1000+ मराठी म्हणी व त्यांचे अर्थ | Marathi Mhani | Mhani in Marathi

Marathi Mhani : मित्रांनो, आज हा लेख मराठी मध्ये प्रसिद्ध म्हणीवर आधारित आहे. या पोस्टमध्ये, आम्ही आपल्याला 1000 पेक्षा जास्त मराठी म्हणी संग्रह व अर्थ सांगू जे आज सर्वात लोकप्रिय आहेत. हा ब्लॉग लिहिण्याचा एकच हेतू आहे की आपल्याला या ब्लॉगमधील “Marathi Mhani” सह त्याचा अर्थ पण सांगणार आहोत.

1000+ मराठी म्हणी व त्यांचे अर्थ | Marathi Mhani | Mhani in Marathi

1000+ मराठी म्हणी संग्रह व अर्थ – मराठी म्हणी व त्यांचे अर्थ – Marathi Mhani – Mhani in Marathi

अनु.क्रम्हणीअर्थ
अडला हरी गाढवाचे पाय धरीबुद्धीमान माणसालाही अडचणीच्या वेळी बिंडोक माणसाची विनवणी करावी लागते. 
अंगाले सुटली खाज, हाताला नाही लाजकोणत्याही गरजू व्यक्तीला अक्कल नसते. 
अतिशहाणा त्याचा बैल रिकामाजी माणसे अति शहाणपणा करायला जातात त्यामुळेच त्यांचे ठरलेले काम सुद्धा होत नाही.
अति तेथे मातीकोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नये.
असंगाशी संग आणि प्राणाशी गाठपापी माणसाची दोस्ती केल्यास स्वतःच्या जीवालाही धोका निर्माण होतो.
अंधारात केले, पण उजेडात आलेएखादी गोष्ट लपून केली परंतु काही दिवसांनी ती लोकापुढे आली.
अन्नछत्री जेवणे, वर मिरपूड मागणेएखादयाची ठराविक गोष्टीसाठी मदत घ्यायची आणि त्याच बरोबर अजुन भरपूर गोष्टींसाठी परत त्याच्यापुढे हात पसरायचे.
अंत काळापेक्षा मध्यान्हकाळ कठीणजीव जाणाऱ्या वेदनांपेक्षा भुकेच्या वेदना खुप त्रासदायक असतात.
अंगावरचे लेणे, जन्मभर देणेसोने चांदी खरेदी करण्याकरिता कर्ज करून ठेवायचे आणि जन्मभर फेडित बसायचे.
१०अक्कल नाही काडीची नाव सहस्त्रबुद्धेनुसतेच नाव मोठे पण काम लक्षण खोटे.
११अघटित वार्ता आणि कोल्हे गेले तीर्थाअशक्यप्राय गोष्टींची परिकल्पना.
१२अती झाले अन आसू आलेकाही गोष्टींचा अतिरेक झाला की त्या त्रासदायक वाटतात
१३अतिपरिचयात अवज्ञाखुप निकटता झाल्यास अपमान होऊ शकतो 
१४अती झाले गावचे अन पोट फुगले देवाचेकाम एकाचे आणि त्रास दंड मात्र दुसऱ्याला
१५अन्नाचा येते वास, कोरीचा घेते घासएखादे अन्न खुप आवडते पण त्याच्यात चूका काढ़ने
१६अपापाचा माल गपापाचुकीच्या मार्गाने मिळवलेले संपति लगेच नष्ट होते
१७अर्थी दान महापुण्यएखाद्या गरजवंत माणसाला दान दिल्यामुळे पुण्य मिळते
१८आईची माया अन् पोर जाईल वायाखुप प्रेम लाड केल्याने मुले बिघडतात
१९आधी पोटोबा मग विठोबापाहिले पोट नंतर देव धर्म
२०आपलेच दात आपलेच ओठआपल्या जवळच्या माणसाने चूक केल्यावर आपलीच गोची होते 
२१आयत्या बिळावर नागोबाएकाने केले काम मात्र लाभ घेतला दुसऱ्याने  
२२आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळेमागितली एक गोष्ट पण मिळाले भरपूर 
२३आपण हसे लोळायला, शेंबूड आपल्या नाकालाएखाद्या दोषाबद्दल दुसर्‍याला हसने पण तोच दोष आपल्या अंगी असणे
२४आधीच उल्हास त्यात फाल्गुन मासअगोदरच आळशी असणाऱ्या माणसांच्या बाबतीत अजुन आळशी अवस्था निर्माण होणे
२५आंधळं दळतं कुत्रं पिठ खातंकाम करावे एकाने दुसऱ्याने त्याचा फायदा घ्यावा
२६आंधळ्या बहिर्यांची गाठएक काम करण्यासाठी दोन असमर्थ माणसांची भेट होने
२७अगं अगं म्हशी, मला कुठे नेशी ?स्वतःच चूक करून ती दुसऱ्याच्या माथी मारून मोकळे होने
२८अडली गाय फटके खायअडचणीत सापडलेल्या माणसाला हैरान करने
२९आपला हात जगन्नाथआपल्या कर्तृत्वावर आपली प्रगति अवलंबून असते.
३० असेल त्या दिवशी दिवाळी नसेल त्यादिवशी शिमगाअसेल तय दिवशी मजा करने नसेल तय दिवशी बोम्बलने 
३१ अंगठा सुजला म्हणून डोंगराएवढा होईल का?गोष्टींला ठराविक मर्यादा असतात
३२ अवशी खाई तूप आणि सकाळी पाही रूपअतिशय उतावळेपणाची लक्षण
३३अती खाणे मसणात जाणेखुप खाणे नाशवंताचे लक्षण असते
३४अठरा नखी खेटरे राखी वीस नखी घर राखीमांजर घराचे तर कुत्रे दाराचे रक्षण करते
३५अवचित पडे नि दंडवत घडेस्वतःची चूक लपवण्याचा प्रयत्न करणे
३६अवसबाई इकडे पुनवबाई तिकडेदोन विरुद्ध बाजु
३७अंथरूण पाहून पाय पसरावेआपली ऐपत पाहून वागावे जगावे
३८अंगापेक्षा बोंगा मोठामूळ वस्तुपेक्षा इतर गोष्टींचा बडेजाव मोठा असणे
३९आपला तो बाब्या दुसर्याचे ते कारटेआपले विचार हे दुसऱ्यापेक्षा श्रेष्ट कसे ही वृत्ति अंगी असणे
४०आपली पाठ आपणास दिसत नाहीस्वतःचे दोष स्वतःला दिसत नाहीत
४१आजा मेला नातू झालानुकसान झाल्यावेळी फायद्याची गोष्ट घडणे
४२आत्याबाईला जर मिशा असत्या तरकोणत्याही कामत विचारांची भर टाकने
४३आपल्याच पोळीवर तूप ओढणेस्वतःचाच स्वार्थ साधून घेणे
४४आलिया भोगासी असावे सादरनशिबात आले ते स्वीकारणे
४५आवळा देऊन कोहळा काढणेस्वार्थ साधण्यासाठी लहान वस्तू देऊन मोठी वस्तू मिळविणे
४६आपण मेल्यावाचून स्वर्ग दिसत नाहीअनुभव आल्याशिवाय शहाणपण येत नाही
४७आपले नाक कापून दुसऱ्यास अपशकुनदुसऱ्याचा तोटा करण्यासाठी प्रथम स्वतःचे नुकसान करून घेणे
४८आधीच तारे त्यात गेले वारेविचित्र व्यक्तीच्या वर्तनात भर पडणारी घटना घडणे
४९आधीच मर्कट तशातही मद्य प्यालाआधीच करामती त्यात मद्य प्राशन केल्याने बिकट स्तिथि निर्माण होने
५०अडक्याची अंबा आणि गोंधळाला रुपये बारामुख्य गोष्टीपेक्षा नको त्या गोष्टींचा खर्च जास्त असणे
५१आग रामेश्वरी बंब सोमेश्वररोग एकीकडे इलाज दूसरीकडे
५२आयजीच्या जीवावर बायजी उदारदुसऱ्याचा पैसा खर्च करून औदार्य दाखवणे
५३आग खाईल तो कोळसे ओकेलजसे कृत्य तसे फळ
५४आठ पूरभय्ये नऊ चौबेखूप बिंडोक लोकांपेक्षा कमी बुद्धिमान चालतील
५५आधणातले रडतात व सुपातले हसतातस्वता संकटात असतानाही दुसर्‍याचे दुःख पाहून खुप हसू येने
५६इकडे आड तिकडे विहीरदोन्ही बाजूंनी अडचणीची परस्थिती निर्माण होणे
५७इच्छा परा ते येई घरादुसऱ्याच्या बाबतीत वाइट चिंतन करते आणि तेच आपल्या वाट्याला येणे
५८इच्छिलेले जर घडते तर भिक्षूकही राजे होतेइच्छेप्रमाणे सारे घडले तर सारेच लोक धनवान झाले असते
५९इन मीन साडेतीनकमीत कमी लोक हजर असणे
६०ईश्वर जन्मास घालतो त्याचे पदरी शेर बांधतोप्रत्येक जन्मास आलेल्याचे पालन पोषण होतेच
६१उथळ पाण्याला खळखळाट फारअंगी गुण थोडासा पण बढाई खुप मारने
६२उंदराला मांजर साक्षवाइट गोष्टीत एकमेकांची साथ देने
६३उचलली जीभ लावली टाळ्यालाविचार न करता बोलणे
६४उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंगलगबगीचे वर्तन करणे
६५उठता लाथ बसता बुक्कीअनादर टाळण्यासाठी पुन्हापुन्हा दंड देने
६७उडत्या पाखराची पिसे मोजणेअगदी सहज अवघड गोष्टीनचे मूल्यांकन करणे
६८उतावळी बावरी म्हातार्‍याची नवरीअति उतावळेपणा त्रासदायक असतो
६९उद्योगाचे घरी रिद्धी – सिद्धी पाणी भरीजेथे उद्योग असतो तेथेच लक्ष्मी संपत्ती येते
७०उंबर पिकले आणि नडगीचे (अस्वलाचे) डोळे आलेफायद्या घेण्याची वेळ येणे; पण आस्वाद न घेता येणे
७१ऊराचे खुराडे आणि चुलीचे तुणतुणेअतिशय बिकट परस्थिती
७२उंदीर गेला लुटी आणल्या दोन मुठीमनुष्य आपल्या क्षमतेनुसार जगतो
७३उकराल माती तर पिकतील मोतीशेतीत चांगली मशागत केल्यास चांगले पीक येते
७४उखळात डोके घातल्यावर मुसळाची भीती कशाला?एखादे काम घेतल्यानंतर त्यासाठी पडणाऱ्या श्रमांचा विचारन करने
७५उचल पत्रावळी म्हणे जेवणारे किती?काम सोडून भलत्याच चौकशा करणे
७६उडाला तर कावळा बुडाला तर बेडूकगोष्टीची परीक्षा घेण्यासाठी वाट पाहणे
७७उधारीची पोते सव्वा हात रितेउधारीचा माल नेहमीच कमी भरतो
७८उभारले राजवाडे तेथे आले मनकवडेश्रीमंती आली का तिच्या मागोमाग चमचे ही येतातच
७९उभ्याने यावे आणि ओणव्याने जावेताठ मानेने येणे आणि मान खली घालून जाणे
८०उसाच्या पोटी कापूससद्गुणी माणसाच्या पोटी दुर्गुणी लेकरू
८१ऊस गोड लागला म्हणून मुळासगट खाऊ नये चांगल्या गोष्टीचा प्रमाणापेक्षा जास्त फायदा घेऊ नये
८२एका माळेचे मणीसर्व लोक सारख्याच स्वभावाची असणे
८३एका हाताने टाळी वाजत नाहीकोणत्याही भांडणात दोष एकाचा नसतो
८४एक ना धड भाराभर चिंध्याएकाच वेळी अनेक कामे केल्याने सर्व कामे अर्धवट होतात
८५एकावे जनाचे करावे मनाचेजगाचे ऐकून घ्यावे पण मनाला जे योग्य वाटेल ते करावे
८६एकाची जळते दाढी दुसरा त्यावर पेटवू पाहतो विडीएखाद्याच्या अडचणीच्या काळात आपला स्वार्थ साधुन घेऊ नए
८७एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरु मारु नये दुसऱ्याने केलेल्या वाइट गोष्टींचे समर्थन करून आपणही तीच गोष्ट करू नए
८८एका पिसाने मोर होत नाही थोड्याश्या यशाने जास्त आंनदित हो नका
८९एका खांबावर द्वारकाएकाच मानसावर सर्व जबाबदाऱ्या देने
९०एक कोल्हा सतरा ठिकाणी व्यालाएका व्यक्तीपासून अनेक जगी अपमान होणे
९१एका कानावर पगडी घरी बाईल उघडीबाहेर बडेजाव पण घरी दारिद्र्य 
९२एका मान्यात दोन तलवारी राहात नाहीतदोन तेजस्वी माणसे गुण्या-गोविंदाने राहू शकत नाहीत
९३ऐंशी तेथे पंचाऐंशीउधळेपणाची कामे
९४ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मारमोठ्या व्यक्तीला तेवढ्याच यातना होतात जेवढ्या की सामान्य व्यक्तीला
९५ओळखीचा चोर जीवे न सोडलीओळखीचा शत्रू हा अनोळखी शत्रूपेक्षा घातक असतो
९६शेंडी तुटो की तारंबी तुटोकोणत्याही परिस्थितीत कामाचा शेवट करने
९७ओझे उचलू तर म्हणे बाजीराव कोठे?काम सोडून नुसत्या चौकशा करणे
९८औटघटकेचे राज्यकमी काळ टिकणारी गोष्ट
९९करावे तसे भरावेकृती असेल त्याप्रमाणे चांगले / वाईट फळ मिळते
१००कर नाही त्याला डर कशाला?ज्याने काही केलेच नाहीं त्याला भीति कशाची? 
१०१करीन ते पूर्वमी करेन तेच योग्य अशा विचाराने वागणे
१०२करवतीची धार पुढे सरली तरी कापते मागे सरली तरी कापतेकाही गोष्टी केल्या तरी तोटा होतो नाही केल्या तरी तोटा होतो
१०३करुन करुन भागला देवध्यानी लागलावाईट कृत्य करून शेवटी देवा धर्माला लागणे
१०४कणगीत दाणा तर भिल उताणाआपल्या गरजेपुरते आपल्या जवळ असले कि लोक कोणाची फिकिर करत नाहीत
१०५कधी तुपाशी तर कधी उपाशीदररोज दिवस सारखा नसतो
१०६कशात काय अन फाटक्यात पायवाईटात अजुन वाईट घडणे
१०७काठी मारल्याने पाणी दुभंगत नाहीरक्ताचे नाती बोलण्याने तुटत नाहीत
१०८काडीचोर तो माडीचोरएखाद्या छोट्या अपराधाबरोबर मोठ्या अपराधानची जोड़ लावणे
१०९काजव्याच्या उजळ त्याच्या अंगाभोवतीगोष्टींचा प्रभाव स्वतज़:पुरताच राहने 
११०का ग बाई रोड तर म्हणे गावाची ओढगरज नसलेल्या गोष्टींची काळजी करणे
१११कानात बुगडी गावात फुगडीआपल्या संपतीचे जोरा जोरा प्रदर्शन करने
११२काल महिला आणि आज पितर झालाअतिशय लगबगीचे लक्षण
११३काकडीची चोरी फाशीची शिक्षागुन्हा खूप लहान पण शिक्षा खूप मोठी असणे
११४काडीची सत्ता आणि लाखाची मत्ता बरोबर होत नाहीजे काम पैसाने होत नाही, ते अधिकाराने होते, संपत्तीपेक्षा सत्ता असणे महत्त्वाचे ठरते
११५कावीळ झालेल्यास सर्व पिवळे दिसतेएकाच नजरेच्या दृष्टीने सर्व जगाला बघणे
११६काना मागुन आली आणि तिखट झालीएखाद्या गोष्टीत मागून येणे आणि श्रेष्ट होन
११७कामापुरता मामाएखादे काम घेईपर्यंत गोड बोलणे
११८कावळा बसला आणि फांदी तुटलीयोगायोगाने दोन गोष्टी एकाच वेळी घडणे 
