्य भावनेचा सहज स्फूर्ती उद्रेक म्हणजे काव्य.
1107प्रतिभा ही अनंत परिश्रमाने सामावलेली असते.
1108प्रतिभा संपन्न व्यक्ती प्रचलित नियम झुगारून देतात ते त्या ठिकाणी नविन नियम करण्यासाठीच.
1109डोक्यावर जणू दुःखाचा मुकुट चढवून सुख मनुष्यापुढे उभे ठाकते, जो सुखाचे स्वागत करतो त्याने दुःखाचेही स्वागत केलेच पाहिजे.
1110आईच्या दुधाची चव काही न्यारीच असते. ते नुसते दूध नसते. त्यात प्रेम व वात्सल्य असते.
1111हे जग भेकड माणसासाठी नाही, पळून जाण्याचा प्रयत्न करू नका, जयापजयाची पर्वा करू नका.
1112सर्व कामाच्या यशाची किल्ली त्या त्या कामात एकाग्र म्हणजे तल्लीन होऊन इतर सर्व गोष्टीब्दल भान विसरण्यात आहे.
1113स्वतः मंगल होऊन मंगलाची सेवा करणे हे आपले ध्येय आहे, मनुष्यातील मंगलता म्हणजेच चारित्र्य.
1114क्रांती ही रक्तरंजित असते आणि क्रांतीशिवाय इतिहास नाही.
1115लोकशाही म्हणजे माणसाना मेंढरासारखं वागायला लावणारी अवस्था खास नव्हे.
1116यश प्राप्तीला असंतोष हे कारण आहे. संतुष्ट मनुष्य राजकारणात निरुपयोगी आहे.
1117आंतरीक जागरूकता हीच स्वातंत्र्याची किंमत असते.
1118सत्ता ही अशी नशा आहे की ती माणसाला स्वर्गाला तरी पोचवते नाहीतर रसातळाला नेते.
1119स्वतःच्या खोटेपणानेच राजकीय पक्ष सरतेशेवटी नामशेष होतो.
1120देशभक्ताचे रक्त म्हणजे स्वातंत्र्य वृत्तीचे बीजच होय.
1121स्वातंत्र्य म्हणजे संयम, स्वैराचार नव्हे.
1122पूर्वजांचा गौरव करणे, वर्षातून एकदा स्मरण करणे हे भावी उत्कर्षणाचे चिन्ह होय, उदयोन्मुख राष्ट्राला याची गरज आहे.
1123माणसाने नेहमी प्रकाशाकडे पहावे आणि मात्र परिस्थितीत चांगल्यावाईट प्रसंगाला खंबीरपणे तोंड द्यावे.
1124सर्वसामान्य माणसाने राजकारण हा विषय शिळोप्याच्या गप्पाप्रमाणेच जवळ करणे श्रेयस्कर.
1125माणसात गुणारुपाची सांगड क्वचितच पहावयास मिळते.
1126माणसाच्या हृदयातील काळा रंग लपवण्यासाठीच परमेश्वर त्याला रूपाची देणगी देत असतो.
1127सौंदर्यापासून जीवास विश्रांती आणि मनाची उन्नती झालीच पाहिजे.
1128आनंदीवृत्ती आणि समाधान ही फार मोठी सौंदर्यवर्धक साधने आहेत.
1129तथापी, पण, परंतु हे शब्द श्रद्धेच्या कोशात बसतच नाहीत.
1130सुंदर स्त्रीला बहीण मानणे सोपे असते पण तसे आचरण करणे कठीण असते.
1131पथ्य नाही पाळले तर औषधाचा उपयोग होत नाही.
1132काट्यावाचून गुलाब नाही, रात्रीशिवाय दिवस नाही, तसेच बदमाशावाचून राजकारण नाही.
1133दुर्बल मन ओढ घेते सागराच्या प्रवाहाकडे तर सबळ मन ओढ घेते. प्रेमाच्या विशाल आकाशांकडे.
1134बळजबरीत लादलेले प्रेम हे पुरुषार्थाचे लक्षण नव्हे.
1135जीवनाची दुरंगी दुनिया ही दुःखाने तशीच सुखाने पण काठोकाठ भरली आहे.
1136सूर तेच पण ते बुलबुलाच्या तोंडून बाहेर पडले की त्याला संगीताचे महत्त्व प्राप्त होते, पाणी तेच पण ते गोमुखातून बाहेर पडले की त्याला अमृताचा महिमा प्राप्त होतो, तसेच ज्ञान जर का प्रतिभेच्या शैलीतून लिहिले गेले तर त्याला साहित्याचा दर्जा प्राप्त होतो.