११९काखेत कळसा गावाला वळसाजवळची वास्तु शोधण्यासाठी दूर जाणे
१२०काप गेले नी भोके राहिलीसंपत्ति गेली अन फक्त आठवणी  उरल्या
१२१कावळ्याच्या शापाने गाय मरत नाहीशूद्र माणसाने केलेल्या दोषारोपांने थोरांचे नुकसान होत नसते
१२२काळ आला पण वेळ आली नव्हतीमरण समोर उभे असताना थोडक्यात बचावणे
१२३कांदा पडला पेवात, पिसा हिंडे गावातएखादी गोष्टीचा चुकीच्या मार्गाने शोध घेण्याचा प्रयत्न करणे
१२४कुंभारणीच्या घरातला किडा कुंभारणीचाआपल्या वस्तूवर आपलाच हक्क प्रस्थापित करणे
१२५कुत्र्याची शेपूट नळीत घातले तरी वाकडेमाणसाचा मूळ स्वभाव कधीच बदलत नाही
१२६कुडी तशी फोडीदेहा प्रमाणे आहार, कर्तुत्वा प्रमाणे मिळणे
१२७कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळफ़क्त स्वार्थासाठी दुष्ट बुद्धीने शत्रूला मदत करून आपल्याच माणसाचा तोटा करणे
१२८केळीला नारळी अन घर चंद्रमौळीखुप दारिद्र्याची बिकट अवस्था येणे
१२९केस उपटल्याने का मढे हलके होतेमोठ्या उपायांची जेथे गरज असते तेथे छोट्या उपायांनी काहीही फरक पडत नाही
१३०केळी खाता हरखले, हिशेब देता चरकलेगोष्टीचा उपभोग घेताना मजा वाटते पण पैसे देताना जीव घालमेल होतो
१३१कोळसा उगळावा तितका काळाचवाईट गोष्टीबाबत जितकी जास्त चर्चा करावी तितकीच ती अधिक वाईट होते
१३२कोल्हा काकडीला राजीलहान लहान गोष्टींनी खुश होतात
१३३कोणाच्या गाई म्हशी आणि कोणाला उठा बशीगुन्हा एकाचा शिक्षा दुसऱ्याला
१३४कोठे इंद्राचा ऐरावत, कोठे श्यामभट्टाची तट्टाणीमहान गोष्टींची तुलना शुल्लक गोष्टींबरोबर करणे
१३५खऱ्याला मरण नाहीखरे एकदिवस सर्वांच्या समोर येते
१३६खर्चणार्याचे खर्चते आणि कोठावळ्याचे पोट दुखतेखर्च करणारा खर्च करत असतो मात्र दुसरयाच् एखादयाला कुरकुर लागते
१३७खाऊ जाणे तो पचवू जाणेएखादे काम धाडसाने करणारा त्याचे परिणाम भोगण्यास ही तैयार असतो
१३८खान तशी मातीआई-वडिलांप्रमाणे त्यांच्या मुलांचे वागने असणे
१३९खायला काळ भुईला भारकाम न करणारा व्यक्ति सर्वांला भारदार वाटतो
१४०खाई त्याला खवखवेजो वाईट कृत्य करतो त्याला मनात भीति असते
१४१खाऊन माजावे टाकून माजू नयेदान करावे पण संपत्तीचा गैरवापर करू नये
१४२खोट्याच्या कपाळी गोटाखोटेपणा वाइट गोष्टींकडे परावर्तित करतो
१४३गरज सरो, वैद्य मरोगरज असेपर्यंत त्या माणसाशी संबंध ठेवणे व गरज संपल्यावर त्याला विसरुन जाने
१४५गळ्यात पडले झुंड हसून केले गोडगळ्यात पडल्यावर वाईट गोष्टी सुद्धा गोड मानून घ्यावे लागतात
१४६ग ची बाधा झालीअभिमान गर्व चढणे 
१४७गरजेल तो पडेल कायफ़क्त तोड़ाने बोलणाऱ्या माणसाकडून काही होत नाही
१४८गरजवंताला अक्कल नसतेगरजू वक्तिला दुसऱ्याचे बोलणे व वागणे हवे तसे न कही बोलता सहन करावे लागते
१४९गर्वाचे घर खालीगर्विष्ठ माणसाची नेहमी शेवटी अपमानच होतो
१५०गळ्यातले तुटले ओटीत पडलेनुकसान होता होता वाचले
१५१गाढवापुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होतामुर्खाला कितीही समज दिला तरी त्याचा काहीच उपयोग नसतो
१५२गाड्याबरोबर नळ्याची यात्रामोठ्यांच्या आश्रयाने लहानांचाही फायदा होणे
१५३गाढवाला गुळाची चव काय?ज्याला एखाद्या गोष्टीचा गंध नाही त्याला त्या गोष्टीचे महत्त्व कळू शकत नाही
१५४गाढवाच्या पाठीवर गोणीएखाद्या गोष्ट असून उपयोग नाही तर तिचा फायदा घेता यायला हवा
१५६गाव करी ते राव न करीश्रीमंत मानुस स्वतःच्या बळावर जे करू शकणार नाही ते अन्य माणसे एकीच्या बळावर करू शकतात
१५७गाढवाचा गोंधळ व लाथांचा सुकाळबिंडोक माणसांच्या गोंधळात एकमेकांवर आरोप करण्यात वेळ जातो
१५८गाय व्याली, शिंगी झालीआकस्मित घटना घडते
१५९जळे आणि हनुमान बेंबी चोळेएखाद्याचे नुकसान करूँन आपन काहीच केले नहीं ऐसे दर्शवणे
१६०गोगलगाय न पोटात पायबाहेरून निर्मल दिसणारी पण मनात कपट असणारी व्यक्ती
१६१घरचे झाले थोडे व्याह्याने धाडले घोडेअडचणीत आणखी भर पड़ने
१६२घर फिरले म्हणजे घराचे वासेही फिरतातबिकट परिस्थिती आली म्हणजे सारे त्याच्याशी वाईटपणे वागू लागतात
१६३घरोघरी मातीच्या चुलीप्रत्येकाची सारखीच परिस्थिती असणे
१६४घर ना दार देवळी बिर्हाडस्वताच्या डोक्यावर जबाबदारी नसलेली व्यक्ती
१६५घडाई परिस मडाई जास्तगरजेच्या गोष्टीपेक्षा त्या गोष्टींचा खर्च जास्त असणे
१६६घेता दिवाळी देता शिमगाघटना आनंद वाटतो पण देताना मात्र ओरडाओरड
१६७घोडे कमावते आणि गाढव खातेएकाने कष्ट करावे व निरुपयोगी व्यक्तीने त्याचा गैर फायदा घ्यावा
१६८चवलीची कोंबडी आणि पावली फळणावळगरजेच्या कामापेक्षा देखभालीचा खर्च जास्त असणे
१६९ चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचेप्रत्येकाला चांगले दिवस येतेच
१७०चार जणांची आई बाजेवर जीव जाईजबाबदारी प्रत्येकाची असली तरी मात्र काळजी कोणीच घेत नाही
१७१चिंता परा येई घरादुसऱ्याचे वाईट चिंतित राहिले, कि कधीतरी आपलीवरच उलटते
१७२चिखलात दगड टाकला आणि अंगावर शिंतोडे घेतलास्वतःच्याच तोड़ने, कृत्याने, हाताने स्वतःची बदनामी करून घेणे
१७३चुलीपुढे शिपाई अन घराबाहेर भागुबाईघरात तेवढा शूर पणाचा आव आणायचा पण बाहेर मात्र भागुबाई
१७३चोर सोडून संन्याशालाच फाशीखरा अपराधी सोडून निरपराधी माणसाला शिक्षा देणे
१७४चोराच्या मनात चांदणेवाईट कृत्य करणाऱ्याला आपले कृत्य उघडकीला येईल की काय अशी सतत भीती असते
१७५चोरावर मोरएखाद्या गोष्टीच्या बाबतीत दुसऱ्याला कमी लेखने
१७६चोरांच्या हातची लंगोटीज्याच्याकडून काही मिळण्याची अपेक्षा नसते त्याच्याकडून काहीतरी मिळणे
१७७चोराची पावली चोराला ठाऊकवाईट माणसांनाच वाईट माणसांच्या युक्त्या कळतात
१७८चालत्या गाडीला खीळसुरलीत चालणाऱ्या कमात अडचण निर्माण होणे
१७९ जशी देणावळ तशी धुणावळकामाच्या मोबदल्याच्या प्रमाणातच काम करणे
१८०जलात राहून माशाशी वैर करू नयेज्यांच्या बरोबर रहावे जगावे लागते त्यांच्याशी शत्रुत्व करू नये
१८१जळतं घर भाड्याने कोण घेणार?नुकसान देणाऱ्या गोष्टीना कोण स्वीकरणार?
१८२जानवे घातल्याने ब्राह्मण होत नाहीबाहेरील दिखाव्यामुळे आतून मनुष्य ज्ञानी होत नाही
१८३जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळेदुसऱ्याच्या परस्थितीत आपण जावे तेव्हा तिचे खरे ज्ञान समझते
१८४जीत्या हुळहुळे आणि मेल्या कानवलेजिवंत असताना दुर्लक्ष करायचे व मेल्यावर गोड़ कौतुक करायचे
१८५जेवेण तर तुपाशी नाही तर उपाशीखुप हट्टी वागणे
१८६ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळीआपल्यावर जो उपकार करतो त्याचे गुणगान गावे
१८७झाकली मूठ सव्वा लाखाचीवाइट नेहमी झाकून ठेवावे
१८८जे न देखे रवि ते देखे कवीजे स्वता सूर्य पाहू शकत नाहीत ते कोणताही कवी विचारानी पाहू शकतो
१८९ जो गुळाने मरतो त्याला विष कशास?जिथे गोड बोलून काम होत असेल तिथे कठोर उपायांची गरज नसते
१९०ज्या गावच्या बोरी, त्या गावच्या बाभळीजी माणसे एका ठिकांची असतात त्यांनी एकमेकांची मापे कडु नए
१९१ज्याच्या हाती ससा, तो पारधीज्याच्याकड़े जे कर्तुत्व असते गोष्ट दिली जाते
१९२ज्याचे करावे बरे तो म्हणतो माझेच खरेएखाद्याचे भले करायला जावे तर तो आपलेच म्हणणे चालवण्याचा प्रयत्न करतो
१९३टाकीचे घाव सोसल्यावाचुन देवपण येत नाहीकष्ट सोसल्याशिवाय फल नाही
१९४ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला वाण नाही, पण गुण लागलावाईट दोष अंगी लवकर लागतात म्हणजेच वाईट माणसांच्या संगतीने चांगला माणूसही लगेच बिघडतो
१९५ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, कुसंगे नाडला साधू तैसावाईट संगतीचे परिणाम वाईटच होतात
१९६तळे राखील तो पाणी चाखीलएखादे काम सोपवल्यानंतर फायदा करून घेणे
१९७तरण्याचे कोळसे, म्हातार्‍याला बाळसेविरुद्ध गोष्टी होने
१९८तट्टाला टूमणी, तेजीला इशारतमूर्खाला शिक्षा देऊन जी गोष्ट समजत नहीं ती शहाण्याला इशाऱ्याने समजते
१९९ ताकापुरते रामायणआपले काम होईपर्यंत त्याची खुशामत काम करणे
२००तीन दगडात त्रिभुवन आठवतेसंसार केल्यावरच खरे मर्म कळते
२०१तीथ आहे तर भट नाही, भट आहे तर तीथ नाहीनवरा आहे तर नवृ नाहीं आणि नवरी आहे तेर नवरा नाही
२०२तुकारामबुवांची मेखन सुटणारी गोष्ट 
२०३तू दळ माझे आणि मी दळते गावच्या पाटलाचेआपले काम दुसऱ्याने करावे आपण मात्र गावचे काम करावे
२०४तेल गेले तूप गेले हाती धुपाटणे आलेएकही गोष्ट पूर्ण न होणे
२०५तेरड्याचा रंग तीन दिवसकोणत्याही नविन गोष्टीची नवलाई अगदी कमी वेळ टिकते
२०६तोंड दाबून बुक्क्यांचा मारविनाकारण शिक्षा करणे आणि त्याला प्रतिउत्तर देण्यास  करने
२०७तोबऱ्याला पुढे, लगामाला पाठीमागेखायला पुढे कामाला मागे
२०८थेंबे थेंबे तळे साचेसुरुवातीला शुल्लक वस्तूंचा संग्रह कालांतराने मोठा साठा होतो
२०९ थोरा घराचे श्वान सर्व ही देती मानमोठ्या माणसांचा आश्रय आधार घेणाऱ्याला कारण नसताना मोठेपणा दिला जातो
२१०दगडापेक्षा वीट मऊमोठ्या संकटापेक्षा लहान संकट कमी नुकसान करते
२११दस की लकडी एक्का बोजासर्वांच्या सहकार्याने मोठे काम अगदी सहजरित्या पूर्ण होते
२१२दहा गेले, पाच उरलेजीवन कमी उरणे
२१३दात कोरून पोट भरत नाहीमोठ्या व्यवहारात काटकसर करून चालत नाही
२१४दाम करी काम, बिवी करी सलामपैसे टाकले की कोणतेही काम सहजरीत्या होते
२१५दाखविलं सोनं हसे मुल तान्हंपैशाचे लालच दाखविताच अवघड कामे ही लगेच होता
२१६दात आहेत तर चणे नाहीत, चणे आहेत तर दात नाहीतएक गोष्ट असली तरी तिच्या जोडीला पाहिजे ती गोष्ट नसणे
२१७दिल चंगा तो कथौटी में गंगाआपले मन साफ असल्यास पवित्र गंगा ही पवन होते
२१८दिव्याखाली अंधारमोठ्या माणसातही दोष असतात
२१९ दिल्ली तो बहुत दूर हैभरपूर गोष्टी करने बाकी आहे कारन मंजिल खुप लांब आहे
२२०दिवस बुडाला मजूर उडालारोजाने काम करणारा स्वतःचं समजून कधीच काम करणार नाहीं  कामाची वेळ संपते तोच ते निघून जाणार
२२१दुरून डोंगर साजरेकोणतीही गोष्ट लांबूनच चांगली दिसते; परंतु जवळ आल्यावर तिचे खरे रूप समझते
२२३दुभत्या गाईच्या लाथा गोडपुढे जाऊंन ज्याच्या पासून काही फायदा होणार आहे, त्याचा त्रासदेखील मनुष्य आज सहन करतो. 
२२४दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसते; पण आपल्या डोळ्यातले मुसळ दिसत नाहीदुसऱ्याचा छोटासा दोष दिसतो; पण स्वार्थामुळे स्वतःच्या मोठ्या दोषांकडे लक्ष जात नाही
२२५दुधाने तोंड भाजले, कि ताकपण फुंकून प्यावे लागतेएकदा अद्दल घडली, की मानुस  सावधगिरी बाळगतो
२२६देश तसा वेशदेशानुसार बदलणारे जीवन
२२७देव तारी त्याला कोण मारी?आपल्यावर देवाची कृपा असल्यास कोणीही आपले वाईट करू शकत नाही
२२८देखल्या देवा दंडवतसहज दिसला म्हणून विचारणा करणे
२२९ देणे कुसळांचे घेणे मुसळाचेपैसे कमी आणि काम जास्त
२३०दैव देते आणि कर्म नेतेनशिबात असते पण स्वतःच्या कामामुळे तोटा होतो
२३१दैव नाही लल्लाटी, पाऊस पडतो शेताच्या काठीजर नशिबात नसेलच तर तोंडासमोरिल घास सुद्धा दूर जातो
२३२दैव आले द्यायला अन् पदर नाही घ्यायलानशिबात उसने पण पदरात पैन पाडून  न घेता येणे