1137अचल प्रितीची किंमत चंचल संपत्तीने कधी होत नाही.
1138तुमची श्रद्धा खरीखुरी योग्य ठिकाणी असेल तर पाषाणालासुद्धा देवत्व येते पण जर का अंधश्रद्धा असेल तर मानवी रूपातील पशुत्व त्याचा फायदा घेऊन परमेश्वराच्या नावाखाली तुम्हाला जाळ्यात अडकवून तुमची कठपुतळी करतो.
1139मानवतेच्या सौजन्यशील स्पर्शातून सुखाचे सिंचन होते, तर अहंकाराच्या हर्षातून सर्पाचे जहरी फुस्कार बाहेर पडतात.
1140प्रत्येक गोष्टीचे बारीक निरीक्षण करून चार सुज्ञ माणसांचा सल्ला घेऊन स्वतःच्या मनाने सल्ला घेतो तो शहाणा.
1141डोळे स्वतःवर विश्वास ठेवतात पण कान मात्र दुसऱ्यावर विश्वास ठेवतात.
1142चांगल्या सवयी मुलांना बालपणीचं लावाव्या लागतात.
1143जीवनातील बरे-वाईट अनुभव घेत असताना भविष्यकाळात घडणाऱ्या घटनांनी विशेष करून प्रतिकुलताच आपल्या वाट्याला आहे असेच माणसाने नेहमी गृहित धरून चालावे.
1144स्वभावातील गोडीने आणि जीभेवरील माधुर्याने माणसे जोडली जातात.
1145ज्याचे हातपाय धडधाकट आहेत आणि सतत धडपड करून इप्सित साध्य करण्याची जिद्द आहे असा माणूस नेहमी यशस्वी होणारच.
1146चूक कबूल करण्यात जर माणसाला शरम वाटत असेल तर ती चूक मुळात करताना शरम वाटली पाहिजे.
1147सौंदर्य महालात असते आणि सौजन्य मातीच्या मंदिरात वास करते.
1148दुःख म्हणजे परमेश्वराचा आशिर्वाद आणि सुख म्हणजे दुःखावरील फुकर होय.
1149ज्ञान हे बाहेरून आत ओतण्याची वस्तू नसून तन, मन, धन व एकाग्र करून आत्मसात करण्याची जीवन गाथा आहे.
1150ढोंग म्हणजे सद्गुणापुढे दुर्गुणाने स्विकारलेली हार आहे.
1151मातीशी वैर ठेवण्यापेक्षा मातीशी ईमान राखा.
1152डोंगरआड गेलेला सूर्य दुसरे दिवशी दिसू शकतो, पण मातीआड गेलेली व्यक्ती पुन्हा दिसू शकत नाही.
1153मोठमोठ्या नद्या किंवा सागराने माणसाचे मन धुतले जात नाही, ते स्वच्छ होते डोळ्यातील खारट पाण्याच्या डोहाने.
1154घोड्यावरून पडलात तर सावरले जाल पण मनातून उतरलात तर सावरू शकणार नाही.
1155शांत मनुष्य क्रोधी व रागिट गाणसाचा पराभव करतो.
1156दुसऱ्याचे मूल खूप खेळते, जेवते, हसते म्हणून आपल्या मुलाने पण तसेच करावे अशी अपेक्षा न ठेवता ते त्याच्या कुवतीप्रमाणे होऊ द्या. फक्त त्याची कुवत वाढविण्याला त्याला उत्तेजन द्या.
1157ज्याच्या योगाने माणूस जगण्यास लायक होते त्याचे नाव शिक्षण.
1158शिक्षण हे प्राधान्यानं लोकांच्या गरजा पूर्ण करएणारे असले पाहिजे.
1159मारणायाचे हात धरता येतात पण बोलणान्याचे तोंड धरता येत नाही.
1160चांगली वागणूक हा यशोमार्गाचा पहिला टप्पा आहे.
1161कीर्ती हवी असेल तर तिच्या पाठी लागू नका, तिच्याकडे पाठ फिरवा.
1162प्राप्तीच्या आनंदापेक्षा प्रयत्नाचा आनंद अधिक असतो.
1163पुरुषाचे सौंदर्य कर्तृत्वात असते तर स्त्रीचे सौंदर्य शालीनतेत असते.