२३३दैव उपाशी राही आणि उद्योग पोटभर खाईआपल्या नशिबावर अवलंबून असणारे नेहमी उपाशी राहतात तर उद्योगी लोग पोटभर खातात.
२३४दोन मांडवांचा वऱ्हाडी उपाशीदोन्ही बाजूवर अवलंबून असणारे लोग उपाशी मरतात
२३५दृष्टीआड सृष्टीआपल्या पाठीवर जे बोलतात त्याकडे दुर्लक्ष करावे
२३६धर्म करता कर्म उभे राहतेएखादी चांगली गोष्ट करताना त्याबरोबर एखादी वाइट गोस्त होते
२३७धनगराची कुत्रे लेंड्यापाशी ना मेंढ्यापाशीहे लक्षण कोणत्याच कामचे नाहीं
२३८धार्याला (मोरीला) बोळा व दरवाजा मोकळाछोट्या गोष्टीची काळजी घेत असताना मोठी कडे दुर्लक्ष करणे
२३९ धिटाई खाई मिठाई, गरीब खाई गचांड्याश्रीमंताचे काम लगेच होते तेर गरीबाला खेतरे घालयला लागतात
२४०नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्नेकाम करणाऱ्यांच्या मार्गात अनेक अडचणी येणे
२४१नदीचे मूळ आणि ऋषीचे कूळ पाहू नयेनदीचे उगमस्थान व ऋषीचे कूळ कधीच पाहू नये कारण दोघातही दोष असतोच
२४२न कर्त्याचा वार शनिवारएखादे काम करायचे नसले की कारण देऊन टाळने
२४३नव्याचे नऊ दिवसकोणत्याही गोष्टीचा नवीन पणा काही काळ असतो कालांतराने तो नाहीसा होतो
२४४नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारेकेलेल्या उपदेशाचा मनावर शून्य परिणाम होणे
२४५नागेश्वराला नागवून सोमेश्वराला वात लावणेएकाचे हड़पूण दुसऱ्याला दान देणे
२४६नाकापेक्षा मोती जडमालकापेक्षा नोकर बाजीराव असणे
२४७नाव सोनुबाई हाती कथलाचा वाळानुसतेच नाव मोठे पण लक्षण खोटे
२४८नाव देवाचे आणि गाव पुजाऱ्याचेदेवाच्या नावाने स्वताचा स्वार्थ पाहणे
२४९ नाक दाबले, की तोंड उघडतेएखाद्या मांसाकडून एखादी गोष्ट काडून घेण्यासाठी त्या माणसाचे मर्म जाणून त्यावर घाव टाकणे
२५०नागव्यापाशी उघडा गेला, सारी रात्र हिवाने मेलाअगोदरच दरिद्री असणाऱ्या मानसाकडे मदतीला जाणे
२५१नागिन पोसली आणि पोसणाराला डसलीआपन जिनला संभालले त्यांनीच आपला विश्वासघात केला
२५२नाचता येईना अंगण वाकडेएखादे काम आपल्याला व्यवस्थित जमत नसेल तेव्हा आपण आपला कमीपणा लपविण्यासाठी इतर गोष्टीत चूका काढतो 
२५३नावडतीचे मीठ आळणीएखाद्या माणसाने कोणतीही गोष्ट कितीही चांगली केली तरी आपल्याला ती वाईटच दिसते कारन आपन त्याचा द्वेष करतो
२५४निंदकाचे घर असावे शेजारीआपल्या शेजारी निंदा करणारा माणूस असावा त्यामुळे आपले दोष आपल्याला समझतात 
२५५नेसेन तर पैठणी (शालू) च नेसेन, नाही तर नागवी बसेनस्वताचा हट्ट पूर्ण करने 
२५६पळसाला पाने तीनचसगळीकडे सारखीच परिस्थिती असणे 
२५७पडलेले शेण माती घेऊन उठतेचांगल्या माणसावर एकदा काहीतरी आरोप झाला आणि त्याने किती जरी प्रयत्न केले तरी त्याच्या जीवनावर थोडा का होईना डाग हा राहतोच
२५८पदरी पडले पवित्र झालेआहे त्या गोष्टीत समाधान मानने
२५९ पायाची वाहन पायीच बरीज्या त्या माणसाला त्याच्या जागेनुसार वागणूक दिली पाहिजे
२६०पाचामुखी परमेश्वरजास्त लोक जे बोलतील टेक योग्य मानावे
२६१पाप आढ्यावर बोंबलतेपाप समोर आल्याशिवाय राहत नाही 
२६२पाची बोटे सारखी नसतातसर्व माणसे एकसारखी नसतात 
२६३पायलीची सामसूम चिपट्याची धामधूममोठी शांत असताना छोट्यांचा आवाज वाढणे
२६४पाण्यामध्ये मासा झोप घेतो कैसा जावे त्याच्या वंशा तेव्हा कळेअनुभवाशिवाय अक्कल येत नाही
२६५पाहुनी आली आणि म्होतुर लावून गेलीघरात पाहुणे म्हणून आले आणि नुकसान करून गेले
२६६पी हळद नि हो गोरीकोणत्याही गोष्टीत गड़बड़ करणे
२६७पुत्र मागण्यास गेली भ्रतार नवरा घालवून आलीखरच फायदा होईल म्हणून जाणे परंतु परत नुकसान करूनच येणे
२६८पुढच्याच ठेच मागचा शहाणासमोरच्या माणसाच्या अनुभवावरून इतर लोक बोध घेत असतात आणि टी चूक परत सावधपणे वागतात
२६९ पुढे तिखट मागे पोचटसमोरून पहिले तर फार मोठे वाटते पण प्रत्यक्षात जवळून बघितले की तसे नसते 
२७०पै दक्षिण लक्ष प्रदक्षिणापैसा कमी मिलने पण काम जास्त करने 
२७१पोटी कस्तुरी वासासाठी फिरे भिरीभिरीशेजारी पडलेली वस्तु शोधण्यासाठी गावभर फिरणे
२७२पोर होईल ना व सवत साहिनाआपल्याकडून होत नाही व दुसऱ्यालाही करू द्यायचे नाही 
२७३फासा पडेल तो डाव राजा बोलेल तो न्यायएका राजाने दिलेला निर्णय जरी अमान्य असेल तरी तो मानवा लागतो
२७४फुले वेचली तिथे गोवर्या वेचणेआयुष्यात जेथे सुख अनुभवले तेथेच वाईट दिवस पाहण्याचे नशिबीत आले
२७५फुल ना फुलाची पाकळीखुप काही  देण्याचे सामर्थ्य नसल्याने त्यातील थोडासा भाग देने
२७६फुटका डोळा काजळाने साजरा करावाअंगावरचा दोष मिटत नसतो तो झाकण्याचा प्रयत्न करावा  
२७७बडा घर पोकळ वासादिसण्या श्रीमंती पण प्रत्यक्षात तिचा अभाव 
२७८बळी तो कान पिळीताकतवर मनुष्य इतर लोकावर सत्ता गाजवितो 
२७९ बकरीचे शेपूट माशाही मारीना व लाजही राखीनाअशी गोष्ट ज्याचा फायदा नाही
२८०बाप से बेटा सवाईबापापेक्षा मुलगा अधिक कर्तुत्ववान 
२८१बाप तसा बेटावडिलांच्या अंगचे गुण पोरात उतरणे
२८२बावळी मुद्रा देवळी निद्रादिसण्यास अडानी पण व्यवहार हुशार
२८३दारात तुरी भट भटणीला मारीजुन्या गोष्टीवरुन भांडण करणे 
२८४बारक्या फणसाला म्हैस राखणआपल्याला ज्याच्या पासून भीति धोका आहे त्याच्याकडे आपल्या संरक्षणाची जबाबदारी देणे 
२८५बुडत्याला काडीचा आधारसंकट काळी कुणाकडून सुद्धा मिळालेली मदत मोठी ठरते 
२८६बैल गेला आणि झोपा केलाएखादी गोष्ट घडून गेल्यावर तिचे उपाय योजना करण्यासाठी केलेली प्रयत्न निष्फल ठरतात
२८७बोलेल तो करेलनुसती बडबड करुण काही साध्य होत नाही
२८८बोडकी आली व केस कर झालीविधवा स्त्री आली अन लग्न लावून गेली 
२८९ भटाला दिली ओसरी भट हातपाय पसरीव्यक्तीला आश्रय दिला तर तो समाधान न मानता अधिक फायदा घेण्याचा प्रयत्न करतो 
२९०भरवशाच्या म्हशीला टोणगाज्या व्यक्तीवर विश्वास आहे अशाच व्यक्ती कडून विश्वासघात होणे
२९१भित्यापाठी ब्रह्मराक्षस बिद्रीकाही कारण नसताना लोक भीत असतात
२९२भिंतीला कान असतातलपवलेली गोष्ट समोर आल्याशिवाय राहात नाही 
२९३भीड भिकेची बहीणभीती बाळगून आपण एखाद्याला नहीं बोललो तर शेवटी आपणावर भीक मागण्याची पाळी येऊ शकते  
२९४भीक नको पण कुत्रा आवरमनात नसले तर मदत करू नये परंतु कामात अडथळा आणू नये
२९५भागीचे घोडे की किवणाने मेलेभागीदारीतील धंद्यात फायदा गिला सगळे येतात पण जबाबदारी घ्याला कोण येत नाही 
२९६मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नयेचांगले पणाचा जास्त गैरफायदा घेऊ नये 
२९७मनात मांडे पदरात धोंडेमोठी स्वप्ने बघायचि परंतु पदरात काहीच नाही
२९८मनी वसे ते स्वप्नी दिसेज्या गोष्टीं सतत आपल्या मनात फिरत असतात तीच गोष्ट स्वप्नात दिसतात  
२९९ नाही पण जण्याची तरी असावीएखादी वाईट गोष्ट करताना मनाला काय वाटले याचा विचार नाहीं  केला तरी तरी जगाला काय वाटेल याचा विचार नेहमी करावा
३००मन जाणे पाप आपणपाप दुसऱ्याला सांगितले नाही तरी ते आपल्या मनाला माहीतच असते
३०१मन राजा मन प्रजाआदेश देणारे पण आपले मन आणि त्याचे पालन करणारे ही आपलेच मन
३०२माणकीस बोललं, झुणकीस लागलंबोलणे एकाला अन् दुसऱ्या लागणे 
३०३मामुजी मेला अन् गांव गोळा झालालहान गोष्ट पण गावभर कालवा 
३०४मांजरीचे दात तिच्या पिल्लाला लागत नाहीआई वडिलांचे टोचून बोलणे लेकराला लागत नाही  
३०५मानेवर गळू आणि पायाला जळूरोग एकीकडे उपाय भलतीकडे 
३०६मारुतीची शेपूटसतत वाढत जाणारे काम 
३०७मुंगीला मिळाला गहू कुठे नेऊ अन् कुठे ठेवूछोट्याशा गोष्टींनीही हुरळून जाणे 
३०८मुंगीला मुताचा पूरकाही लोकाला छोटे संकट ही डोंगराएवढी वाटते 
३०९ मुलाचे पाय पाळण्यात दिसतातलहान वयातच मुलाच्या भावी गुणदोषांचे दर्शन होते
३१०मूर्ख लोक भांडते वकील घरी बांधतेभांडण दोघांचे अन् लाभ तिसऱ्याला
३११म्हशीला मणभर दूधएखाद्याचे मेल्यावर कौतुक करणे
३१२म्हातारीने कोंबडे लपविले म्हणून उजडायचे राहत नाहीज्या गोष्टी होने अटल असतात त्या कोणाच्या थांबवल्याने थांबत नाहीत
३१३यथा राजा तथा प्रजासामान्य लोक नेहमी मोठ्यांचे नक्कल करतात 
३१४या बोटाची थुंकी त्या बोटावर करणेगंडवागंडवी करणे
३१५रे माझ्या मागल्याएखाद्याने कितीही चांगला सल्ला देऊन ही पूर्वीप्रमाणेच वागणे 
३१६ये रे कुत्र्या खा माझा पायस्वता आपणहून संकट अंगावर घेणे
३१७रंग जाणे रंगारीज्याची विद्या त्यालाच माहीत
३१८रात्र थोडी सोंगे फारकामे खुप पण थोडा वेळ असणे
३१९रडत राऊत रडत राव घोड्यावर स्वारइच्छा नसताना एखादे काम करावे लागने 
३२०रामाशिवाय रामायण कृष्णाशिवाय महाभारतएखाद्या कतेथ गरजेच्या गोष्टींचा अभाव 
३२१राईचा पर्वत करणेमूळ गोष्ट अगदी क्षुल्लक असता तिचा विपर्यास करून सांगणे 
३२२राज्याचे घोडे आणि खासदार उडेवस्तू एकाची मिजास दुसऱ्याची 
३२३रोज मरे त्याला कोण रडेतीच ती गोष्ट वारंवार होऊ लागली म्हणजे तिच्यातील स्वारस्य नष्ट होते व तिच्याकडे कोणीही लक्ष देत नाही
३२४लग्नाला वीस तर वाजंत्री ला तीसकाम सोडून नको ते उपद्याप करणे 
३२५लकडी दाखविल्या शिवाय मकडी वळत नाहीदम दिल्याशिवाय शिस्त लागत नाही
३२६लग्नाला गेली आणि बारशाला आलीखुप वेळाने पोहोचणे
३२७लंकेत सोन्याच्या विटा दुसऱ्या ठिकाणी असलेल्या गोष्टींचा फायदा आपल्याला नसतो
३२८लाज नाही मला कोणी काही म्हणाजो मानुस निर्लज्ज असतो तो दुसऱ्याने केलेल्या टीकेची पर्वा करत नाही
३२९ लेकी बोले सुने लागेएकाला उद्देशून बोलने पण ते दुसऱ्याला लागेल असे बोलणे 
३३०लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः मात्र कोरडे पाषाणलोकांना सल्ले द्याचे पण स्वता मात्र त्याप्रमाणे वागायचे नाही 
२३१वळणाचे पाणी वळणावर जाणेआयुष्यात ज्या गोष्टी घडायच्या त्या घडतच राहणार 
२३२वरातीमागून घोडेवेळ काळ निघून गेल्यावर काम करणे 
२३३वारा पाहून पाठ फिरविणेपरिस्थिती पाहून काम करणे
२३४वाहत्या गंगेत हात हात धुणे किंवा आपल्या तव्यावर पोळी भाजून घेणेचालू काममधे आपला फायदा करून घेणे 
२३५वासरात लंगडी गाय शहाणीमूर्ख माणसा थोडेसे ज्ञान असणारा व्यक्ति ही श्रेष्ठ असतो  
२३६वाघ म्हटले तरी खातो आणि वाघोबा म्हटले तरी खातोचआपण वाइट व्यक्तीला चांगले म्हणा की वाइट तो त्रास देणारच  
२३७विंचवाचे बिऱ्हाड पाठीवरजगण्यात जेवढ्या वस्तु पुरेश्या आहेत तेवढ्याच घेऊन फिरणे 
२३८विशी विद्या तिशी धनआयुष्यात वेळेत कामे केली की त्यावरून कर्तुत्वाचा अंदाज बांधता येतो 
२३९ विचाराची तूट तेथे भाषणाला उतबिंडोकानच्या गर्दीत नुसती बडबड असते  
३४०विश्वासही ठेवला घरी चारी सुना गरवार करीआपल्याच माणसाने विश्वासघात करणे
२४१शहाण्याला शब्दाचा मारशहाण्या शब्दांनी समजवले तरी त्याला समझते 
३४२शितावरून भाताची परीक्षावस्तूच्या लहान भागावरून त्या पूर्ण वस्तुचे मुल्यांकन करणे
३४३शेरास सव्वाशेरएकाला दुसरा वरचढ भेटणे 
३४४शेजी देईल काय आणि मन धायेल काय?शेजारणीने एखादा पदार्थ सढळ हाताने करून दिला तरीच मनाची तृप्ति होऊ शकत नाही 
३४५शेजीबाईची कढी, धावधाव वाढीएकाची वस्तू घेऊन दुसऱ्यावर उपकार दाखविणे  
३४६शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटीचांगल्याच्या बरोबर चांगल्या गोष्टी येतात
३४७सगळेच मुसळ केरातकेलेले सर्व परिश्रम वाया जाणे  
३४८सरड्याची धाव कुंपणापर्यंतचप्रत्येकाच्या कामाची सिमा ठरलेली असते
३४९ समर्थाघरचे श्वान त्याला सर्व देती मानमोठ्या व्यक्तिच्या घरच्या नोकरालहि मान द्यावा लागतो  
३५०संन्याशाच्या लग्नाला शेंडीपासून सुरुवातमुळापासून गोष्टीची सुरुवात करणे
३५१संग तसा रंगसंगत असेल तसे वर्तन होते 
३५२सारा गांव मामाचा एक नाही कामाचाजवळ भरपूर व्यक्ती आहेत पण कोणीच उपयोगी नाहीं
३५३साप साप म्हणून भुई धोपटणेसंकट नसताना त्याचा आभास करने 
३५४सात हात लाकुड नऊ हात ढलपीएखादी गोष्ट खूप मोठी करूँन फुगवून सांगणे
३५५सांगी तर सांगी म्हणे वडाला वांगीअशक्य गोष्ट साकरने 
३५६सुरुवातीलाच माशी शिंकलीसुरवातीलाच अपशकून
३५७सुंभ जळाला तरी पीळ जात नाहीसंपत्ति गेली तरी अकड़ जात नाही  
३५८स्नान करून पुण्य घडे तर पाण्यात बेडूक काय थोडेवरवरच्या दिखाव्याने पुण्य प्राप्त होत नाही 
३५९ हत्तीच्या पायी येते आणि मुंगीच्या पायी जातेवाइट गोष्टी लवकर येतात पण कमी होताना जातात 
३६०हृदयाचा उन्हाळा आणि डोळ्यांच्या पावसाळाबनावट रडने, अश्रू ढाळणे 
३६१हत्तीच्या दाढे मध्ये मिऱ्याचा दाणामोठ्या उपायांची गरज असताना अतिशय छोटे उपाय करावे  
३६२हत्ती गेला पण शेपूट राहिलेकामाच्या मोठा भाग पूर्ण झालं आणि फक्त थोडे शिल्लक राहिले 
३६३हलवायाच्या घरावर तुळशीपत्रस्वताच दुसऱ्याची वस्तू तिसर्‍याला नेऊन देणे 
३६४हत्ती बुडतो अन् शेळी ठाव मागतेज्या गोष्टी केरनीसाठी मोठे धदवतात ते थे लहान लोग उडया मारतात 
३६५हात ओला तर मित्र भलातुमच्या पासून काहीतरी मिळणार असेल तर लोक तुमचीशी गोड़ वागतात
३६६हात फिरे तिथे लक्ष्मी वसेप्रयन्तशील माणसाच्या घरी लक्ष्मी आणि संपत्ती नांदते  
३६७हातच्या काकणाला आरसा कशालास्पष्ट झालेल्या गोष्टीला पुरावा नको
३६८हाजिर तो वजीरजो ऐन वेळेला उपस्तिथअसतो त्याचाच फायदा होतो 
३६९ हातचे सोडून पळत्याच्या मागे लागणेआपल्याला मिलते ते सोडून नको त्या गोष्टींसाठी प्रयत्न करने
३७०हिरा तो हिरा गार तो गारगुणी माणसाचे गुण कधीच लपत नाही 
३७१चांगल्या मनुष्याचा लेकरू नाठाळ चांगल्या मनुष्याचा लेकरू नाठाळ 
३७२होळी जळाली आणि थंडी पळालीहोळी सनानंतर थंडी कमी होते 
३७३श्रीच्या मागोमाग ग येतोऐश्वर्य, संपत्तीबरोबर नेहमी गर्व येत
३७४कष्ट करणार त्याला देव देणार परिश्रम केल्यास असाध्य बाब साध्य होऊ शकते
३७५जिच्या घरी ताक तिचे वरती नाकसमर्थ व्यक्ती आपल्या संपतिचा बडेजाव करतो
३७६ज्वारी पेरली तर गहू कसा उगवणार?वाईट गोष्टीतून चांगले किवा चांगल्या गोष्टीतून वाईट तयार होत नसते
३७७डोंगर पोखरून उंदीर काढणेजास्त श्रम करून कमी फायदा होणे
३७८तोंड दाबून बुक्क्यांचा मारविनाकारण जुलूम सहन करावा लागणे
३७९अंगाची लाही लाही होणेखूप संतापणे
३८०अंगाचा तीळ-पापड होणेखूप संतापणे
३८१अंगाची तलखी होणेखूप संतापणे
३८२अंगात नाही बळ आणि चिमटा घेउन पळदुर्बळ मनुष्य बलवान व्यक्ती वर सरळ हल्ला न करता छोटी खोडी काढून पसार होतो
३८३अंतकाळापेक्षा मध्यांन्नकाळ कठीणमरणापेक्षा भुकेच्या यातना कठीण असतात
३८४अंथरूण पाहून पाय पसरावेआपली आवक जेव्हढी असेल तेवढेच पैसे खर्च करावे
३८५अंधारात केले तरी उजेडात आलेगुप्तपणे केलेली गोष्ट कधीही सर्वाना कळू शकते
३८६अक्कल खाती जमानुकसान होणे
३८७अक्कल नाही काडीची नाव सहस्त्रबुद्धेनावाप्रमाणे लोक नसतात
३८८अक्कल नाही काडीची म्हणे बाबा माझे लग्नं कराक्षमता नसताना एखाद्या गोष्टीचा हट्ट करणे
३८९अगं अगं म्हशी, मला कुठं नेशी?एकाच्या चुकीसाठी इतर लोकाना दोष लावणे
३९०अचाट खाणे मसणात जाणेअती प्रमाणात कोणतीही गोष्ट घातक ठरू शकते
३९१अठरा विश्व दारिद्र्य त्याला छत्तीस कोटी उपायजीवनात यशस्वी होण्यासाठी अनेक उपाय आहेत, फक्त ते आचरणात आणले पाहिजेत
३९२अठरा विश्वे दारिद्र असणेअति दुर्बळ असणे
३९३अडाण्याची गोळी भल्यास गिळीअशिक्षीत माणूस कोणालाही अडचणीत आणू शकतो
३९४अडला नारायण गाढवाचे पाय धरीबलाढ्य व्यक्ती गरज असताना कोणत्याही व्यक्तीकडे मदतीची याचना करू शकतो
३९५अडला हरी गाढवाचे पाय धरीअडचणीच्या वेळी मूर्खाचीही मनधरणी करावी लागते
३९६अडली गाय अन फटके खायअडचणीत सापडलेल्या व्यक्तीस जास्त त्रास देणे.
३९७अडली गाय खाते कायगरजू माणूस कोणत्याही अटी स्वीकारून काम करतो
३९८अडाण्याचा गेला गाड़ा, वाटेवरची शेते काढामूर्ख माणूस कोणत्याही प्रकारे विचित्र वर्तन करू शकतो
३९९अति तेथे मातीकोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाल्यास काम बिघडते
४००अति राग भीक मागक्रोधामुळे कोणतीही गोष्ट साध्य करता येत नाही
४०१अति शहाणा त्याचा बैल रिकामाशिष्ट माणसाशी व्यवहार करताना लोक जपून वागतात त्यामुळे त्यांना काम करणे जड जाते
४०२अतिपरीचयेत अवज्ञाअतिघनीष्ट सबंध हानिकारक ठरू शकतो
४०३अती झालं अन हसू आलंएखाद्या गोष्टीचा जास्त उहापोह केला तर ती गोष्ट हास्यास्पद ठरते
४०४अनुभवल्याशिवाय कळत नाही, चावल्याशिवाय गिळत नाहीएखाद्या गोष्टीत सहभाग घेतल्याशिवाय ती गोष्ट साध्य होत नाही
४०५अनोळख्याला भाकरी द्यावी पण ओसरी देऊ नयेअपरिचित माणसाशी अधिक सलगी करू नये
४०६अन्नछत्रात मिरपूड मागू नयेगरजवंत व्यक्तीला पर्याय नसतो
४०७अपयश ही यशाची पहिली पायरी आहेकोणत्याही यश मिळवताना सुरवातीला अपयश येऊ शकते
४०८अपयश हे मरणाहून वोखटेअपयश मरणापेक्षा भयंकर आहे व लाजीरवाणे आहे
४०९अपुऱ्या घड्याला डब-डब फारकमी बुद्धिवान माणूस आपले ज्ञान उगाच सर्व दूर सांगत सुटतो
४१०अप्पा मारी गप्पाकाही रिकामटेकडे उगाच चर्चेचे पाल्हाळ लावतात
४११अल्प बुद्धी, बहू गर्वीकमी बुध्दीच्या माणसास खूप गर्व असतो
४१२अल्प मनुष्य कोपे, लहान भांडे लवकर तापेकमी बुद्धिवान माणूस तापत असतो
४१३अवघड ठिकाणी दुखणे आणि जावई डॉक्टरएखादी गोष्ट सांगता येत नाही आणि सोसवत पण नाही
४१४असंगाशी संग प्राणाशी गाठअयोग्य माणसाची सांगत धरल्यास प्राणही जाऊ शकतो
४१५असतील शिते तर नाचतील भुतेसंपत्ती असलेल्या व्यक्तीकडे सर्वजण येतात
४१६असेल तेव्हा दिवाळी नाहीतर शिमगाभरपूर द्रव्य असल्यावर चैन करायची नाहीतर गप्प बसायचे
४१७आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोनअपेक्षेपेक्षा जास्त लाभ होणे
४१८आंधळी पाण्याला गेली अन घागर फोडून घरी आलीअक्षम व्यक्तीस काम दिल्यास ते तडीस जाणे कठीण असते
४१९आंधळीपेक्षा तिरळी बरीएखादी बाब अगदीच वाईट स्वीकारण्यापेक्षा थोडी दोष असलेली गोष्ट स्वीकार करणे कधीही चांगले
४२०आंधळे दळते अन कुत्रे पीठ खातेएकाने कष्ट करायचे अन दुसऱ्याने लाभ घ्यायचा
४२१आंधळ्या प्रजेत हेकणां राजाअसहाय्य गरीब लोकांमध्ये एखादा चुकीचे निर्णय घेऊन राज्य करतो
४२२आंधळ्याची बहियाशी गाठएकमेकांना मदत न करणाऱ्या व्यक्ती जवळ येणे
४२३आई जेवू घालीना बाप भिक मागू देईनादोन्हिकडून संकटात सापडणे
४२४आई जेवू घालीना बाप भीक मागू देईनादोन्ही बाजूंनी अडचण
४२५आईचा काळ नि बायकोशी मवाळआईशी वाईट वागून बायकोला महत्त्व देणे
४२६आईची माया न पोर जाई वायाअति लाडाने मुल बिघडते
४२७आईजीच्या जिवावर बाईजी उदारदुसऱ्याचा पैसा दान करून स्वतः चा बडेजाव दाखविणे
४२८आकांक्षापुढती गगन ठेंगणेआशावाद ठेवल्यास कोणतेही लक्ष्य साध्य होते
४२९आकारे रंगती चेष्टामाणसाच्या बाह्य स्वरूपावरून त्याचा कार्याचा अंदाज करता येत नाही
४३०आखाड्याच्या मैदानात पहिलवानाची किंमतमाणसाला योग्य ठिकाणीच किंमत मिळते
४३१आखुड शिंगी आणि बहुदुधीसर्व आपल्या मनासारखे व्हावे असे वाटणे
४३२आग सोमेश्वरी नि बंब रामेश्वरीगरजू माणसाला मदत न करता, गरज नसलेल्या माणसाला मदत करणे
४३३आगीतून निघून फुफाट्यात पडणेएका संकटातून निघून दुसऱ्या संकटात सापडणे
४३४आचार तेथे विचारचांगली संस्कृती चांगल्या विचाराना जन्म देते
४३५आचार भ्रष्ट नि सदा कष्टअनाचाराने वागणारा माणूस सदा दुःखी असतो
४३६आज अंबरी उद्या झोळी धरीकधी थाटामाटात तर कधी दरिद्री राहणे
४३७आजा मेला नि नातू झालाएकीकडे फायदा तर दुसरीकडे तोटा होणार
४३८आठ पुरभय्ये अन नऊ चौबेजमत नसल्यास सगळ्यांची चूल वेग-वेगळी असते
४३९आठ हात काकडी नउ हात बीएखाद्या गोष्टीची फारच स्तुती करून सादर करणे
४४०आठ हात लाकुड, नऊ हात धलपीएखाद्या गोष्टीची फारच स्तुती करून सादर करणे
४४१आडात नाही तर पोहयात कोठून येणारएखादी गोष्ट अस्तित्वात नसतांना त्याची अपेक्षा करणे व्यर्थ आहे
४४२आत्याबाईला मिशा असत्या तर तिला काकाच म्हटले असतेअशक्य गोष्टींची चर्चा करण्यात काही अर्थ नसतो
४४३आधणातले रडतात अन सुपातले हसतातदुसऱ्यांना हसताना विचार करणे क्रमप्राप्त आहे, काही दिवसांनी तशी वेळ आपल्यावरही येऊ शकते
४४४आधी करावे मग सांगावेकार्य तडीस गेल्याशिवाय त्याबद्दल उगाच बोलू नये
४४५आधी जाते बुद्धी मग जाते लक्ष्मीआधी वर्तन बिघडते मग मनुष्य कंगाल होतो
४४६आधी पोटोबा मग विठोबाअगोदर पोट भरावे मग देवास आळवावे
४४७आधीच आम्हाला हौस, त्यात पडला पाऊसएखाद्या अचानक ठरलेल्या गोष्टीत बाधा उत्पन्न होणे
४४८आधीच उल्हास त्यात फाल्गुन मासआधीच हौशीने केलेलं काम अन त्याला अनुकूल परिस्थिती निर्माण होणे
४४९आधीच मर्कट तशातच मद्य प्यालाआधीच विचित्र बुद्धीचा,अन अवास्तव प्रोत्साहन मिळाल्यामुळे त्याच्या चेष्टाना उत येतो
४५०आपण चिंतीतो एक पण देवाच्या मनात भलतेचप्रत्येकच गोष्ट आपल्या मनासारखी होत नाही
४५१आपण शेण खायचं अन दुसऱ्याच तोंड हुंगायचस्वतः वाईट कर्म करायचे अन दुसऱ्यावर संशय घ्यायचा
४५२आपण सुखी तर जग सुखीआपण आनंदात असता सर्व जग सुखी वाटणे
४५३आपण हसे लोकाला अन घाण आपल्या नाकालाज्या दोषाबद्दल लोकास हसायचे, तोच दोष आपल्यात असताना दुर्लक्ष करणे
४५४आपला तो बाब्या दुसऱ्याच ते कारटंस्वतःच्या चुकांकडे दुर्लक्ष करून दुसऱ्याच्या चुकांविषयी बोलणे
४५५आपला हात जगन्नाथआपली उन्नती आपल्यावरच अवलंबून असते, आपल्या हातात अधिकार आला तर त्याचा दुरुपयोग करून जिन्नस लाटणे
४५६आपली पाठ आपणास दिसून येत नाहीआपले दोष आपल्याला दिसत नाहीत
४५७आपले नाक कापून दुसऱ्याला अपशकूनआपले नुकसान झाले तर दुसऱ्याचे पण नुकसान होवो ही मनीषा मनात बाळगणे
४५८आपले नाही धड अन शेजाऱ्याचा कढआपली परिस्थिती चागली नसताना दुसऱ्याच्या परिस्थिती विषयी कळकळ दाखविणे
४५९आपलेच दात अन आपलेच ओठआपल्या माणसांनी आपल्याच माणसाना त्रास देणे
४६०आपल्या अळवाची खाज आपणास ठावीआपले दोष आपल्यालाच माहित असते
४६१आपल्या गल्लितच कुत्रे शिरजोरआपल्या भागात आपला वरचष्मा ठेवणे
४६२आपल्याच पोळीवर तूप ओढून घ्यायचेइतरांचा विचार न करता स्वार्थ साधणे
४६३आभाळ फाटल्यावर त्याला ठिगळ कसे लावायचेमोठे संकट आले की बचाव करणे अवघड असते
४६४आमचे गहू आम्हालाच देऊआपल्याच वस्तूचा चतुराईने दुसऱ्याना लाभ न मिळू देता स्वतःच लाभ घेणे
४६५आयत्या पिठावर रेखोट्या मारणेकोणतेही काम न करता दुसऱ्याच्या जिवावर उपभोग घेणे
४६६आयत्या बिळावर नागोबाकोणतेही काम न करता दुसऱ्याच्या जिवावर उपभोग घेणे
४६७आरोग्य हेच ऐश्वर्यचांगले आरोग्य ही यशाची गुरुकिल्ली आहे