1164व्यायामाने आरोग्य प्राप्त होते, अभ्यासाने ज्ञान प्राप्त होते तर उद्योगाने धन प्राप्त होते.
1165वाटेल त्या प्रकारे वाक्तांडन करूनसुद्धा ज्या गोष्टी साध्य होत नाहीत त्या न बोलता केवळ कृतीने साध्य होतात.
1166खूप गडबड करण्यापेक्षा मितभाष माणूस फार चांगला.
1167कधी कधी बोलून फुकट घालवण्यापेक्षा न बोलणे हेच शहाणपण असते.
1168पावसाच्या एका सरीने जर धरती तृप्त होऊन मृदगंध आसमंतात व्यतीत असेल तर ज्ञानाच्या सिंचनाने क्षुद्रसुद्धा विद्वान होऊन कीर्ती रूपाने अमर होईल.
1169वाचन माणसास परिपक्त बनविते, संभाषण चातुर्याने तो लोकप्रिय होतो आणि लेखन करणे त्यास सुयोग्य बनविते.
1170सुंदर चेहऱ्यापेक्षा सुंदर आकृती बरी, सुंदर आकृतीपेक्षा सुंदर वर्तणूक बरी.
1171व्यसन लहान म्हणून त्याची गय करणे सर्वथैव चूकच, कारण लहान ठिणगीसुद्धा आगीचा डोंब उडवते.
1172राखेचा थर साचलेला निखारा कधीही कोळसा नसतो, तो प्रज्वलित करण्यासाठी साधी फुकरही फार मोठी ठरते.
1173प्रासादात रहाणाऱ्या कलावंताची कदर केली जाते पण दरिद्री कलावंताच्या कलेचा मात्र पायपोस होतो.
1174आपले सत्यस्वरूप सिद्ध करण्यास सुवर्णाला अग्निदिव्य करावे लागते, हियाला घणाचे घाव सोसावे लागतात, तर माणसाला छळाचे हलाहल पचवावे लागते.
1175मोती शिंपल्यात पण मिळतात आणि मातीत पण मिळतात पण मातीतले मोती शरिराची क्षुधा भागवतात आणि शिंपल्यातील मोती देहाची शोभा वाढवितात.
1176निसर्ग माणसाच्या मनातील शैशव सदैव जपत असतो.
1177कोण कोणासारखा दिसतो यापेक्षा कोण कोणासारखा वागतो याला महत्त्व द्या.
1178जीवन फुलपाखरासारखे असावे पण ध्येय मात्र मधमाशीप्रमाणे ठेवावे.
1179दुसऱ्याला मूर्ख ठरविताना आपल्या पदरी मूर्खपणाचे माप पडणार नाही ना याची दक्षता घ्यावी.
1180वेदातून महाकाव्य निर्माण होते.
1181मृगजळ मिथ्या असेल पण हरिणाची तहान मिथ्या नसते.
1182फुलाचा सुगंध फुलाला कधीच कळत नाही.
1183बागेची निगराणी करणारा माळी जर उत्कृष्ट असेल तर फळाफुलांचा ताटवा सदैव फुललेला व फळलेला राहिल.
1184संपत्तीने व समृद्धीने भरलेल्या घरात बोबडे बोल व दुडदुड धावणारी छोटी पावले नसतील तर त्या घराची आणि संपत्तीची किंमत सर्वस्वी व्यर्थ आहे.
1185विचार हा ज्ञानाचा आत्मा आहे आणि अविचार हा तमोगुणाचा अविष्कार आहे.
1186बाण जेथून सुटतो तेथे त्याची साक्ष राहत नाही.
1187लहानाना मोठे करण्यासाठी मोठ्याने लहान व्हावे लागते.
1188डॉक्टराने समाजाचे आरोग्य सांभाळायचे असते तर वकिलाने समाजाचे मन घडवायचे असते.
1189उद्याचा भविष्यकाळ आजच्या त्यागातून, कर्मातून निर्मावा लागतो.
1190मोठमोठ्या क्रांत्या तलवारीपेक्षा तत्वानीच घडवून आणलेल्या असतात.
1191तुमचा उद्याचा भविष्यकाळ हा आजचा वर्तमानकाळ आहे.
1192हृदयाची खरी आशा कधीच विफल होत नसते.
1193घटना घडून जातात पण जाता जाता पाठीमागे स्मृती ठेवून जातात.
1194उत्तम सौंदर्य म्हणजे मनाचे पावित्र्य.