४६८आलिया भोगासी असावे सादरआलेल्या संकटास कुरकुर न करता तोंड देणे भाग असते
४६९आली चाळीशी, करा एकादशीपरिस्थितीनुसार आपल्या सवयी बदलवणे
४७०आलीया भोगासी असावे सादरआपल्यावर आलेली संकटाना आपल्यालाच तोंड द्यावे लागते
४७१आले अंगावर घेतले शिंगावरसंकटाचा सामना धैर्याने करावा
४७२आवळा देऊन कोहळा काढणेअल्प आमिष दाखवून मोठे काम करून घेणे
४७३आशेची माय निराशानिराशा येईल म्हणून आशा कधीही सोडू नये
४७४आसू ना मासू , कुत्र्याची सासूआसू ना मासू , कुत्र्याची सासू
४७५आस्मान दावणेपराजय करणे
४७६इकडे आड तिकडे विहीरकोंडी होणे – दोन्ही बाजूनी संकटात सापडणे
४७७इच्छा तसे फळमनात चांगले विचार ठेऊन केलेले कार्य यशस्वी होतेच
४७८इच्छिलेले घडते तर भिक्षुकही राजे होतेसर्व इच्छेप्रमाणे झाले असते तर सर्व लोकं धनवान झाले असते
४७९इजा बिजा तीजाएकसारख्या होणाऱ्या घटना टाळता येत नाही
४८०इज्जतीचा फालुदा होणेअपमान होणे
४८१उंच वाढला एरंड तरी होईना इक्षुदंडछोट्या गोष्टी मोठ्यांशी बरोबरी करू शकत नाही
४८२उंटावरचा शहाणामूर्ख सल्ला देणारा
४८४उंटावरून शेळ्या हाकणेआळस, हलगर्जीपणा करणे
४८४उंटावरून शेळ्या हाकणेकोणत्याही कामात सहभाग न घेता उगाच फुकटाचे मार्गदर्शन करणे
४८५उंदराला मांजर साक्षवाईट माणसाने दुसऱ्या वाईट माणसाविषयी चांगले सांगणे
४८६उंदीर गेला लुटी अन आणल्या दोन मुठीमनुष्य आपल्या कुवतीनुसार काम करतो
४८७उकराल माती तर पिकतील मोतीशेतीची चांगली मशागत तर पिके चांगली येतात
४८९उकिरड्याची दैना बारा वर्षांनी देखील फिटतेगरीब व्यक्तीचे दिवस कधीही पालटू शकतात
४९०उखळात डोके घातल्यावर मुसळाची भीती कशालाएखादे मोठे, कठीण काम हातात घेतल्यानंतर श्रमांचा विचार करायचा नसतो
४९१उघड्या डोळ्यांनी प्राण जात नाहीधडधडीत नुकसान होत असताना न प्रतिकार करता माणसाला स्वस्थ बसवत नाही
४९२उघड्याकडे नागडा गेला अनं रात्रभर हिवाने मेलाएक लहान पत असलेली व्यक्ती दुसऱ्या गरीब व्यक्तीची बरोबरी करू शकत नाही
४९३उचल पत्रावळी म्हणे जेवणारे कितीमुद्द्याचे काम सोडून भलतीच चौकशी करणे
४९४उचलली जीभ लावली टाळुलाकोणताही विचार न करता बोलणे
४९५उचलली जीभ लावली टाळ्यालाबेताल बोलणे
४९६उठता लाथ बसता बुक्कीकायम धाकात ठेवणे
४९७उडत्या पक्षाची पिसे मोजणेसहज चालता बोलता एखाद्या गोष्टीची पारख करणे
४९८एकटा जीव सदाशिवएकटा माणूस चिंतामुक्त अन सुखी असतो
४९९एकदा की नाव कानफाट्या पडले की पडलेचलोकात एकदा की नाचक्की झाली की लोकं त्याच दृष्टीने पाहतात
५००एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथएकमेकांच्या सहकार्याने सर्वांचाच फायदा होतो
५०१एकावे जनाचे करावे मनाचेसर्वांचे विचार एकूण आपला स्वतःचाच निर्णय घ्यावा
५०२एका कानाचे दुसऱ्या कानाला कळत नाहीअत्यंत गुप्तपणे आपले कार्य करणे
५०३एका कानाने एकवे दुसऱ्या कानाने सोडून द्यावेऐकलेल्या सगळ्याच गोष्टींचा विचार करणे व्यर्थ आहे
५०४एका कानावर पगडी घरी बाईल उघडीबाहेर श्रीमंतीचा आव आणायचा व घरी दारिद्र्यात राहणे
५०५एका दगडात दोन पक्षी मारणेएकाच कार्यात दोन काम करणे
५०६एका पुताची माय वळचणीखाली जीव जायएक मुलगा पोटी असून सुद्धा तो आईला सुखाने जगू देत नाही
५०७एका माळेचे मनीसर्वजण येथून तेथून सारखे
५०८एका माळेचे मनी ओवायला नाही कुणीसर्व एकसारखे असताना कोणीच काम करत नाही
५०९एका हाताने टाळी वाजत नाहीदोष दोन्हीकडे असतो
५१०एका हाताने टाळी वाजत नाहीभांडणात एकाचीच चुकी नसते, प्रत्येकाची थोडी चूक असतेच असते
५११एकादशी अन दुप्पट खाशीनियमांच्या विरुद्ध वर्तन करणे
५१२एकादशीच्या घरी शिवरात्रएका दरिद्री माणसाचा दुसऱ्या दरिद्री माणसाचा उपयोग होत नाही
५१३एकाने गाय मारली तर दुसऱ्याने वासरू मारू नयेएकाने वाईट गोष्ट केली तर आपल्यालाही वाईट गोष्ट करण्याचा हक्क पोहोचत नाही
५१४एकी हेच बळएकत्र समुदाय कायम जिंकतो
५१६एकूण घेत नाही त्याला सांगू नये काहीजो एकात नाही त्याला समजावण्याचा प्रयत्न करू नये
५१६एरंडाचे गुऱ्याळएखादी गोष्ट लांब-लचक व कंटाळवाणी असणे
५१७ऐकावे जनाचे पण करावे मनाचेदुसऱ्यांचे न ऐकता स्वतःचे निर्णय स्वतः घेणे
५१८ऐतखाऊ लांडग्याचा भाऊकष्ट न करण्याची सवय असलेला मनुष्य कुठेही आयते खायला मिळाले की डल्ला मारतात
५१९ओ म्हणता ठो येईनाकसलेही ज्ञान नसणे, लिहिता वाचता न येणे
५२०ओठात एक नि पोटात एकप्रकट करताना विचार वेगळे अन मनात काही वेगळेच विचार
५२१ओठी तेच पोटीबोलावे तसे वागावे, सरळमार्गी माणूस
५२२ओढाळ गुराला लोढणे गळ्यालागुन्हेगाराला कायद्याचा वाचक बसावयास हवा
५२३ओल्याबरोबर सुके जळतेदुष्टांच्या बरोबर राहिल्याने सज्जन माणसास त्रास होतो
५२४ओळखीचा चोर जीवे मारीएखाद्याला आपण गुन्हा करताना पाहिल्यास तर तो आपल्या जिवावर उठतो
५२५ओसाड रानात एरंडाचा उदो उदोअशिक्षित गावात कमी शिकलेला माणूस विद्वान ठरतो
५२६औषधा वाचून खोकला गेलापरस्पर संकट टळले
५२७कठीण समय येता कोण कामास येतोआपल्या अडचणीच्या वेळेस कोणीही मदतीला येत नाही
५२८कडू कारले तुपात तळले, साखरेत घोळले तरी ते कडू ते कडूचवाईट व्यक्तीची वाईट सवय कधीही जात नाही
५२९कधी गाडीवर नाव तर कधी नावेवर गाडीसर्वाना प्राप्त परिस्थितीनुसार वागावेच लागते
५३०कधी तुपाशी तर कधी उपाशीपैसा असला तर चंगळ करायची नाही तर उपाशी
राहायचे
५३१कमरेचे सोडले नि डोईला बांधलेसर्व लाज-लज्जा टाकून देणे
५३२कर नाही त्याला डर कशालादोषी नसताना कसलेही भय राहत नाही
५३३करंगळी सुजली तर डोंगरा एवढी होईल कायछोट्या माणसाला थोर माणसाची बरोबरी करणे अशक्य आहे
५३४करवंदीच्या जाळीला काटेचांगल्या वस्तूबरोबर वाईट गोष्टींचा सामना करावयास लागायचाच
५३५करायला गेले गणपती अन झाला मारुतीजे करायचे ते नित समजून करावे नाही तर भलतेच घडते
५३६करायला गेलो एक आणि झाले भलतेचचांगले करायला गेले तरी वाईट घडणे
५३७करावे तसे भरावेजसे आपले कर्म असते तसेच फळ मिळते
५३८करीन ती पूर्वअंगी असे कर्तुत्त्व असावे की जे ठरविले ते घडून आलेच पाहिजे
५३९करून करू भागले अन देवपूजेला लागलेवाईट गोष्टींचा वीट आल्यावर चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करणे
५४०करून गेला गाव अन दुसऱ्याचेच नावएकाने केलेल्या गुन्ह्याचा आरोप दुसऱ्यावर ठेवणे
५४१कर्कशेला कलह तर पद्मिनीला प्रीती गोडदुष्ट स्त्रीला भांडणे आवडतात गुणवतीला प्रेम आवडते
५४२कळते पण वळत नाहीचांगल्या गोष्टी कृतीत आणता येणे कठीण आहे
५४३कवड्यांचे दान केले अन गावात नगारे वाजविलेदान छोटे करून इतर लोकांना महती सांगत फिरणे
५४४कशात काय अन फाटक्यात पायबडेजाव दाखविला तरी उपयोग नसतो
५४५कसयाची कारणी अन मानभावी बोलणीगोड गोड बोलायचे अन निष्ठर वागायचे
५४६कसायाला गाय धार्जिणीगुंडांच्या पुढे लोकं नमतात व पुढे पुढे करतात
५४७काकडीची चोरी अन फाशीची शिक्षाथोड्याश्या अपराधानंतर फार मोठी शिक्षा करणे
५४८काखेत कळसा गावाला वळसाजवळ असलेली वस्तू सर्वदूर शोधणे
५४९काट्यावाचून गुलाब नाहीचांगली गोष्ट कठीण परीश्रमाने मिळते
५५०काठी मारल्याने पाणी दुभंगत नाहीखरी मैत्री आगंतुक कारणाने तुटत नाही
५५१कानामागून आली तिखट झालीनवीन आलेली व्यक्ती लवकरच यशस्वी होणे
५५२काम न धंदा, हरी गोविंदारिकामटेकडा मनुष्य फक्त बडबड करण्यात आपला वेळ घालवतो
५५३काम नाही घरी अन सांडून भरीकाम नसताना उगाच काम निर्माण (वाढवून) तेच काम परत परत करणे
५५४कामा पुरता मामाव्यावहारीक जगात स्वार्थ बाळगणे
५५५काय ग बाई उभी घरात दोघी तिघीघरात काम करणारे पुष्कळ वाढले की प्रत्येकजण कामचुकारपणा करू लागतो
५५६काळ आला होता पण वेळ आली नव्हतीप्राणांतिक संकटातून वाचणे
५५७काळी बेंद्री एकाची अन सुंदर बायको लोकाचीसर्वाना आपल्या गोष्टीपेक्षा इतरांच्या चांगल्या आहेत असे वाटते
५५८कावळा बसायला अन फांदी तुटायला एकाच घातयोगायोगाने एखादी गोष्ट घडून भलत्याच गोष्टीचा संबंध वेगळ्याच गोष्टीला लावणे
५५९कावळ्याच्या शापाने गाय मरत नाहीदुर्जन व्यक्तीच्या चिंतनाने चांगल्या माणसाचे नुकसान होऊ शकत नाही
५६०काविळ झालेल्यास सर्व पिवळे दिसतेआपणास ज्या गोष्टी जसे विचार करतो तश्याच वाटतात
५६१कुंपणानेच शेत खाणेरक्षणकर्त्यानेच नुकसान करणे
५६२कुठे इंद्राचा ऐरावत कुठे शामभट्टाची तट्टाणीबलाढ्य माणसाची तुलना दुर्बळ माणसाशी होऊ शकत नाही
५६३कुठे राजा भोज कुठे गंगुतेलीबलाढ्य माणूस आणि दुर्बळ यांची तुलना होऊ शकत नाही
५६४कुठेही जा पळसाला पाने तीनचसर्वत्र परिस्थिती सारखीच असते
५६५कुन्हाडीचा दांडा गोतास काळदुसऱ्यांना इजा करताना आपल्यालाही इजा होऊ शकते. सकाळ इजा करताना आपल्याला
५६६ कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी वाकडे ते वाकडेचवाईट व्यक्तीची वाईट सवय कधीही जात नाही
५६७कु-हाडीचा दांडा गोतास काळआपल्या जातभाईंचे नुकसान होणे
५६८कुसंतानापेक्षा नि:संतान बरेवाईट मुले पोटी जन्मल्यापेक्षा मुले जन्माला न आलेली चांगली
५६९केली खाता हरखले व हिशेब देता कचरलेकोणताही विचार न करता कर्ज करायचे व देणी वाढली की काळजी करायची
५७०केव्हाच नाही त्यापेक्षा उशीर बराअशक्य गोष्ट उशीरा हाती घेतलेली बरी
५७१कोंबड झाकलं तरी तांबड उगवल्या शिवाय राहत नाहीसत्य कधीही लपत नाही
५७२कोल्हयाला द्राक्षे आंबटचन मिळणारी गोष्ट आवडत नाही असे दर्शवीणे
५७३कोल्हा काकडीला राजीलहान माणसे थोड्या गोष्टीने संतुष्ट होतात
५७४कोळसा उगाळावा तेवढा काळावाईट व्यक्तीचा अनुभव कायम वाईट असतो
५७५क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहेअधिक बोलण्या पेक्षा काम करणे चांगले असते
५७६खतास महाखतप्रत्येक वाईट माणसास दुसर वरचढ माणूस मिळतोच
५७७खाई त्याला खव-खवेज्यांनी चोरी केली तो अस्वस्थ होतो
५७८खाजवून खरुज काढणेएखाद्याची उगाचच कुरापत काढणे
५७९खाण्याराला चव नाही रांधणारयाला फुरसत नाहीएखाद्या गोष्टीची मागणी वाढली की ती गोष्ट मुक्तपणे सहन करणे भाग असते
५८०खाता पिता दोन लाथाकायम धाकात ठेवणे
५८१खायला काळ भुईला भारज्याचा काही उपयोग नाही असा माणूस भार बनतो
५८२खायला कोंडा निजेला धोंडाअत्यंत दारिद्य असणे
५८३खाली मुंडी पाताळ धुंडीस्वभावाने गरीब वाटणारा मनुष्य ही धोकेदायक असू शकतो
५८४खाल्ल्या घराचे वासे मोजणेज्या घरात राहतो त्याच घराशी बेईमानी करणे
५८५खाल्ल्या मिठाला जागणेमालकाशी प्रामाणिक राहून संकट काळी मदत करणे
५८६खिळ्यासाठी नाल गेला अन नालीसाठी घोडाव्यवस्थित नियोजन नसल्याने अपरिमित नुकसान होणे
५८७खिशात नाही दमडी अन बदलली कोंबडीऐपत नसताना बडेजाव दाखविणे
५८९खिशात न्हाई आणा, अन ह्याला बाजीराव म्हणागरीब मनुष्यास कोणीही कीमत देत नाही
५९०ग ची बाधा झालीफाजील आत्मविश्वास बळावणे
५९१गंगा वाहते तोवर हात धुवून घ्यावेजोवर लाभ घेता येतो तोपर्यंत स्वार्थ साधून घेणे
५९२गंगेत घोडं न्हालंसर्व इच्छा पूर्णत्वास जाणे
५९३गड आला पण सिंह गेलाएक महत्त्वाची गोष्ट मिळवताना दुसरी महत्त्वाची गोष्ट दूर जाणे
५९४गतं न शौच्यमएखादी गोष्टीचे महत्व संपल्या नंतर त्यासाठी उपाय योजना करणे व्यर्थ आहे
५९५गरज सरो नि वैद्य मरोस्वार्थी मनुष्य दुसऱ्यांचा विचार करत नाही
५९६गरज ही शोधाची जननी आहेगरजेच्या वेळी मनुष्य हर प्रकारे हवी ती गोष्ट मिळवणे
५९७गरजवंताला अक्कल नाहीअसहाय्य माणूस कोणाकडेही मदतीची याचना करतो
५९८गरजेल तो बरसेल कायमोठ-मोठ्या गोष्टी करणारे लोक मुळात काहीही काम करत नाहीत
५९९गरिबान खपाव, धनिकान चाखावदुबळ्या माणसाच्या जीवावर कोणीही बलाढ्य आपला फायदा करून घेतो
६००गर्वाचे घर खालीगर्व असलेल्या माणसाचा पराजय होतोच
६०१गाजराची पुंगी वाजली तर वाजली ,नाहीतर मग मोडून खाल्लीएखाद्या गोष्टीचा उपयोग आपल्या अपेक्षेप्रमाणे झालातर ठीक, नाहीतर त्याचा अन्य तर्हेने उपयोग करणे
६०२गाढवं मेलं ओझ्याने अन शिगरू मेलं हेलपाट्यानेसमजदार व्यक्ती काम करत, आपले जीवन व्यतित करतात तर मुर्ख मनुष्य काम न समजल्याने त्रस्त जगतो
६०३गाढवाचा गोंधळ लाथांचा सुकाळमुर्ख मनुष्य आपल्या वागण्याने सर्वदूर गोंधळ उडवतो
६०४गाढवाच्या पाठीवर गोणीकष्टकरी माणसाला तया कष्टा संबधित लाभ मिळत नाही तो लाभ इतरांना मिळतो
६०५गाढवाने शेत खाल्ले, पाप ना पुण्यवाईट व्यक्तीला त्याचा वागण्याचे काहीही वाटत नाही
६०६गाढवापुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होताचांगले ज्ञान दिल्यावरही व्यक्तीचे वाईट वागणे
६०७गाढवाला गुळाची चव कायमूर्ख माणसाला चांगल्या गोष्टींची किंमत नसते
६०८गाव करी ते राव न करीएकीचे बळ एकट्या माणसाच्या कामाच्या तुलनेत जास्त असते व त्यामुळे अशक्य गोष्टी सुद्धा साध्य होतात
६०९गाव तिथे उकिरडासर्व दूर सारखीच परिस्थिती असते. चांगले व वाईट
६१०गावात घर नाही अन रानात शेत नाहीकफल्लक असणे, दरिद्री असणे
६११गावात नाही झाड अन म्हणे एरंडया ला आले पानएखादी गोष्ट उगीचच वाढवून सांगणे
६१२गुरवाचे लक्ष निविद्यावरमनुष्य प्राण्याला स्वार्थाच्या गोष्टी लगेच कळतात
६१३गोगल गाय पोटात पायवरून दुर्बळ वाटणारे आतून स्वार्थी असू शकतात
६१४गोरा गोमटा कपाळ करंटानुसते दिखाऊपण काही कामाचे नसते
६१५घरचा उंबरठा दारालाच माहितघरातील गोष्टी घरातल्या लोकांनाच माहित असते
६१६घरात घाण दारात घाण कुठे गेली गोरीपानकाम न करता फक्त दिखाउपणा प्रदर्शित करणे
६१७घरात नाही एक तीळ अन मिशाला पिळगरीब असताना श्रीमंतीची एट करणे
६१८घरात नाही कौलान रिकामा डौलगरीब असताना श्रीमंतीची एट करणे
६१९घरोघरी मातीच्या चुलीसर्वदूर सारखीच परिस्थिती असते
६२०घार हिंडते आकाशी परी तिचे चित्त पिल्लांपाशीघर प्रमुखाचे लक्ष आपल्या मुलांकडेच असते
६२१घोंगडे भिजत पडणेएखादी गोष्ट खूप दिवसापासून प्रलंबित असणे
६२२घोडं झालया मराया अन बसणारा म्हणतो मी नवांदुसऱ्याचे दु:ख न पाहता आपलाच विचार करणे
६२३घोडा मैदान जवळ असणेपरीक्षा लवकरच होणे
६२४घोडे खाई भाडेएखाद्या गोष्टीवर भरमसाठ खर्च होणे
६२५घोड्यावर हौदा हत्तीवर खोगीरकोणताही विचार न करता विसंगत कृत्य करणे
६२७चकाकते ते सोने नसतेबडेजाव करणारे सर्वजण श्रीमंत नसतात. मोठे नाव फार उपयोगी ठरत नाही
६२८चढेल तो पडेलफार गर्व केला तर पराजय निशित असतो
६२९चतुर्भुज करणेअटक करणे
६३०चतुर्भुज होणेलग्न करणे
६३१चमडी जाईल पण दमडी जाणार नाहीपैश्यावर खूप प्रेम असणे, कंजूष असणे
६३२चमत्कारास नमस्कार करणेविशेषस असाध्य गोष्टीना मानाने
६३३चांगल्या कामाचा प्रारंभ स्वतःच्या घरापासून व्हावाचांगली गोष्ट स्वतः पासून सुरवात करावी
६३४चांभाराची नजर जोड्यावरआप-आपल्या व्यवसाया संबधित गोष्टींकडे मनुष्य अधिक रस घेऊन अवलोकन करतो. आपल्याला व्यवसाय मिळावा यासाठी मनुष्य सदैव जागरूक असतो
६३५चार आण्याचा मसाला बारा आण्याची कोंबडीएखाद्या छोट्या गोष्टीची किंमत कमी आणि इतर खर्च खूप जास्त असणे
६३६चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचेप्रत्येकाचा दिवस असतो
६३७चालत्या गाडीला खीळ घालणेएखाद्याच्या चांगल्या कामात व्यत्यय आणणे
६३८चिंती परा ते येई घरावाईट चिंतन केले की तशीच घटना आपल्या आयुष्यात घडते
६३९चुकणे हा मानवाचा धर्म आहेमनुष्य प्राणी हा चुकू शकतो
६४०चुकलेला फकीर मशिदीतमनुष्य आपल्या मूळ स्थानावर परततो
६४१चोर तो चोर वर शिरजोरगुन्हा कबूल न करता समोरच्यास दोषी ठरवणे
६४२चोर नाही तर चोराची लंगोटीभरपूर अपेक्षा असताना अल्प लाभावर समाधान मानणे
६४३चोर सोडून संन्याश्याला फाशीअपराधी व्यक्तीस दंड न करता निष्पाप व्यक्तीला त्रास देणे
६४४चोराच्या उलट्या बोंबागुन्हा कबूल न करता समोरच्यास दोषी ठरवणे
६४५चोराच्या मनात चांदणेवाईट व्यक्ती कायम कुटिल डाव रचत असतो
६४६चोराच्या वाटा चोरालाच माहीतवाईट कृत्य करणाऱ्या व्यक्तीस त्याचे मार्ग व स्त्रोत माहिती असतात
६४७चोरावर मोरप्रत्येक वाईट माणसाला कधीतरी दुसरा वरचढ माणूस मिळतोच
६४८चोरीचा मामला हळू हळू बोंबलावाईट गोष्ट सर्व बाजूंनी झाकण्याचा प्रयत्न होतो
६४९छडी लागे छमछम विद्या येई घमघमकठीण परिश्रम व दंड यामुळेच यश मिळते
६५०छत्तीसाचा आकडाविरुद्ध मत असणे
६५१जखमेवर मीठ चोळणेआधीच त्रस्त असताना परत त्याच गोष्टीविषयी त्रास देणे
६५२जपून पाऊल टाकणेकाळजीपूर्वक काम करणे
६५३जळत घर भाड्याने कोण घेणार?संकटग्रस्त गोष्ट कोणालाच आवडत नाही
६५४जळी स्थळी काष्ठी पाषाणी असणेसर्वदूर असणे
६५५जशास तशेसमोरच्या व्यक्ती व्यवहारानुसार आपला व्यवहार ठरवावा
६५६जशी कामना तशी भावनाआपण जसे चिंतन करतो त्याप्रमाणे आपले विचार बनतात
६५७जशी नियत तशी बरकतआपले यश आपल्या चांगल्या विचारांवर अवलंबुन असते
६५८जसा गुरु तसा चेलाएका प्रमुख व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाल त्या व्यक्तीच्या स्वभावचेच लोक निर्माण होतात
६५९जसा भाव तसा देवआपली जशी श्रध्दा असेल त्याप्रमाणे आपल्याला फळ मिळेल
६६०जात्यातले रडतात आणि सुपातले हसतातदुसऱ्यांना हसताना विचार करणे क्रमप्राप्त आहे, काही दिवसांनी तशी वेळ आपल्यावरही येऊ शकते
६६१जावयाचं पोर हरामखोरमाणसाची प्रवृत्ती आपल्या स्वार्थ साधण्यासाठीच असते
६६२जावे त्याचा वंशा,तेव्हा कळेएखाद्या व्यक्तीचे दु:ख त्याच्या जवळ गेल्यावर कळते
६६३जिकडे पोळी तिकडे गोंडा घोळीएखद्या ठिकाणी लाभ असता तिकडे विशेष लक्ष्य देणे
६६४जिकडे सुई तिकडे दोराघनिष्ट संबंध असणारे एकमेकांजावळ कायम असतात
६६५जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाहीवाईट व्यक्तीची वाईट सवय कधीही जात नाही
६६६जिथे कमी तेथे आम्हीपडेल ते काम करून समोरच्यास हातभार लावणे
६६७जेथे पिकतं तिथे विकतं नाहीएखादी गोष्ट विपुल प्रमाणात असलेल्या भागात त्या गोष्टीचे महत्त्व राहत नाही
६६८जो खाईल आंबा तो सोशेल ओळंबाएखाद्या गोष्टीचा लाभ घेताना त्याचे दोष स्वीकारावे
६६९जो दुसऱ्यावर विसंबला त्याचा कार्यभाग बुडालाआपले काम दुसऱ्यावर ढकलले तर अपयश येते
६७०जो श्रमी त्याला काय कमीकष्ट करणाऱ्या व्यक्तीस काही कमी पडत नाही
६७१ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळीएका प्रदेशात सर्व गुणधर्माचे लोकं राहतात
६७२ज्याचं जळतं त्यालाच कळतंआपले दु:ख आपल्यालाच सोसावे लागते
६७३ज्याचा कंटाळा त्याचा वानोळाजी कंटाळवाणी बाब असते तीच स्वीकारावी लागणे
६७४ज्याचा हात मोडेल त्याच्या गळ्यात पडेलवाईट कृत्य स्वतःलाच भोगावे लागते
६७५ज्याची मिळते पोळी त्याची वाजवावी टाळीआपल्या मालकाचे गुणगान करणे
६७६ज्याला नाही अक्कल त्याची घरोघरी नक्कलमुर्ख माणसाची सर्वत्र उपेक्षा व टिंगल होते
६७७झाकली मूठ सव्वा लाखाचीदुर्गुण असले तरी प्रकट करू नयेत
६७८झाडाजवळ छाया अन बुवाजवळ बायाथोडे आमिष दाखविले तरी मनुष्याची धाव तिकडेच असते
६७९झालं गेलं अन गंगेला मिळालंभूतकाळाच्या गोष्टी दुर्लक्ष करून पुढे मार्गक्रमण करणे
६८०टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाहीकष्टाशिवाय यश मिळत नाही
६८१ठकास महाठकप्रत्येक वाईट माणसाला त्यापेक्षा वरचढ माणूस मिळतोच
६८२ठेवीले अनंते तैसेची राहावेजी परिस्थिती आहे त्यात समाधान मानावे
६८३डल्ला मारणेदुसऱ्याची वस्तू चोरणे
६८४डोंगर पोखरून उंदीर कढणेजास्त श्रम करून कमी फायदा होणे
६८५डोळ्यात अंजन घालणेएखाद्यास दिवसाढवळ्या विश्वासघात करून फसविणे
६८६ढवळ्या जातो आणि पवळ्या येतो पण सावळा गोंधळ तसाच राहतोकारभारी व्यक्ती बदलली तरी फारसे बदल होत नाही अन तोच तो गोंधळ उडतो
६८७ढवळ्याशेजारी बांधला पावळया, वाण नाही पण गुण लागलादोन व्यक्तींना सोबत राहताना एकमेकांच्या सवयी लागणे
६८८तरण्याला लागली कळ अन म्हातारयाला आल बळतरुण माणूस आळशी असतो. अन पोक्त माणूस काम करतो
६८९तळ हाताने सूर्य झाकला जात नाहीछोट्या गोष्टीनी फार मोठे व थोर बाबी दडवता येत नाही
६९०तळ्यात मळ्यात करणेमनाची अवस्था अस्थिर असणे
६९१तवा तापला तोवर भाकरी भाजून घ्यावीजोवर लाभ घेता येतो तोपर्यंत स्वार्थ साधून घेणे
६९२तहान लागल्यावर विहीर खोदणेगरज लागल्यानंतरच एखाद्या गोष्टीसाठी तयारी करणे
६९३ताक कुंकून पिणेप्रत्येक छोटी गोष्ट सुद्धा काळजीपूर्वक करणे
६९४ताकापुरते रामायणएखादी गोष्ट मिळेपर्यंत संवाद साधणे. स्वार्थ साधल्यावर तडक निघून जाणे
६९५ताकास जाऊन लोटा लपवणेएखादी गोष्ट इच्छा नसतांना लपविणे
६९६ताकास तूर न लागू देणेमनातील गोष्ट न सांगणे
६९७तीन तिघाडा काम बिघाडाएखादे काम भरपूर जणांनी लक्ष केंद्रित करून केले तर अपयश येऊ शकते
६९८तुझी दाढी जळू दे पण माझी वीडी पेटू देदुसऱ्याचे नुकसान झाले तरी चालेल पण स्वतःचा स्वार्थ साधणे
६९९तू राणी मी राणी पाणी कोण आणीदोन सुकुमार ,नाजूक व्यक्ती कधीही काम करत नाही, असे व्यक्ती जवळ आल्यास एकमेकांचा एकमेकांना फटका बसतो
७००तेरड्याचा रंग तीन दिवसएखादे कार्य थोडे दिवस जोरात चालून एकदम बंद पडणे
७०१तेल गेले तूप गेले हाती आले धुपाटणेएकाच दोन वेग-वेगळ्या गोष्टींवर लक्ष केंद्रित केल्यावर दोन्ही गोष्टींचा लाभ न होणे
७०२तोंडाला पाने पुसणेहमी देऊन समोरच्या व्यक्तीचे काम न करणे
७०३तोबरयाला पुढे, लगमला मागेफायद्याचा वेळी पुढे पुढे ,कामाच्या वेळी मात्र मागे मागे
७०४थेंबे थेंबे तळे साचेकाटकसर केल्यास बरीच शिल्लक मागे पडते
७०५दक्षिणा तशी प्रदक्षिणाव्यवसायात जसा लाभ असेल तसे महत्त्व आपल्या ग्राहकास देणे
७०६दगडा पेक्षा वीट मऊछोट्या गोष्टीत समाधानी राहणे
७०७दगडावरची रेघकायमची गोष्ट
७०८दमडीची नाही मिळकत आणि घडीची नाही फुरसतरिकामटेकडा मनुष्य आपण खूप व्यस्त आहे असे दर्शवितो
७०९दहा गेले पाच उरलेअवसान गळणे. आत्मविश्वास कमी होणे
७१०दहा मरावे पर दहांचा पोशिंदा मरु नयेमहत्त्वाची व्यक्ती गेली तर फार मोठे नुकसान होते
७११दही वाळत घालून भांडणएखाद्या नुकसानाची तमा न बाळगता वैर करणे सुरूच ठेवणे
७१२दांत आहे तर चणे नाहीत, चणे आहेत तर दांत नाहीतसर्व गोष्टी उपलब्ध असल्या तरी त्याचा उपभोग घेता न येणे
७१३दांत कोरून पोट भरतोउपजिवीकेसाठी फार थोडे श्रम घेऊन जीवन व्यतीत करणे
७१४दाखवायचे दात वेगळे अन खायचे दात वेगळेप्रकट करताना विचार वेगळे अन मनात काही वेगळेच विचार
७१५दाणा दाणा टिपतो पक्षी पोट भरतोकष्टकरी आपले पोट अत्यंत जिकिरीने भरतो. जीवन व्यतीत करता येत नाही