1195सत्य आणि सत्ता यांचे फारसे जुळत नाही.
1196सौंदर्य हे स्त्रीचे सामर्थ्य आहे, तर सामर्थ्य हे पुरुषाचे सौंदर्य आहे.
1197अस्ताला गेलेल्या सूर्याबरोबर त्याची तेजस्वी किरणेही लुप्त होतात.
1198भविष्यात घडणाऱ्या घटनांचा विचार करीत बसण्यापेक्षा वर्तमानकाळातील घटनांचे निर्णय विचारपूर्वक घ्या.
1199घडलेल्या घटनांचा उहापोह करत बसण्यापेक्षा घडणाऱ्या घटनांना धैर्याने सामोरे जा.
1200हातावरील रेषात दडलेले भाग्य शोधण्यापेक्षा मनगटातील कर्तृत्वाने ते खेचून घ्या.
1201वाघाच्या शिकारीची तयारी करावी तेव्हा ससा तरी मिळतो.
1202अभ्यास आणि अविरत कष्ट यामुळे अशक्य गोष्टीही शक्य होतात.
1203घोंगडीने काम भागत असेल तर रेशमी वस्त्रांचा हट्ट धरू नये.
1204कल्पनेच्या कुंचल्याने अंतःकरणाच्या पटावर कोरलेले चित्र भविष्यात प्रयत्नाने साकार झाल्याशिवाय रहात नाही.
1205पूर्वसंचिताने खेळ हे भागवे लागतात. या जन्मी तरी नाहीतर पुनर्जन्म घेऊन तरी.
1206मनुष्य जन्माला येतो तो खाली हातानेच आणि मरतो खाली हातानेच ईश्वरचरणी जातो, मग आयुष्यात मीपणा का करत असतो याचे उत्तर मात्र कोणीही देऊ शकत नाही.
1207कटू गोष्ट विसरण्याचे कितीही ठरविले तरी मनाची मिटलेली तरी कटू पाने कधी तरी फडफडतातच आणि पुन्हा एकदा मनात द्वेषाचे प्रज्वलित होत.
1208माणूस कितीही सहनशील असला तरी त्याच्यासहनशीलतेला मर्यादा असते.
1209शील ही जन्मभर पुरणारी आणि मृत्युनंतर पण पुरून उरणारी संपत्ती आहे.
1210जगात प्रत्येक गोष्टीला पुरक गोष्ट आहे, पण एकच गोष्ट अशी आहे की तिला पुरक काहीच नाही आणि ती म्हणजे आईचे प्रेम.
1211वनस्पतींना जसे ऊनप्रकाश आणि पाणी यांचे शिंपण करून वाढवता, तसेच लहान मुलांचे मित्र बना त्यांच्याशी लहान होऊन लहानाप्रमाणे वागा आणि हीच रोपटी मोठी करा. त्यांना संस्कारक्षम नागरिक बनवा.
1212बरा-वाईट भूतकाळ उगाळत बसण्यापेक्षा भविष्यकाळात वाईटातून चांगले कसे निर्माण करता येईल व वर्तमानकाळ अधिक सुखाचा कसा जाईल? हे शोधणे अधिक चांगले.
1213ज्यांना खाण्या-पिण्याची भ्रांत आहे अशा व्यक्तींना पोटभर जेऊखाऊ घातलंत तर तो याचक संतुष्ट होऊन आशिर्वाद तरी देईल व तुम्हाला पण अन्नदानाचे पुण्य लाभेल.
1214भूकेने व तहानेने कासावीस झालेल्या माणसास बोधामृत पाजण्यापेक्षा अन्नाचे चार घास व पाण्याचा घोट देणे अधिक योग्य.
1215संधी कधीही दार उघडून येत नाही पण ती जेव्हा तुमचे दार ठोठावते तेव्हा तुम्ही दार उघडता की नाही यावर तुमचे पुढील भवितव्य अवलंबून असते.
1216अन्नाचा घास जास्तीत जास्त तुमच्या तोंडात भरवता येतो पण तो घास गिळण्याचे काम मात्र तुम्हालाच करावे लागते.
1217मोठमोठ्या पुढाऱ्यांचे स्मारक/पुतळे बांधून पैशाचा विनाश करण्यापेक्षा तोच पैसा गोरगरिबांना अन्नदानार्थ व गरीब अनाथ मुलांच्या शिक्षण कार्यासाठी वापरला तर त्या पैशांचा योग्य विनियोग होईल, तुम्हाला पुण्य लागेल आणि त्या स्वर्गीय सुधारकाच्या आत्म्याला पण शांती लाभेल.