७१६दानवाच्या घरी रावण देवजसा आपला स्वभाव तसे आपले श्रद्धास्थान बदलते
७१७दाम करी कामपैशाला किंमत असते
७१८दारात नाही आड म्हणे लावतो झाडसाधने नसताना एखादी गोष्ट हौस म्हणून करणे
७१९दिल्या भाकरीचा सांगितल्या चाकरीचाएखादा मनुष्य एकाच ठिकाणी फार काही अपेक्षा न ठेवता काम करतो
७२०दिवस गेला रेटारेटी, चांदण्यात कापूस वेचीतदिवसभर आपला वेळ वाया घालवून शेवटच्या क्षणास धावा-धाव करणे
७२१दिवस बुडाला मजूर उडालाटाम-टूम काम करून निघून जाणे
७२२दिवस मेला इथं तिथं अन रात्र झाली निजु कुठंदिवसभर आपला वेळ वाया घालवून शेवटच्या क्षणास धावा-धाव करणे
७२३दिवसा चुल रात्री मूलदिवस-रात्र कामाचा त्रास असणे
७२४दिवाळी दसरा हात पाय पसरासण बघून भरमसाठ खर्च करणे
७२५दिव्या खाली अंधारमोठ्या व्यक्तीचे सुद्धा गुण-दोष असतात
७२६दिसतं तस नसतं म्हणून जग फसतंदिखाऊ गोष्टी या कायम तकलादू असतात, मुळात वेगळेच काही असते
७२७दुःख रेड्याला न डाग पखालीलाएखाद्याच्या त्रासामुळे दुसरा चांगला व्यक्ती त्रासात पडणे
७२८दुखणे हत्तीच्या पायाने येते आणि मुंगीच्या पायाने जातेदु:ख लवकर संपत नाही
७२९दुध पोळलं की ताक कुंकून प्यावेएखादा अवघड प्रसंग सोसल्यावर पुढे काळजी घेणे
७३०दुधाची तहान ताकावरछोट्या गोष्टीत समाधानी राहणे
७३१दुधात साखर पडणेएकाचवेळी अनेक गोष्टीचा लाभ होणे
७३२दुधापेक्षा सायीवर प्रेम जास्तमुलांपेक्षा नातवंडांवर अधिक प्रेम असणे
७३३दुर्दैवाचे दशावतार होणेअनेक बाजूने संकट येणे
७३४दुष्काळात तेरावा महिनासंकटात अधिक भर पडणे
७३५दुष्टी आड सृष्टीआपल्या पाहण्यापलीकडे पण जग आहे
७३६दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसते पण स्वतःच्या डोळ्यातील मुसळ दिसत नाहीस्वतःच्या चुकांकडे दुर्लक्ष करून दुसऱ्याच्या चुकांविषयी बोलणे
७३७दे माय धरणी ठाय करणेखूप त्रस्त होणे
७३८देणं न घेणं आणि कंदिल लावून येणंउगाचच एखाद्याची कुरापत काढणे
७३९देवाची करणी अन नारळात पाणीनैसर्गिक गोष्टींना तोड नसते
७४०देश तसा वेशप्रदेशाप्रमाणे आपले संस्कार, पोशाख बदलतो
७४१देह देवळात चित्त पायतणातएका ठिकाणी मन एकाग्र न करता, दुसऱ्याच ठिकाणी चित्त घोटाळणे
७४२दैव देते कर्म नेतेकर्म वाईट केले तर चांगल्या गोष्टीचा त्याग करावा लागतो
७४३दोघींचा दादला उपाशीएकाच वेळी दोन गोष्टींवर लक्ष केंद्रित केल्यामुळे कोणताही अपेक्षित लाभ न होणे
७४४दोन डोळे शेजारी, भेट नाही संसारीजिवलग दोन व्यक्तींची भेट जवळ असूनही न होणे
७४५दोन्ही घरचा पाहुणा उपाशीदोन वेग-वेगळ्या समूहाना पाठिंबा देणाऱ्या व्यक्तीला तोटा होतो
७४६द्या दान सुटे गिरान (ग्रहण)एखादा आशावाद दाखवून द्रव्याची अपेक्षा करणे
७४७ध चा मा करणेसांगताना एखाद्या मूळ गोष्टीत बदल करून आपला स्वार्थ साधणे
७४८न कर्त्याचा वार शनिवारकाम न करणारा व्यक्ती फक्त बहाणे सांगतो
७४९नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्नमुळात कमी तयारी असलेल्या व अडखळत असलेल्या कार्यात अनेक बाधा येणे
७५०नकटे व्हावे पण धाकटे होऊ नयेछोट्या व्यक्तींना नेहमी कामे सांगितली जातात
७५१नर का नारायण बनणेकर्म करून उच्च होणे
७५२नरोवा कुंजरोवाकोणत्याही गोष्टीबाबत भाष्य न करणे, केल्यास संभ्रम निर्माण करणे
७५३नवी विटी नवे राज्यनवीन राज्यकर्ते नवीन कायदे आणतात
७५४नव्याची नवलाईएखाद्या नवी गोष्टीचा उदोउदो करणे
७५६नव्याचे नऊ दिवसएखाद्या प्रमुख व्यक्तीचा कोणताही उपयोग न होणे
७५७नसून खोळंबा असून दाटीएखाद्या नुकसानाची तमा न बाळगता वैर करणे सुरूच ठेवणे
७५८नाक दाबले की तोंड उघडतेएखाद्यास कोंडीत पकडून मनस्थितीत हवे ते काम ऋण घेता येते
७५९नाकाचा बालअत्यंत प्रिय व्यक्ती
७६०नाकापेक्षा मोती जडमहत्वाची गोष्ट सोडून इतर गोष्टीला महत्त्व येणे
७६१नाकापेक्षा मोती जड होणेडोईजड होणे
७६२नाचता येईना आंगण वाकडेस्वतः येत नसलेली गोष्ट न करता इतर गोष्टीस बोल लावणे
७६३नाव मोठे लक्षण खोटेश्रीमंत असून कंजूष असणे, श्रीमंत असण्याचा आवआणणे
७६४नाव सगुणी अन करणी अवगुणीनावाप्रमाणे न राहता वाईट कृत्य करणे
७६५नाव सोनुबाई अन हाती कथलाचा वाळानावाप्रमाणे महती नसणे
७६६नावडतीचे मीठ अळणीनावडत्या व्यक्तीने केलेली कोणतीही गोष्ट आवडत नाही
७६७निंदकाचे घर असावे शेजारीआपल्या टीकाकरांमुळे आपला विकास होतो
७६८निर्लज्जम सदा सुखीवाईट व्यक्तीला त्याचा वागण्याचे काहीही वाटत नाही
७६९पहिले पाढे पंचावन्नभरपूर समजावून सुद्धा वाईट वागण्यात बदल न होणे
७७०पाण्यात राहून माशाशी वेरबलवानाशी शत्रुत्व काय कामाचे?
७७१पाण्यात राहून माशाशी वेरबलवानाशी शत्रुत्व काय कामाचे?
७७२पायीची वहाण पायी बरीयोग्यतेप्रमाणे वागवावे धारत नाही
७७३पालथ्या घड्यावर पाणीनिर्बुध्ध व्यक्तीचे वर्तन सुधारत नाही
७७४पी हळद आणि हो गोरीउतावीळ होणे
७७५पुढच्यास ठेच मागचा शहाणाएकाच मार्गावरील पुढील व्यक्तीस वाईट अनुभव आल्यास तो मागच्या माणसा साठी मार्गदर्शक ठरतो
७७६पेराल तसे उगवेलकर्मानुसार तसे फळ मिळते
७७८प्रत्येक कुत्र्याचा दिवस असतोप्रत्येकाचा दिवस येतो
७७९प्रयत्नांती परमेश्वरखूप कष्ट करण्याची तयारी असली की कोणतीही गोष्ट साध्य होऊ शकते
७८०फट म्हणताच ब्रम्ह-हत्याछोट्या गोष्टीवरुन दोषी ठरवणे
७८१बडा घर पोकळ वासाश्रीमंत असून कंजूष असणे, श्रीमंत असण्याचा आव आणणे
७८२बळी तो कान पिळीबलवान माणूस दुर्बळ माणसांना पिडतो
७८३बाप दाखव नाही तर श्राद्ध करकोणत्याही गोष्टीचा पुरावा मागणे
७८४बाबाही गेला दशम्या गेल्याएकाच दोन वेग-वेगळ्या गोष्टींवर लक्ष केंद्रित केल्यावर दोन्ही गोष्टींचा लाभ न होणे
७८५बाळाचे बाप ब्रह्मचारीनिष्पाप वाटणाऱ्या व्यक्ती दोषी असणे
७८६बुडत्याला काठीचा आधारसंकटग्रस्त मनुष्यास छोटी मदत सुद्धा मोठी वाटते
७८७बैल गेला अन झोपा केलाएखादी गोष्टीचे महत्व संपल्या नंतर त्यासाठी उपाय योजना करणे व्यर्थ आहे
७८८बैल गेला नि झोपा केलाएखाद्या गोष्टीची निकड संपल्यावर त्या गोष्टीसाठी काम करणे
७८९बोलण्यापेक्ष मौन श्रेष्ठअधिक बोलण्या पेक्षा काम करणे चांगले असते
७९०बोलाचीच कढी बोलाचाच भातकार्य न करता वायफळ बडबड करणे
७९१बोलाचीच कढी बोलाचाच भातखोटी आश्वासने देणे
७९२भरंवशाच्या म्हशीला टोणगापूर्ण निराशा करणे
७९३भरल्या गाड्यास सूप जड नाहीसमर्थ व्यक्तीला छोटे काम विशेष वाटत नाही
७९४भित्यापाठी ब्रह्म-राक्षसभित्रा माणूस सदैव कोणत्याही छोट्या बाबीना घाबरतो
७९५मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नयेएखाद्याच्या चांगुलपणाचा फार फायदा घेऊ नये
७९६मनी वसे ते स्वप्जीआपण ज्या गोष्टीचा सदैव विचार करतो तीच गोष्ट आपल्याला आसपास दिसते (आभास होतो)
७९७मुलाचे पाय पाळण्यात दिसतातव्यक्तीचे गुणदोष सुरवातीच्या काळात लगेच कळतात
७९८मूर्ती लहान पण कीर्ती महानछोटा मनुष्य तरी कार्यक्षमता खूप असणे
८००मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाहीकाही गोष्टी स्वतःअनुभावल्याशिवाय कळत नाही
८००मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाहीप्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय कळत नाही
८०१यज्ञास बळी बोकडाचादुर्बळ व्यक्तीला कठीण काम करण्यास सांगणे
८०२राजा उदार झाला हाती भोपळा दिलाआशा असताना एखाद्या मोठ्या व्यक्तीने अपेक्षेनुसार काम न करणे
८०३रात्र थोडी सोंगे फारकाम भरपूर, वेळ कमी
८०४राम कृष्ण आले गेले तरीही जग का चालायचे थांबलेव्यावहारिक बाबी कुणासाठीही थांबत नाही
८०५लंकेची पार्वती असणेअत्यंत गरीब असणे
८०६लंकेत सोन्याच्या विटादुसऱ्याची श्रीमंती आपल्या काही कामाची नसते
८०७लहान तोंडी मोठा घासछोट्या व्यक्तीने आवाक्या बाहेरच्या गोष्टी करणे
८०८लहानपण देगादेवा मुंगी साखरेचा रवामोठेपणा न मिरवता छोटे होऊन आपले काम परिपूर्ण करणे सुखी आहे
८०९लेकी बोले सुने लागेएकाला बोलल्यावर दुसऱ्याने त्यातील संदेश ओळखणे
८१०वराती मागून घोडेएखादी गोष्टीचे महत्व संपल्या नंतर त्यासाठी उपाय योजना करणे व्यर्थ आहे
८११वाचाल तर वाचालशिक्षण घेतले की तरच प्रगती होऊ शकते
८१२वाड्याचे तेल वाग्यांवरएका गोष्टीचा राग दुसऱ्यावर काढणे
८१३वारा पाहून पाठ फिरवावीवातावरण पाहून वागावे
८१४वाऱ्यावरती वरात काढणेस्वतः नियोजन न करता दुसऱ्यावर विसंबून महत्त्वाचे कार्य करणे
८१५वाळूचे कणही रगडीता तेलही गळेकठोर परिश्रमामुळे कोणतीही गोष्ट साध्या होऊ शकते
८१६वासरात लंगडी गाय शहाणीमूर्ख लोकांमध्ये कमी बुध्धिवान मनुष्यसुद्धा प्रसिद्ध असतो
८१७विंचवाचे बिहाड पाठीवरफिरत्या माणसाचा ठाव-ठिकाणा लागणे मुश्कील असते. अस्थिर गोष्टी या कायम मूळ विषयापासून भटकतात.
८१८शितावरून भाताची परीक्षाफार थोड्या नमुन्यावरुन मोठ्या वस्तूंची चाचणी करणे. एखाद्या प्रसंगावरून माणसाच्या स्वभावाची ओळख करून घेणे
८१९शुद्ध नाही मन तया काय करी साबणमनात कुविचार असता चांगले विचार ऐकणे व्यर्थ आहे
८२०शुध्द बीजापोटी फळे रसाळ गोमटीसंस्कारी कुटुंबात चांगल्या व्यक्ती असतात
८२१शेंडी तुटो की पारंबी तुटोएखाद्या गोष्टीचे परिणाम काय राहणार याची चिंता न करणे
८२२शेखी मीरविणेउगाचच मोठ्या गोष्टी करणे
८२३शेरास सव्वाशेरप्रतिपक्षापेक्षा श्रेष्ठ
८२४शेरास सव्वाशेरप्रत्येक वाईट माणसाला त्यापेक्षा वरचढ माणूस मिळतोच
८२५शेळी जाते जीवानिशी खाणारा म्हणतो वातडआपल्या स्वार्थ साधण्यासाठी दुसऱ्याच्या जीवाचा विचार न करणे
८२६श्वानाचीया भुंकण्याला हत्ती देईना किंमतबलवान व्यक्ती दुर्बल माणसाला किंमत देत नाही
८२७संगत गुण से सोबत गुणदोन व्यक्तींना सोबत राहताना एकमेकांच्या सवयी लागणे
८२८संन्याश्याच्या लग्नाला शेंडीपासून प्रारंभमुळात कमी तयारी असलेल्या व अडखळत असलेल्या कार्यात अनेक बाधा येणे
८२९समुद्रामाजी फुटकें तारूचांगल्या गोष्टींबरोबर वाईट गोष्टी पण असतात
८३०सरकारी काम अन बारा महिने थांबकाही कामं नेहमी विलंबाने होत असतात, त्या साठी धीर देणे योग्य
८३१सरड्याची धाव कुंपणा पर्यंतचदुर्बळ माणूस एका मार्यादेच्याआतच काम करतो
८३२साखरेचे खाणार त्याला देव देणारसगळ्यांशी आपुलकीने वर्तन केल्यास असाध्य बाब साध्य होऊ शकते
८३३सुंठेवाचून खोकला गेलापरस्पर संकट टळले
८३४सुंभ जळतो पण पिळ जळत नाहीभरपूर शिक्षा होऊन सुध्दा वाईट प्रवृत्ती नष्ट करता येत नाही
८३५हत्ती गेला शेपूट राहिलंअवघड काम संपल्यानंतर छोटे (सोपे) राहणे
८३६हत्ती होऊन ओंडके, मुंगी होऊन साखर खाल्लेली बरीमोठेपणा न मिरवता छोटे होऊन आपले काम परिपूर्ण करणे सुखी आहे
८३७हपापाचा माल गपापाअती हव्यासाने असलेले द्रव्य ही नष्ट होते
८३८हलवायाच्या घरावर तुळशीपत्रस्वतःच्या व्यवसायात नामांकित असूनही आपल्या घरासाठी आपल्या व्यवसायासंबधित सुविधा देता न येणे
८३९हा सूर्य आणि हा जयद्रथपुराव्यासहित सिद्ध करणे
८४०हात दाखवून अवलक्षणउगाचच विविध गोष्टी मागे धावून हसे करून घेणे
८४१
हातच्या कंकणाला आरसा कशालाउघड सत्य हे केव्हाही खरे करता येऊ शकते
८४२हातावर तुरी देणेएखाद्याच्या कचाट्यातून सुटणे
मराठी म्हणी संग्रह व अर्थ – मराठी म्हणी व त्यांचे अर्थ – Marathi Mhani

बोली भाषेतील म्हणी

विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो, विविध बोली भाषा हे आपले एक भाषासंचित आहे. बोली भाषांच्या समृद्ध वारशामुळे मराठी भाषेचे भरण पोषण झाले आहे आणि अजूनही होत आहे. भाषेचा अस्सल आविष्कार आपल्याला बोलीभाषेत पाहायला मिळतो. त्यामुळेच व-हाडी, अहिराणी आणि मालवणी या बोलीभाषांमधल्या काही म्हणी आम्ही खाली दिल्या आहेत.

बोली भाषांमधील तीनही वेगवेगळ्या भागांतील म्हणींचे एकमेकींशी आणि मराठीतील म्हणींशी दिसणारे साम्य अतिशय सुखावणारे आहे. तुम्ही या जरूर वाचा.

अहिराणी म्हणी – Ahirani Mhani

अनु.क्रम्हणीअर्थ
आंबानी कमाई, निंबुमा गमाईआंब्यात कमाई केली, नि लिंबाच्या उत्पन्नात गेली एका व्यवहारात मिळविलेला नफा दुसऱ्या व्यवहारात गमावून बसणे, थोडक्यात आतबट्ट्याचा व्यवहार करणे.
ईसगाव ना तिसगाव, भिकारीले चाईसगावभिकारी चाळीस गाव भटकणारच. संसारात चित्त नसेल आणि कष्ट करण्याची तयारी नसेल तर तो गावोगाव भटकणारच.
उठरे चिंधा अन् तोच धंदारोज तेच काम करावं लागणे.
उना व्हकारा, सोडा पसारामानवी जीवन क्षणभंगुर आहे. देवाचे बोलावणे आल्यावर सर्व सोडून जावे लागते.
ऊनी पाव्हनीन भेटाले, लाई समार वाटालेभेटायला आलेल्या पाहुणीला काम सांगणे.
उंदिरले सापडनी चिंधी, नयाम्हा ठिवू का खयाम्हा ठिवूअल्पसंतुष्ट व्यक्ती थोडयाशा यशाने हुरळून जाते.
घरना पोरं उघडा, नी याहीणले नेसाडा लुगडाघरचे अडचणीत असताना, इतरांना मदत करणे.
खिंसात नही आणा, नी माले बाजीराव म्हणापरिस्थिती नसताना मोठेपणाचा आव आणणे.
खान तशी खापरी, नी माय तशी छोकरीखाण तशी माती.
१०माले ना तुले, घाल कुत्रालेदोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होतो.
११उचा झाडवर बुचा बसणा, असा राज कधी ना उनउच्च पदावर क्षुद्र मनोवृत्तीचा माणूस बसणे.
१२रीस नी माय, भिक मांगी खायअट्टाहास करणारा लयास जातो.
१३खावाले काळ, नी भूईले भारखायला काळ अन भूईला भार.
१४घरमा फुटेल बोयका, नि मांगस दोन-दोन बायकाऐपत नसतानाही मौज करायची इच्छा करणे.
१५दिल्येल शिदोरी आणि सांगेल आक्कल पुरत नहीदुसऱ्याच्या भरवशावर काम होत नाही.
१६आग लाऊ, तमासा पाहूभांडण लावून गंमत बघणे.
१७उक्खळ म्हान डोकं घाल, आते फुटो का रहावोएखादी जबाबदारी अंगावर घेतली तर परिणामाची चिंता करु नये.
१८घोडा इकी डांगर खाऊहिणकस गोष्टीसाठी, मौल्यवान वस्तू गमावणे.
१९आगमाहीनं निघीसनं, फुफाटामा पडणंएका संकटातून सुटून दुसऱ्या संकटात सापडणे.
२०हाथ मूडी त्यान्हा गळात पडीजो चुकले त्यालाच नुकसान भोगावे लागते.
२१पेरई तसे उगईपेराल तसे उगवेल.
२२सुम बळी जास, पण वळ नही जासुंभ जळते पण पिळ जात नाही.
२३सैड्यानी झेप, वडांगलोंगसरड्याची धाव कुंपणापर्यंत.
२४आडी रोज पोळ्या, नी सनले घुगऱ्यानेमक्या वेळी चुकीच्या गोष्टी करणे.
२५घोडास्वर उनात अन् गधडास्वार गयातजेथे फुले वेचली तेथे गोवऱ्या वेचण्याची वेळ येणे.
२६मी सांगस म्हणीशीन रातले म्हणा तुमी दिनएखाद्याचे अंधानुकरण करणे.
२७लेन ना देन कंदिल लाई येनंकाहीही संबंध नसल्याठिकाणी हस्तक्षेप करणे.
२८बारास्नी माय अन् खाटलावर जीव जायएकमेकांच्या भरवशावर कोणीच काही काम करत नाही.

मालवणी म्हणी – Malvani Mhani

अनु.क्रम्हणीअर्थ
ताकाक जावान, बुडकुलो कित्या लपयाताकाला जाणे पण भांडे लपविणे, एखादी गोष्ट हवी असली तरी सरळ न मागता आढेवेढे कशाला घ्यावे?
कोको खाता रव, हिवाळा गावला मवशेतीसाठी पेरलेले धान्य (रव) रानकोंबडी (कोको) खाऊन जाते. परंतु, शेतकऱ्याला मात्र एक साधा साप (हिवाळं) दिसतो. तो त्यालाच धान्य खाणारा म्हणून मारतो. थोडक्यात चोर सोडून संन्याशाला फाशी.
देना नाय घेना, नि कंदिलान येनाथेट संबंध नसेल तरी विनाकारण नाक खुपसणे.
शिमगो सरलो नि कवित्व रवलाशिमगा (होळी) या सणात होणारी आरडाओरड एक दिवस असते. पण त्याचे परिणाम पुढेही पाहायला मिळतात. त्याप्रमाणे एखादी घटना घडून गेल्यानंतर तिचे बरेवाईट परिणाम राहणे.
जग फिरान इलो आणि हुमऱ्याक आपटान मेलोजगभ्रमंती करून आलेला माणूस घरात येताना उंबरठ्याला आपटून मरण पावला तर होणारी अवस्था. थोडक्यात मोठी कामगिरी पार पाडणे परंतु, क्षुल्लक कारणाने त्यावर पाणी पडणे.
घरणीवांगडा वाकडा, ता खाए चुलीतली लाकडाघरातल्या कारभारणीबरोबर (घरणी) भांडण झाले तर जेवण मिळणार नाही आणि चुलीतली लाकडेच खावी लागतील. थोडक्यात जळात राहून माशाशी वैर चांगले नाही.
बेबला बायत पडला, नि माथा झळझळीत झालाएखादी अर्धवट व्यक्ती (बेबला) चुकून विहिरीत (बाव) पडली तर इतर तिला बाहेर काढून तिचा जीव वाचवतात. अशी दुर्घटना घडली तरी त्यात एक चांगली गोष्ट म्हणजे स्वच्छ अंघोळ झाल्याने त्या व्यक्तीचे अंग स्वच्छ झाले. वाईटात काहीतरी चांगले घडणे.
खावक ईलय ईलय, कामाक मेलय मेलयखाण्याच्या आशेने आलेल्या माणसाला इतके काम करावे लागते की तो कामाने दमून जातो. एखादी गोष्ट मिळण्याच्या अपेक्षेत असताना ती मिळवण्यासाठी भरपूर कष्ट पडणे. यापेक्षा ती गोष्टच नको असे वाटणे.
कोणाची जळता दाढी, त्याचेर कोण पेटयता इडीकोणाची दाढी जळताना दिसली तर विझवायची सोडून त्यावर विडी पेटवून घेणे, दुसऱ्याच्या नुकसानातही आपला फायदा बघणे.
१०कापाड न्हेला बायन आणि चिंधी नेली गायनजरा चांगलं कापड किंवा साडी एखाद्या बाईने नेणे आणि बाहेर वाळत घातलेले जुनेरे गाईने खाल्ले किंवा दुसऱ्या कुणी नेले तर होणारी अवस्था. थोडक्यात, तेल गेले, तूप गेले, हाती धुपाटणे राहिले.
११दिस सरलो रेटारेटी, नि सांजे दियाक कापूस घोटीदिवस आळसात घालवायचा आणि संध्याकाळ झाली की काळोखात दिव्यासाठी कापसाच्या वाती करायला घ्यायच्या. थोडक्यात तहान लागल्यावर विहीर खणायला घेणे.
१२मेल्या म्हशीक पाच शेर दूधनसलेल्या गोष्टीबद्दल वारेमाप स्तुती करणे. कारण पुरावा म्हणूनही ती गोष्ट समोर नसते.
१३माझो बाबा काय करी, आसलेला नाय करीजे चांगले चालले आहे ते नष्ट करण्याचे काम करणाऱ्याला ही म्हण वापरतात.
१४आद्या मिरगान केला नाव, पुसा पनवसान बुडयले बारा गावआर्द्रा आणि मृग नक्षत्रात चांगला पाऊस पडल्याने त्यांचे कौतुक होते पण, पुष्य आणि पुनर्वसू यातही चांगला पाऊस पडतो आणि अतिवृष्टीने गाव बुडतात म्हणजे चांगले काम करणे पण शेवटी त्यावर पाणी फिरवणे.
१५वाघ पडलो घळी नि केलडा दाखयता नळीवाघ जर घळीत (दरीत) पडला तर माकडसुद्धा त्याला नळी दाखवून घाबरवू शकते. अडचणीत सापडलेल्याला बलवानाला क्षुद्र व्यक्तीसुद्धा घाबरवते.
१६आंधळ्याचा हात, चुकून बुडकुल्यातआंधळ्या व्यक्तीला एखादी गोष्ट सहज सापडत नाही. अशावेळी त्याला सहजपणे बुडकुलं म्हणजे मडक्यातली हवी तीच वस्तू सापडणे. विपरीत परिस्थितीतही हवे ते नेमके मिळणे.
१७बारा हात तवसा, तेरा हात बीतवस म्हणजे काकडी, बारा हात लांब आणि तिचे बी तेरा हात लांब असे वर्णन. थोडक्यात, अतिशयोक्ती करणे.
१८नाय देवच्या भाषे, बोंडगीचे वाशेजर एखाद्याला एखादी गोष्ट द्यायची नसेल तर अशी वस्तू द्यायला तयार व्हायचे की तोच नको म्हणेल. घरासाठी वासे मागायला कुणी आला की त्याला बोंडगीचे (निरुपयोगी लाकूड) वासे आहेत सांगायचे.
१९मिठाक लाया नि माका खायामीठ लावा आणि मला खा. म्हणजे आपल्याला कळो न कळो सगळ्या गोष्टीत मी मी म्हणून पुढे होणे.
२०भोपळीन बाय पसारली, फाटले गुण इसारलीभोपळ्याचा वेल सुरूवातीला आधार घेऊन वाढतो. पण पुढे तो स्वतंत्रपणे इतका वाढतो की आधी आपल्याला कुणी आधार दिला हे विसरतो. आधीचे उपकार विसरणाऱ्याला ही म्हण वापरतात.
मालवणी म्हणी – Malvani Mhani

व-हाडी म्हणी – Varhadi Mhani

अनु.क्रम्हणीअर्थ
अकड गई चमेली तं झेंडूसंग दिवालीएकाच्या ताठ्यामुळे एखादे काम दुसऱ्याच्या मदतीने करून घेणे.
अकातली गाय काटे खायेगरजू, भुकेला माणूस प्रसंगी मिळेल ते खातो.
आईबाई गोळ, माहा वगारू झालं लोळबायका गप्पात गुंतल्याने गुराढोरांकडे दुर्लक्ष होणे.
आईबाई नाळली अन् शेजारीन जोळलीइतर बायांना फसवायचे पण शेजारणीशी चांगले संबंध ठेवायचे.
इच्चकलं चावलं अन् सोन्याचं बावलंनीट नसलेली आपली गोष्टही मूल्यवान वाटते.
इतभर लंगोटी, हात भर तानेकोणत्याही लहान गोष्टीची लांबण मोठी लावणे.
उघळी माजली, दिवा लावून निजलीअकारण खर्चिक वृत्ती.
उघळीले घेतलं लुगळं, उशा ठेवू का पायथ्या ठेवूप्राप्त साधनाचा उपभोग घेणारी उतावीळ अधीर, दिखाऊ लगबग.
अंधीमंधी करते, मंधात मुसय मारतेज्ञान नसताना दाखविलेला अतिउत्साह काम नासवणारा.
१०अंबाळीची खाय भाजी, नेटानं बोल दाजीकमी मोबदल्यात अधिक राबवून घेणे.
११आंगावर पडली गोम तं उचलते कोनअतिशय आळशीपणाचे लक्षण.
१२आत्यंतिक गरिबीचे चिन्ह.आत्यंतिक गरिबीचे चिन्ह.
१३कधी नाई पायला दिवा, एकदम दिसला आवाअल्पाचाही अनुभव नसता फार मोठ्या प्रमाणात काही प्राप्त होणे.
१४खायाले टकराघो अन् कामाले आग लागोकेवळ खाण्यावर डोळा, काम निघाले पळा.
१५गाईले सोळा अन् म्हसीले पूजायोग्य किंवा पात्र ते सोडून अपात्र आहे त्याला महत्त्व देणे.
१६घरची करते देवादेवा, बाहिरचीले हलवा मेवाघरचीची उपेक्षा परकीचे लाड.
१७घोळं नाई कुदत अन् खोगीरच कुदतेप्रधानापेक्षा कनिष्ठांनीच रूबाब करणे.
१८चरकभरक लावतो रई, पुरानं गेल्या सासूबाईआप्ताचे वाईट होऊनही हातातील कामाची घाई.
व-हाडी म्हणी – Varhadi Mhani

सारखाच आशय व्यक्त करणाऱ्या मराठी आणि इंग्रजी म्हणी

निबंधलेखनात किंवा वक्तृत्वात आशय खुलविण्यासाठी म्हणी उपयुक्त ठरतात. त्यांचा तारतम्याने वापर करणे कौशल्याचे असते. त्या दृष्टीने पुढील म्हणी आणि त्यांना पर्यायी इंग्रजी म्हणी पाहा.

अनु.क्र मराठी म्हणी इंग्रजी म्हणी
नाचता येईना अंगण वाकडेAbad workman blames his tools.
बुडत्याला काडीचा आधारA drowning man will clutch at a straw.
चकाकते ते सारेच सोने नसतेAll that glitters is not gold.
अंथरूण पाहून पाय पसरावेAs you made your bed so you must lie in it.
अन्नछत्रात जाऊन मिरपूड मागू नयेBeggars must not be choosers.
कधीच नाही त्यापेक्षा उशीर बराBetter late than never.
गरज सरो नि वैद्य मरोA fig for the doctor when cured.
वासरात लंगडी गाय शहाणीA figure among ciphers.
उथळ पाण्याला खळखळाट फारEmpty vessels make the most noise.
१०चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचेEvery dog has his days.
११दिव्याखाली अंधारEvery light has its shadow.
१२आरोग्य हेच ऐश्वर्यHealth is wealth.
१३लवकर निजे, लवकर उठे; तया ज्ञान, संपत्ती, आरोग्य लाभेEarly to bed and early to rise makes a man healthy, wealthy and wise.
१४ऐकावे जनाचे पण करावे मनाचेListen to people, but obey your conscious.
१५दाम करी कामMoney makes the mare go.
१६नवी विटी नवे राज्यNew lords, new laws.
१७गरज ही शोधाची जननी आहेNecessity is the mother of invention.
१८काट्यावाचून गुलाब नाहीNo rose without a thorn. ÇETSTE TET – Out of sight, out of mind.
१९पेरावे तसे उगवतेReap as you sow
२०मुलाचे पाय पाळण्यात दिसतातThe child is father of a man.
२१चुकणे हा मानवाचा धर्म आहेTo error is human.
२२वरातीमागून घोडेDoctor after death.
२३एकी हेच बळUnity is Strength.
२४आपण चिंतितो एक, पण देवाच्या मनात भलतेचMan proposes, God disposes.
२५बोलण्यापेक्षा मौन श्रेष्ठSpeech is silver, silence is Golden.
२६बळी तो कान पिळीMight is right.
२७गतं न शोच्यम् !It is no use crying over spilt milk.
२८घी देखा लेकिन बडगा नहीं देखाHoney is sweet, but the bee stings.
२९चांगल्या कामाचा प्रारंभ स्वतःच्या घरापासून व्हावाचांगल्या कामाचा प्रारंभ स्वतःच्या घरापासून व्हावा
मराठी आणि इंग्रजी म्हणी

मराठी म्हणी ओळखा – मराठी म्हणी संग्रह व अर्थ

म्हणी म्हणजे काय?

विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो, कधी कधी खूप मोठा आशय सांगण्यासाठी किंवा अनुभव व्यक्त करण्यासाठी लहान लहान, तालबद्ध बोध देणारी अशी चटकदार वाक्ये बोलण्यात येतात. लोकांच्या बोलण्यातून ती प्रकटलेली असतात आणि त्याची यथार्थता, त्याचा चटकदारपणा पटल्यामुळे ती वारंवार लोकांच्या म्हणण्यात’ येत असतात. आपणही सरावाने अशी वाक्ये सहज वापरत असतो.

परीक्षा जवळ आली आहे. आणि अजूनही बराच अभ्यास बाकी राहिला आहे, अशावेळी आपण सहज ‘रात्र थोडी सोंगे फार’ म्हणतो. अशा वाक्यांना ‘म्हण’ असे म्हणतात. म्हणीतून सूत्रमय पद्धतीने, थोडक्यात शहाणपणाचे जणू सिद्धांतच मांडलेले असतात.

आपण संभाषणांमध्ये मराठी म्हणी नेहमीच म्हणतो, Marathi Mhani आपल्या रोजच्या संभाषणाचा एक महत्त्वाचा भाग असतात. मराठी म्हणी सर्वत्र वापरल्या जातात. म्हणी लहान असतात, परंतु याचा अर्थ खूप खोल आणि तंतोतंत असतो. शहाणे लोक मराठी म्हणी समजतात आणि ना समजणारे विचार करत राहतात.

म्हणी वर विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचे उदाहरण

मराठी म्हणी ओळखा, म्हण पूर्ण करा, म्हणीचा अर्थ सांगा, म्हणीचा वाक्यात उपयोग करा, असे सहसा स्पर्धा परीक्षा आणि इयत्ता ६ ते १२ च्या विविध परीक्षांमध्ये विचारल्या जातात. जर आपण मराठी भाषा शिकत असाल तर आपल्यासाठी हा लेख खूप उपयुक्त होईल. पुढे काही म्हणी त्यांच्या अर्थांसह दिल्या आहेत. प्रत्येक अक्षराच्या शेवटी काही म्हणींचा वाक्यात २ उपयोग करून दाखवला आहे. त्यामुळे त्यांचा अर्थ अधिक स्पष्ट होईल.

Leave a Comment