1218दुष्टांच्या प्रवृत्तींना क्षमा करणे म्हणजे सापाला दूध पाजण्यासारखेच.
1219स्त्रीला तुच्छ समजून वागवण्यापेक्षा लक्ष्मीचे स्थान दिलेत तर घरात वैभव फुलेल.
1220शिक्षण हे साध्य नाही, साधन आहे. नवचैतन्य, नवसंस्कृती, नवमानव आणि नवसमाज शिक्षणातून निर्माण करावयाचा असतो.
1221विद्यार्थी स्वाभिमानी पाहिजे तो न्यायाची चाड व अन्यायाची चीड बाळगणारा हवा.
1222विद्यार्थ्याने नुसते डोक्यावरचे केस वाढवायचे नसतात तर त्याने डोक्यातील विचार वाढवायला हवेत.
1223मला ओसाड जमीन द्या मी तिथे नंदनवन फुलवेन.
1224कोणतीही गोष्ट फुकट मिळाली की माणसाला तिची किंमत वाटत नाही.
1225देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात सांडलेला रक्ताचा एकेक थेंब हे जगातले सर्वात मौलयवान रत्न होय.
1226माणूस आजारी पडला की त्याला डोक्टराकडे न्या. कोणत्याही अडीअडचणीच्या वेळी भगत देवऋषि यांच्याकडे जाऊ नका अंगारे धुपारे करू नका.
1227दातृत्व हा निसर्गाचा गुण आहे पण स्वार्थ आणि दुष्टावा हा मानवाचा अवगुण आहे.
1228कडू गोळीसेवन केल्यानंतर तोंडाचा कडूपणा जाण्यासाठी त्याला साखरेची गोडी आवश्यक आहे.
1229तुमच्या भाषेत मृदुता ठेवा. जसे हा माझा बाप आहे असे बोलण्यापेक्षा हे माझे वडिल आहेत असे ऐकणे फार चांगले वाटते.
1230मीठ हे जेवणात रूचीला आवश्यक गोष्ट आहे, पण तेच मीठ दूधात घातले तर दूध नासून जाते.
1231मुलांनो तुम्ही उद्याच्या जगाचे शिल्पकार आहात. जे आमच्या हातून घडले नाही ते तुम्ही करून दाखवा.
1232हसल्याचं मोल काय आहे हे रडल्यावर कळतं.
1233असत्याला कितीही प्रतिष्ठा असली तरी असत्याच्या बुरखपा फाडून जगाला दाखवला पाहिजे.
1234जीवनात प्रेम हे केव्हा केव्हा मिळत असतं.
1235अभिजात कलाकृती निर्माण करणाऱ्या अनेक हतभागी कलावंतांची खरी किंमत कळते ती त्यांच्या मरणानंतर.
1236कलात्मकता ही कोणत्याही प्रसंगात केव्हाही प्रकट होत नसते.
1237अस्वस्थ वृत्ती कर्तृत्वाला जन्म देते.
1238वास्तवतेपेक्षा कृत्रिमता आकर्षक वाटत असते. वास्तवतेपेक्षा कृत्रिमता हाताळणे ही जास्त सुलभ असते, पण कृत्रिमता ही वाङ्मयाची वैरीण आहे हे विसरू नका.
1239व्यक्तीच्या हिताहून वेगळे समाजाचे हित नाही.
1240सामाजिक सुधारणांबरोबर राजकीय सुधारणाही आवश्यक आहेत.
1241भाषण व वर्तन यांतील परस्पर विरोध हा आमच्या लोकांचा राष्ट्रीय दोष आहे.
1242सगळ्या देशाला एका भाषेत बोलायला शिकवा मग बघा काय चमत्कार घडतो.
1243आपल्या दरिद्री व अज्ञानी बांधवांची सेवा करणे हे प्रत्येक सुशिक्षिताचे पहिले कर्तव्य होय.
1244जिथे धाडस तेथे वैभव.
1245माता स्वतःचा मान जाणत नाही, ती जाणते माया.
1246मोत्याच्या हारापेक्षा घामाच्या धाराने मनुष्य अधिक शोभून दिसतो.
1247मनापासून आणि एकाग्रतेने काम केले की जीवन यशस्वी होते.
1248यशस्वी शिक्षण हा यशस्वी जीवनाचा पाया आहे.
1249ज्ञानाचा संचय केल्याने ते कमी होते, परंतु ते दुसऱ्याला दिल्याने अधिक वाढते.
1250ज्ञान हेच खरे सुवर्ण रत्न होय.
1251क्षमा म्हणजे ब्रह्म, क्षमा म्हणजे सत्य, क्षमा म्हणजे भूत, क्षमा म्हणजे भविष्य, क्षमा म्हणजे पावित्र्य होय. या संपूर्ण जगताला क्षमेनेच धारण केले आहे.
1252क्षुद्र माणसे नेहमीच अति चिकित्सक असतात.
1253अपमानाच्या पायांवरून ध्येयाचा डोंगर चढावा लागतो.
1254आचाराच्या उंचीवर विचाराची भव्यता अवलंबून असते.
1255आत्मविश्वास हेच संरक्षणाचे साधन आहे.
1256गुलामगिरी नष्ट करावयाची असेल तर माणूस हा माणूस व्हावा लागतो.
1257खर्च करून आवक शोधण्यापेक्षा आवक पाहून खर्च करावा.
1258क्रोधावर विजय मिळवाल तर बुद्धी टिकून राहील.
1259उद्योगप्रियता, बुद्धिमत्ता आणि सातत्य यामुळेच कीर्ती लाभते.
1260कायदा आंधळा, नीती पांगळी आणि समाज बहिरा असतो.
1261काचेसारखे तकलादू बनू नका तर हिरकणी व्हा.
1262कोणी कितीही चिडवण्याचा प्रयत्न केला तरी संयम राखणे हेच शौर्याचे लक्षण आहे.
1263कर्म हीच पूजा, कर्म हीच उपासना.
1264जीवन हे यश आणि अपयश यांचे मिश्रण आहे.
1265ज्याच्या गरजा कमी, आणि स्वास्थ्य अधिक.
1266तुमच्या हातून चूक झाली तर जरूर होऊ द्या, पण तीच चूक पुन्हा त्याला सुख होणार नाही याची दक्षता घ्या.
1267निसर्गावर हुकूमत गाजवायची असेल तर त्याच्या आज्ञेचे पालन करा.
1268मोहाचे पाश नेहमीच पराक्रमाला बांध घालीत असतात.
1269पतंगासारखी माणसाची स्थिती असते. शीलाची दोरी जोपर्यंत मजबूत आहे, तोवर दिमाखाने वरवर जावे, अनंतात स्वैर भरारी मारून सूर्यबिंबाला स्पर्श करण्याची उमेद धरावी, पण ती दोरी तुटली, तर त्याचा अधःपात कुठल्यातरी खातेयात होणार हे निश्चित!
1270ज्ञानी माणसाबरोबर एकदाच केलेले संभाषण हे पुस्तकाचा अभ्यास करण्यापेक्षा जास्त सरस आहे.
1271जे कसलीच अपेक्षा करीत नाहीत ते खरे भाग्यवान, कारण त्यांच्यावर निराश होण्याची पाळीच येत नाही.
1272विद्या हे मौलिक व अक्षय धन आहे. विद्या म्हणजे कामधेनू आहे. विद्येवाचून जीवन फुकट आहे. विद्येचे फळ म्हणजे उत्तम चारित्र्य आणि सदाचार.
1273सौंदर्य-सुस्वभाव यांची बेरीज करा, मैत्रीतून मत्सर वजा करा, प्रेमाला शुद्ध अंतःकरणाने गुणा, परनिंदेचा लघुत्तम काढा, सुविचारांचा वर्ग करा, दया, क्षमा, शांती, परमार्थ यांचे समीकरण सोडवा, हेच आपल्या सुखी जीवनाचे गणित आहे.
1274सत्यासाठी सर्व गोष्टींचा त्याग करावा, परंतु कोणत्याही कारणास्तव. सत्याचा त्याग करू नये.
1275संधी तुमचा दरवाजा ठोठावत असते पण आपल्याला कळले पाहिजे की हीच संधी आहे. हीचा आपण लाभ घेतला पाहिजे.
Suvichar Marathi List

मित्रांनो जर तुम्हाला (Suvichar Marathi) मराठी सुविचार संग्रह आवडला असेल तर जरूर शेअर करा व आम्हाला फेसबुक आणि इंस्टाग्राम वर जरूर फॉलो करा.

पुढे वाचा:

FAQ: मराठी सुविचार

Leave a Comment